माझी आजी मराठी निबंध – येथे वाचा Majhi Aaji Essay in Marathi

प्रस्तावना:

ज्या प्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात आईचे महत्त्व असते त्याच प्रमाणे आजी सुद्धा तितकीच महत्वाची असते. आजी ही सर्व लहान मुलांची लाडकी असते.

तसेच ती आपल्या घरातील किंवा कुटुंबातील सर्वात वरिष्ठ व्यक्ती असते. आजीला घातली नातवंड ही जणू काही ‘दुधावरची साय’ असते.

माझी आजी

dadi maa त्या प्रमाणे माझी आजी म्हणजे माझ्या बाबांची आई. ती म्हणजे माझ्या मनातली एक सुंदर ठेवा आहे. माझी आजी ही माझं सर्वस्व आहे. माझी आजी म्हणजे माझी मैत्रीण, शिक्षक, माझी मोठी आई आणि माझे मोठे बाबा सुद्धा आहे. माझ्या आजीचे नाव रोशनी देवी आहे. तिचे वय ६० वर्ष आहे.

माझी आजी खूप रुबाबदार दिसते. ती उंच, गोरीपान आणि धारदार नाकाची आहे. माझी आजी स्वच्छ सुटी आणि रेशमी साडी घालते. तसेच डोळ्याला चष्मा, केसांची वेणी किंवा अंबाडा असे तिचे रूप आहे.

करारीपणा

Dadi Maa माझ्या आजीला नेहमी नीटनीटके राहायला आवडते आणि ती आम्हाला सुद्धा नीटनीटके राहायला सांगते. ती खूप करारी आणि ठाम मतांची आहे. ती मोजकेच दागिने घातले.

जसे कि कधी मोत्याचे तर कधी सोन्याचे. माझ्या आजीची साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे आयुष्याबद्दलचे तत्व आहे. माज्या आजीने सर्व मुलांना वाढवून आणि चांगले शिक्षण देऊन मोठे केले आहे.

ती स्वतः पण खूप शिकलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिकून मोठे व्हावे अशी तिची इच्छा असते. ती आम्हा सर्वाना जे काही सांगते ते आमच्या सर्वांच्या भल्यासाठीच असते. हे आम्हाला माहित आहे. म्हणून आम्ही तिचे म्हणणे कधीच नाकारत नाही.

प्रेमळ स्वभाव

maa माझी आजी करारी जरी असली तरी तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. आजीचे प्रेम ज्यांना मिळते ते खूप भाग्यवान असतात. आम्ही सर्व नातवंड आजीची खूप लाडकी आहोत.

माझी आजी आमच्यासाठी काहीपण करायला तयार असते. माझी आजी सुट्टीच्या दिवशी आमच्या सोबत सापशिडी, व्यापार इ खेळ खेळते आणि सर्व खेळांमध्ये तीच जिंकते. त्यामुळे आम्हाला सुट्टी लागली कि, कधीच बाहेर जावे लागत नाही.

माझ्या आजीमुळे आम्हाला घराचे सुख मिळते. आम्ही शाळेतून येतो तेव्हा आम्हाला आजी गरम – गरम पदार्थ बनवून खायला देते. ती खूप छान पदार्थ बनवते.

धार्मिक महिला

दादा – दादी और पोता –पोतीमाझी आजी ही एक धार्मिक महिला आहे . ती नेहमी सकाळीच लवकर उठून मंदिरात जाते. तिला देवाच्या किंवा धार्मिक कार्यात विशेष रुची आहे.

ती मला कधी – कधी आपल्या सोबत मंदिरात घेऊन जाते. तसेच सायंकाळी तुळशीला दिवा लावून, देवापुढे शुभंकरोती म्हणून आम्हाला अभ्यासाला बसायला सांगते.

समाज सेविका

माझी आजी ही एक समाज सेविका आहे. तिला हा समाज सेवेचा वारसा तिच्या आई – वडिलांकडून मिळाला होता. ते पण डॉक्टर होते आणि त्यांनी नेहमी गरिबांना फुकट औषधे दिली होती.दादी माँतसेच त्यांनी कितीतरी मुलांना आपल्या घरी ठेवून शिकवले होते. माझ्या आजीने सुद्धा गरीब मुलांना शिक्षण देऊन आणि त्यांची फी भरून त्यांना मोठे केले.

आज त्यातील काही मुले हि डॉक्टर, इंजिनियर झाली आहेत. ती मुले माझ्या आजीला खूप मानतात आणि भेटायला सुद्धा येतात. माझी आजी सर्वाना खूप आवडते.

निष्कर्ष:

मला माझी आजी एक आदर्श व्यक्ती वाटते. असे म्हटले जाते कि, एखाद्या यशसवी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. तसेच मला घडवणारी आणि माझ्या स्मरणात राहणारी अशी माझी आजी आहे. म्हणून मला माझी आजी खूप – खूप आवडते. तसेच माझी आजी हि सर्वात सुंदर आहे. मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो कि, प्रत्येक जन्मात मला अशीच आजी मिळू दे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *