प्रस्तावना:
आमचा भारत देश हा एक असा देश आहे, जिथे प्रत्येक महिन्यात कोणता न कोणता सण साजरा केला जातो. या भारत देशाला सणांचा देश असे म्हटले जाते.
कारण या देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. भारत देशातील सर्व सण विविध धर्माचे आणि जातीचे लोक एकसाथ राहून साजरे करतात.
त्या सर्वांमध्ये एकताची भावना दिसून येते. या सर्व सणांमध्ये भारत देशात साजरा केला जाणारा मकर संक्रांति हा सण हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे.
मकर संक्रांति म्हणजे काय –
संक्रांत म्हणजे – संक्रमण किंवा मार्ग क्रमून जाणे अथवा ओलांडून जाणे. जेव्हा सूर्य धनु राशीमधून म्हणजेच त्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्ग क्रमण होत असते आणि तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.
त्यामुळे सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. त्याच बरोबर दिवस हळू – हळू मोठा होतो आणि रात्र छोटी होऊ लागते.
मकर संक्रांति केव्हा साजरी केली जाते –
भारत देशात दरवर्षी मकर संक्रांति हा सण १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी ला साजरा केला जातो. हा सण जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण आहे. मकर संक्रांति हा सण दक्षिण भारतात पोंगल या नावाने प्रसिद्ध आहे.
मकर संक्रांतीची कथा –
फार वर्षांपूर्वी लोकांना त्रास देणारा संकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला मारणे अवघड होते. म्हणून देवीने संक्रांतीचे रूप धारण करून संकासूराला ठार मारले आणि सगळ्या लोकांना सुखी केले.
मकर संक्रांति हा सण कसा साजरा केला जातो –
आमच्या भारत देशामध्ये मकर संक्रांति हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हणून साजरी करतात.
या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने स्नान केले जाते. या दिवसापासून दिवस हा तिळा – तिळाने मोठ होत जातो. या दिवशी विवाहित महिला सुगाडांची पूजा करतात. त्यामध्ये तीळ, हरभरे, बोरे आणि गव्हाची ओंबी सुग्डत भरून देवाला अर्पण केले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुहागातील वस्तूंचे आदान – प्रदान करतात. असे म्हटले जाते कि तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळते.
गुळ आणि तिळाचे महत्त्व
मकर संक्रांति या सणाच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू हे पदार्थ देखील बनवले जातात. या दिवशी आपल्या जीवनातील कडवटपणा दूर करण्यासाठी एकमेकांना तिळगुळ दिले जातात.
त्याच बरोबर असे म्हटले जाते कि, तिळगुळ घ्या आणि गोड – गोड बोला. म्हणजेच भूतकाळातील कडू आठवणीना विसरून जाऊन त्यात तीळ आणि गुळ यांचा गोडवा भरायचा असतो. तसेच हा सन हिवाळ्यात येतो.
त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या सणाला खूप महत्व असते. हिवाळ्यात थंडीमुळे स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी पडते. तसेच शरीरातील उष्णता ही कमी होत असते. तीळ स्निग्धता कायम ठेवण्याचे आणि गुळ उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे कार्य करतात.
विविध प्रांतात मकर संक्रांति सण
त्याच बरोबर पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. तर आसाम मध्ये बिहुच्या रुपात आनंदाने साजरा केला जातो.
पतंगबाजी
मकर संक्रांतीच्या दिवशी आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडताना दिसतात. जसे कि लाल, पिवळ्या, निळ्या इ.
निष्कर्ष:
मकर संक्रांति हा स्नेह गुणांचा सण आहे. तसेच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. मकर संक्रांति या सणाला भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केले आहे.