आंबा वर मराठी निबंध – वाचा येथे Mango Tree Essay in Marathi

प्रस्तावना:

आंब्याचे झाड हे भारत देशातील सर्वात लोकप्रिय झाड आहे. आंबा या झाडाचे शास्त्रीय नाव Mangifera इंडिका असे आहे. आंबा हे झाड विषुववृत्तीय प्रदेशात आढळणार झाड आहे. आंबा हे भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे.

आंबा हे फळ आपल्या अवीट गोडीमुळे सर्वात प्रसिद्ध आहे. म्हणून महाराष्ट्रात आंबा या फळाला ‘कोकणचा राजा’ असे म्हटले जाते. त्याच बरोबर आंबा या फळाला ‘फळांचा राजा’ असे म्हटले जाते.

आंब्याच्या झाडाचे वर्णन

आंब्याचे झाड हे खूप मोठे असते. आंब्याची झाडाची सर्वत मुख्य विशेषता म्हणजे या झाडावर पाने ही वर्षभर टिकून राहतात. आंब्याचे झाड हे ३० ते ४० मीटर उंच असते. या झाडाचा घेर १० मीटर एवढा असतो.

तसेच आंब्याची पाने ही सदाबहार असतात. या झाडाच्या डहाळीला एका मागून एक पाने येतात. ही पाने १० ते ३५ सेमी लांब असतात आणि ६ ते १६ सेमी रुंद असतात.

आंब्याच्या झाडावर जेव्हा केवली पाने येतात तेव्हा या पानांचा रंग हा काहीसा केशरी असतो. जसजशी ही पाने मोठं – मोठी होत जातात तेव्हा या पानांचा रंग गडद हिरवा होतो.

आंब्याचा उगम

आंब्याच्या झाडाचा उगम हा नक्की कुठे झाला हे कुणालाच माहित नाही आहे. परंतु असे मानले जाते की, या झाडाचा उगम हा दक्षिण व दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणात जैव विविधता आढळून आली म्हणून इथे झाला असे मानण्यात आले आहे. एप्रिल ते जून हा या फळाचा हंगाम आहे. या महिन्यांमध्ये आंब्याच्या झाडावर भरपूर फळे लागतात.

आंब्याचा मोहर

आंब्याच्या झाडावर जी फुले येतात त्यांना ‘मोहर’ असे म्हटले जाते. त्या फुलांना एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंबा या फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.

कच्चा आंबा

आंब्याच्या झाडावर जे सुरुवातीला फळ लागते त्याला कच्चा आंबा असे म्हटले जाते. तसेच कच्च्या आंब्याला ‘कैरी’ देखील म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते. काही लोक हे कच्च्या आंब्याच्या फोडी करून खातात.

आंब्याचे लाभ

कच्च्या आंब्यापासून लोणचे तयार केले जाते. ते चवीला खूप चविष्ट असते.

तसेच पिकलेल्या आंब्याचा आमरस बनवला जातो. तर काही लोक फोडी करून खातात.

कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात त्याला साटे असे म्हटले जाते.

काही लोक हे कच्च्या आंब्याच्या फोडी करून सुकवतात आणि त्याचा उपयोग जेवणामध्ये करतात.

राजापुरी आंब्यांपासून मुरंबा आणि साखरांबा तयार केला जातो.

आंब्याच्या जाती

संपूर्ण जगात आंब्याचा ४०० हुन अधिक आंब्याच्या जाती आढळतात. आंबा हे फळ हिरव्या, पिवळ्या आणि केशरी रंगांमध्ये आढळते.

जसे की हापूस, पायरी, तोतापुरी, केशर लंगडा, सफेद  आणि रायवळ इत्यादि अनेक जाती आहेत.

परंतु देवगडचा हापूस आंबा हा सर्वात प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर उत्तर प्रदेशात दशेरी, नीलम या अनेक जातीनुसार त्यांचा आकार व रंग, चव  ही भिन्न – भिन्न असते.

आंब्याचे उत्पादन

भारत देश हा आंबा या फळाचे उत्पादन करण्यात सर्वात आघाडीवर आहे. भारत देशात उत्पादित केलेले आंबे हे जागतिक बाजारपेठेत पाठवले जातात. आजही आपल्या देशातील बरेच राज्यातील शेतकरी हे आंब्याचे उत्पादन घेऊन आपली आजीविका चालवितात. हे एक रोजगाराचे मुख्य पात्र आहे.

राष्ट्रीय झाड आणि  फळ

जरी भारत आणि पाकिस्तान हे परस्पर शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे.

आंबा हे फळ भारत आणि पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. तसेच आंब्याचे झाड हे बांगलादेशचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रीय चिन्ह आहे.

निष्कर्ष:

आंबा हे फळ सर्वात गोड फळ आहे. म्हणून सर्व माणसे आंबा हे फळ आनंदाने खातात. तसेच या फळामध्ये औषधी गुण देखील असतात. आंबा हे फळ आपल्या आरोग्यास फायदेशीर असते. त्याच प्रमाणे हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाला पवित्र मानले जाते.

Updated: दिसम्बर 16, 2019 — 11:29 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *