प्रस्तावना:
आई ही ईश्वराची एक सर्वोत्त्कृष्ट रचना आहे. आईसारखा त्याग आणि प्रेम दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. आईशिवाय कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.
कारण ईश्वराने आईची निर्मिती यासाठी केली आहे की, भगवान सर्व मुलांसोबत नाही राहू शकत. म्हणून त्याने आईला बनवल आहे. या आईमध्ये संपूर्ण जगच सामावलेल आहे. आपल्याला लहान पणापासून ओंजारून – गोंजारून खायला प्यायला देणारी आई ही प्रत्यक्ष रूपात एक अन्नपूर्णा असते.
ती रात्रभर जागून आपली सेवा करते. आई ही आपल्यावर कधी माया करते तर कधी रागावते. परंतु निस्वार्थपणे आपल्या चांगल्याच विचार करते. अशीच माझी आई एक सामान्य व्यक्ती आहे.
म्हणून स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे अगदी खर आहे. कारण आपल्याजवळ खूप पैसा आहे. पण आपल्या डोक्यावर मायेन हात फिरवणारी आईच नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे.
माझी आई
माझी आई खूप सुंदर आहे. माझ्या आईचे नाव अंजली आहे आणि तिचे वय ३५ वर्ष आहे. माझ्या आईचे डोळे हे हिरणीसारखे सुंदर आहेत आणि केस खूप सुंदर आणि लांब आहेत.
ती नेहमी आपल्या कामांमध्ये व्यस्त असते. ती सकाळीच सगळ्यांच्या आधी उठून आपल्या कामांना सुरुवात करते. तिला मी लहान पणापासून बघितलं ती खूप कष्ट करते.
प्रभावशाली व्यक्ती
माझी आई माझ्यासाठी एक सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. माझ्या आईची मी प्रशंसा आणि आदर करतो. माझी आई माझ्या जीवनातील सर्वत पहिला गुरु आहे. ती माझी काळजी घेते आणि आपले जीवन माझ्यासाठी समर्पित करते. माझ्या आईला माझ्या कुटुंबाचे व्यवस्थापक म्हटले जाते. माझी आई कुटुंबातील प्रत्येक वस्तूचे व्यवस्थापन करून ठेवते. ती आम्हा सर्वांसाठी मधुर जेवण बनवते.
नैतिक शिक्षणात
आज मी आईच्या नैतिक शिक्षणात वाढलो आहे. कारण तिने मला पावलोपावली मार्गदर्शन केले आहे. माझी आई मला माझ्या चांगल्या क्षणांमध्ये प्रेरणा देते. ती मला शिस्तबद्ध, वेळेवर आणि विश्वासार्ह व्यक्ती म्हणून शिकवते.
माझी आई हि आमच्या कुटुंबासाठी एका वृक्षाप्रमाणे अणे. कारण जसा एक वृक्ष इतरांना छाया पारडं करतो. तशीच माझी आई आम्हाला छाया देते.
मायेचा सागर आणि देव
माझी आई माझ्यासाठी मायेचा सागर आणि देव सुद्धा आहे. माझ्या आईची माझ्यावर असणारी मायेची तुलना कधीच करता येणार नाही. आपल्याला कधीहि काहीही वस्तू लागली तरी आपल्या ओठावर येणार सर्वात पहिला शब्द म्हणजे – आई.
माझी आई सर्वात चांगली मैत्रीण
माझी आई माझ्या जीवनात महत्वाच्या भूमिका निभावते. माझी आई ही एक शिक्षक, मार्गदर्शक आणि एक चांगली मैत्रीण सुद्धा आहे.
जेव्हा मी एखाद्या अडचणीत असतो तेव्हा ती माझ्या पाठीशी ढालीप्रमाणे खंभीर उभी राहते. आज मी जो काही आहे ते फक्त माझ्या आईमुळेच शक्य झालं आहे.
कारण तिने मला माझ्या आयुष्यात यश आणि अपयशाच्या वेळी माझ्या सोबत उभी राहिली. तिच्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.
शिक्षकाची भूमिका
मला माझी आई नैतिक मूल्य शिकवते. कधी – कधी मी अभ्यास करत असताना अडकतो किंवा काही प्रश्न मला सुटत नाहीत. तेव्हा माझी आई शिक्षकांची भूमिका निभावते. माझी प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी माझी मदत करते.
निष्कर्ष:
माझी आई खुप दयाळू आणि मायाळू स्त्री आहे. आज आईमुळेच मी हे सुंदर जग पाहू शकलो. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करतो. तसेच मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आईची सेवा करू इच्छितो. मला माझी आई सर्वात प्रिय आहे. म्हणून आईचे आभार मानण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये १३ मे ला दरवर्षी ‘मातृ दिवस’ साजरा केला जातो.