maata

माझी आजी वर निबंध मराठी – वाचा येथे Majhi Aaji Essay in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

ज्या प्रमाणे आपल्या जीवनामध्ये आई – वडिलांचे महत्त्व असते. त्याच प्रमाणे आजी – आजोबा हे सुद्धा आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे असतात.

प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबात आजी – आजोबा हे असतात. परंतु काही लोकांना आजी – आजोबांचे प्रेम मिळत नाही. मुळातच आजी हे रसायनच वेगळे असते.

लहानपणी गोड – गोड  गोष्टी सांगणारी, गाणे – गात व पाठ थोपटीत झोपव्णारी आजी, तसेच घरातील कुणी रागावले तर आमची बाजू घेणारी, तशीच आजारपणात जागरण करीत उशाशी बसून राहणारी म्हणजे माझी आजी.

माझी आजी

दादी माँमाझ्या आजीच नाव सुलोचना आहे. तिचे वय ५५ वर्ष आहे. माझी आजी उंच आणि गोरीपान आहे. माझी आजी साधी सुती साडी, केसांचा अंबाडा आणि डोळ्याला चष्मा असे तिचे रूप आहे. माझी आजी खूप सुंदर आहे.

ती मला खूप करारी वाटते आणि ती ठाम मतांची आहे. तिला नेहमी नीटनीटके राहायला आवडते. ती आम्हा सगळ्यांना सुद्धा तसाच राहायला सांगते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे माझ्या आजीच्या आयुष्य बद्दलचे तत्त्व आहे.

प्रेमळ स्वभाव

माँ का कार्यमाझ्या आजीचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आहे. प्रत्येक घरातील व्यक्ती आजीच शब्द पाळतात. आम्ही सारी नातवंडे आजीची खूप लाडकी आहोत. माझी आजी आमच्यासाठी काहीही करायला तयार असते.

माझी आजी आमच्यासोबत कधी – कधी चेस, साप शिडी, व्यापार इत्यादि। अन्य प्रकारचे खेळ खालते. या सर्व खेळांमध्ये माझी आजीच जिंकते. त्यामुळे आम्हाला सुट्टी असली कि, कुठेही बाहर जावे लागत नाही.

माझी आजी आम्ही शाळेतून आल्यावर आम्हाला गरम – गरम खायला देते. ती खूप छान – छान पदार्थ बनवते. त्यामुळे शाळेत आमचा डबा बाकीची मुले खातात. तिच्या लाड करण्यावर माझी आई चिडते. ती नेहमी म्हणत असते कि, तुम्ही त्यांना लाडावून ठेवले आहे.

तेव्हा ती तिला सांगते कि, मुलांना एक तरी स्थान असा मिळायला हव जिथे त्यांच्या मनासारखं होईल. नाहीतर मुले बंडखोर होतात.

घरगुती औषधांची पारख  

Majhi Aaji माझ्या आजीला लहान मुलांच्या आजारावर चांगली घरगुती औषधे पण खूप माहित आहेत. आमच्या घरामध्ये कोणी लहान मुल आले कि, ती त्या मुलाला अगदी आपल्या मुलांप्रमाणे करते.

त्याला तेल लावून, अंघोळ घालून, सर्दी – खोकल्यावर काढा देऊन तसेच औषधी गुटी देणे अशा प्रकारच्या काळजी घेते. माझ्या आजीमुळे आम्हाला डॉक्टरकडे जायची गरज लागत नाही. तसेच आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तिच्या ज्ञानाचा लाभ होतो.

माझी आजी कधीही कोणाकडून पैसे घेत नाही. आमच्या घरातील कामवाली बाईला सगळ्यात आधी खायला देते.  तिला कधी बरे नसले तर औषधे देते आणि गरम खायला देते. अशा प्रकारे ते माणुसकी जपत असते.

समाजसेविका

social work माझी आजी ही एक समाज सेविका आहे. तिला समाज सेवेचा वारसा हा तिच्या वडिलांकडून मिळाला होता. ते एक डॉक्टर होते आणि त्यांनी नेहमी गरिबांना मदत केली. ते गरिबांना फुकट औषधे देत असत.

तसेच त्यांनी आपल्या घरी गरीब मुलांना ठेऊन शिक्षण दिले. माझ्या आजीने सुद्धा गरीब पण हुशार मुलांना शिकवले. त्यांची फी शाळेमध्ये जमा केली. त्यापैकी आज कितीतरी मुले डॉक्टर, इंजिनियर झाली आहेत.

ही सर्व मुले आजही आजीला खूप मानतात आणि भेटायला सुद्धा येतात. माझ्या आजीला माणसांची खूप आवड आहे. ती सर्वाना नेहमी चांगला सल्ला देते आणि मार्गदर्शन सुद्धा करते.

निष्कर्ष:

माझ्यासाठी माझी आजी ही एक आदर्श व्यक्ती आहे. मला माझ्या आजीवर खूप अभिमान आहे. कारण देवाने मला तिच्यासारखी आजी दिली. माझ्या आजीने मला दिलेले संस्कार आणि शिकवण मी कधीही विसरू शकत नाही. म्हणून मला माझी खूप – खूप आवडते. अशी आहे माझी गोड – गोड आजी.

For any other query regarding the Majhi Aaji Essay in Marathi Language, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment