प्रस्तावना:
प्रायटेक व्यक्तीच्या जीवनात शाळा ही महत्वपूर्ण भूमिका निभावते. एखादे मुल जन्माला आल्यानंतर त्याला घडविण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. जसे कि एक म्हणजे आई, दुसरं म्हणजे परिसर आणि तिसरं म्हणजे शाळा.
आपण मोठे झाल्यावर जास्तीत – जास्त वेळ हा शाळेतच घालवतो. प्रतयेक मुलाचे आई – वडील हे शाळेवर एक मोठी जबाबदारी टाकतात आणि ती जबाबदारी शाळा प्रामाणिकपणे पार पडतात. म्हणूनच शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडविण्यास सर्वात महत्वाचे कार्य करते.
माझी शाळा
शाळा म्हणजे – शिकण्याचे घर. जिथे सर्व जाती आणि धर्माची मुले शिकायला येतात असे ठिकाण म्हणजेच शाळा होय. शाळा ही सरकारी आणि अशासकीय असते. माझ्या शहरात बऱ्याच शाळा आहेत आणि मी माध्यमिक शाळेत शिकतो. माझ्या शाळेचे नाव शारदा विद्यालय आहे.
माझी शाळा ही शहराच्या मध्यभागी नवीन रस्त्यावर वसलेली आहे. माझी शाळा ही भव्य आहे आणि ती अन्य सुविधांनी परिपूर्ण आहे. आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात ही प्रार्थनेपासून होते.
आम्ही सगळ्या वर्गातील मुले एक रांगेने हॉल मध्ये जमतो. सरस्वतीला वंदन करून ओंकार मंत्र आणि गायत्री मंत्र म्हटलं जातो. त्यानंतर महत्वाच्या बातम्या प्रतिनिधी सांगतात.
माझी शाळा ही ३ मजली आहे. माझ्या शाळेमध्ये १ ते १० पर्यंत वर्ग आहेत. तसेच एक सभागृह, एक वाचनालय आणि शाळेच्या समोर एक खेळण्यासाठी मोठे क्रीडांगण आहे.
शाळेच्या शिस्तीचे पालन
माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांची शिस्त हि खूप कठोर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. ते सर्वात लवकर शाळेत येतात. माझ्या शाळॆतील सर्व शिक्षक खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. म्हणून माझी शाळा ही सर्वात प्रथम क्रमांकावर येते.
शाळेचा गणवेश
माझ्या शाळेचा गणवेश हा ठरलेलाच आहे आणि सर्व मुले तोच गणवेश घालून शाळेत येतात. तसेच आमच्या शाळेतील सर्व शिक्षक हे खूप चांगले आहेत. ते आम्हाला नेहमी योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक कामाला मदत करतात. त्याच प्रमाणे ते आम्हाला नेहमी घराकडून आपला गृहपाठ पूर्ण करून आणायला सांगतात.
माझ्या शाळेतील काही विद्यार्थी हे अभिनयात हुशार असतात, तर काही वादनात, तर काही भाषण करण्यात, तर काही विनोद सांगण्यात हुशार असतात. माझी शाळा हि रत्न परख्याची नजर ठेवून मुलांना निवडते आणि घडवते. म्हणून माझी शाळा ही गुणी मुलांची खाण आहे.
सुंदर बाग
माझ्या शाळेच्या समोर एक भरपूर सुंदर अशी बाग आहे आणि त्या बागेत विविध रंगांची फुलांची रंगबिरंगी झाडे आहेत. जेव्हा त्या झाडांवर फुले येतात तेव्हा ती बाग सुंदर आणि आकर्षक दिसते. त्यामुळे माझ्या शाळेची शोभा अधिक वाढते.
खेळाचे क्रीडांगण
आमच्या शाळेच्या समोर एक मोठे क्रीडांगण आहे. तेथे सर्व प्रकारचे मैदानी खेळ हे शिकवले जातात. जसे कि कबड्डी, खो – खो, टेनिस इ अनेक खेळ हे शिकवले जातात.
तसेच आमच्याकडून धावण्याचा शर्यतीचा सर्व सुद्धा करून घेतला जातो. आम्ही दररोज संद्याकाळी शाळा सुटायच्या आधी अर्धा तास खेळायला जातो. व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणांचे अवलोकन करीत असते.
त्या त्या मुलाला विशिष्ट खेळाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते. आमच्या शाळेमध्ये खेळचं नाही तर इत्तर गुणांची सुद्धा कदर केली जाते.
निष्कर्ष:
माझी शाळा ही माझ्या शहरातील सर्व शाळांपैकी सर्वात सुंदर आहे. म्हणून माझी शाळा मला खूप – खूप आवडते. तसेच मला रोजच्या अभ्यासाबरोबर कलागुणांना वाव देणाऱ्या आणि देशप्रीतीचे धडे शिकवणाऱ्या माझ्या शाळेबद्दल मला खूप अभिमान आहे. त्याच बरोबर मला खूप – खूप शिकून मला माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे.