प्रस्तावना:
स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं आहे की, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे खरोखरच सत्य आहे. या संपूर्ण जगामध्ये दैवी नातं जर कोणत असेल तर ते – आई. कारण कोणतेही मूळ आईशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.
आई हा एक खूप सोपा शब्द आहे. परंतु त्या शब्दामागे खूप माया दडलेली आहे. आईमध्ये संपूर्ण जगच सामावलेलं आहे. आपल्याला जन्म देऊन या जगात आणणारी आई ही एखाद्या देवाचे रूपच आहे.
आईची निर्मिती
आई हे ईश्वराचं दुसरं रूप समजलं जात. कारण देवाने आईला यासाठी बनवलं आहे की, ईश्वर हा प्रत्येक मुलासोबत नाही राहू शकत म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे.
आई म्हणजे –
आई म्हणजे ममता, आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम होय. जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या मुलाची आई बनते.
आई हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून माणसाच्या जीवनात सर्वात जास्त महत्व आहे.आई ही वात्सल्याचा अविरत वाहणारा झरा आहे. साऱ्या जगतामध्ये आई हे दैवत थोर आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत आई ही दोन अक्षरे कोरलेली आहेत. त्याच प्रमाणे बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी आणि आपल्या जीवनातील सर्वात पहिला गुरु म्हणजे आई होय.
माझी आई
माझ्या आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती आहे. ती सकाळी सगळ्यांच्या आधी उठते. कुटुंबातील सगळ्यांसाठी नाश्ता बनवते आणि त्यानंतर आपल्या कामना सुरुवात करते. त्याच प्रमाणे माझा दिवस सुद्धा माझ्या आईसोबतच सुरु होतो. ती मला सकाळीच अंथरुणावरून उठवते.
शाळेची तयारी
मी शाळेत जाऊ लागल्यापासून ती माझ्या शाळेची तयारी करते. माझे छोटेसे दफ्तर आणि त्यात पोळी – भाजीचा डबा द्यायची.
संध्याकाळी मी शाळेतून घरी आल्यावर मला गरमा – गरम नाश्ता बनवून द्यायची, ते खाऊन मी खेळायला पळायचो. ती मला नेहमी हात – पाय धुऊन घरात यायला सांगायची.
कुटुंबाचा आधार
माझी आई कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेते. घरात जर कोणाला बरे नसले तर ती त्याची देखभाल करते.
माझी आई कुटुंबाच्या चांगल्यासाठी ती हसऱ्या मुखाने सर्वकाही बलिदान करते. माझी आई कुटुंबासाठी बरेच काही करते. माझी आई ही माझ्या कुटुंबाचा आधार आहे.
नैतिक मूल्य
माझी आई मला नैतिक मूल्य शिकवते. आज मी माझ्या आईच्या नैतिक शिक्षणातच वाढलो आहे. तिने मला आयुष्याच्या प्रत्येक पावलात वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
माझी आई माझ्या प्रत्येक भावना समजून घेते आणि अडचणीच्या काळात मला मदत देखील करते. तसेच माझ्या चांगल्या क्षणांमध्ये मला प्रेरणा देते. माझे आजोबा आईला ‘कुटुंबाचा व्यवस्थापक’ म्हणतात.
शिक्षकची भूमिका
माझी आई मला गृहपाठ करण्यास मदत करते. जर मी कधी – कधी अभ्यास करताना अडकलो तर माझी आई एक शिक्षकांची भूमिका निभावते. ती शिक्षकांप्रमाणे मला समजावून सांगते. तशीच माझी प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी मदत करते.
जीवनाचा अविभाज्य भाग
माझी आई आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे मला कधी समजलंच नाही होत. आई किती सहजपणे आपली कर्तव्ये पार पाडत आपली आवश्यकता बनून जाते.
मला हे तेव्हा समजलं जेव्हा माझी आजारी पडली होती. आई बरोबर मला संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं होत.
निष्कर्ष:
माझी आई ज्या प्रमाणे माझ्या बरोबर एक सावलीप्रमाणे उभी राहिली त्याच प्रमाणे मला सुद्धा तिच्यासोबत सावलीसारखे उभे राहायचे आहे. मला माहित आहे की, आज मी तिच्यामुळे हे सुंदर जग पाहू शकलो. म्हणून मी माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या आईची सेवा करू इच्छितो. माझी आई ही मला खूप – खूप आवडते आणि मी आईवर खूप प्रेम करतो.