माझा परिवार वर निबंध – वाचा येथे Majha Parivar Essay In Marathi

प्रस्तावना:

माझा परिवार खूप मोठा आहे. आजी आजोबा पासून ते काका काकी त्यांची मुले म्हणजे ४ पिढ्या पहिल्या आम्ही. परिवार हि खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यात.

माझा परिवार

परिवार हा सर्वानाच असतो. आई बाबा ताई दादा हा आपला एक छोटा परिवार झाला पण आजी आजोबा काका काकी मामा मावशी त्यांची मुले हि सर्व आपली भावंडे. नाती खूप महत्वाची आहेत खरंच. परिवार नसेल तर आपले या जगात आपले म्हणणारे कोणीच नसते. ज्यांना परिवार नाही ते नेहमीच या सुखाला मुकतात.

त्यांना सहज नाही होत सांगायला आमचा कोणी परिवार नाही. जे चार ओळखीची माणसे असतील तोच आमचा परिवार. माझे आजी आजोबा आमच्या सोबतच राहतात.

सगळे म्हणतात आपल्या परिवारात वयस्कर व्यक्ती असणे खूप गरजेचे असते.

कारण कधी कुठली वेळ कशी येईल हे सांगू शकत नाही. म्हणून कारण त्यांना आपल्या पेक्षा जास्त अनुभव असतो. आणि आपल्या पेक्षा त्यांनी आधी खूप जग पाहिलेले असते. म्हणून त्यांना विचारल्याशिवाय आपले आई बाबा कधीच कोणता निर्णय घेत नाहीत. हे आपण आपल्या घरात नेहमी पहिले असेल.

मोठा परिवार छोटा परिवार

आज काल लहान आणि छोटा परिवार सुखी परिवार समजला जातो. आई बाबा यांनी एक किंवा दोन अपत्य. बस एवढा परिवार पण ते मोठा समजतात. आजी आजोबा गावी ठेऊन ते स्वतः नोकरी साठी शहरात राहतात.

आणि आजी आजोबा कधी तरी सुट्टी साठी म्हणून किंवा आम्ही वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणार. त्याने आजी आजोबा पण खुश होतात.

पण हे कितपत योग्य आहे. कारण आता असे समजले जाते कि नोकरी निम्मित आई बाबा बाहेर राहणार आई वडिलांची काळजी कोण घेणार म्हणून त्यांना अनाथ आश्रम सारखे पर्याय शोधून काढतात.

पण आपला परिवार आपली नातवंडे आपल्या जवळ नाही हे त्यांना किती न सहन होणारी बाब आहे हे आपणास  कधीच समजू नाही शकणार.

परिवाराचे मार्गदर्शन

आपल्या परिवारात नेहमी आपले आई वडील आजी आजोबा असले पाहिजे. माझ्या परिवारात आमचीएकत्र परिवार आहे. आजी आजोबा काका काकी त्यांची मुले सर्व राहतात.

पण एक छान गोष्ट मी नेहमी पहिली आहे, घराचे कोणतेही निर्णय घेताना संपूर्ण परिवार एकत्र येऊनच घेतो. एकमेकांचे विचार एकूण मगच कोणताही महत्वाचा निर्णय घेतला जातो. किंवा काही अनुचित प्रकार जरी झाला तरी संपूर्ण परिवार त्याला समोर जातो.

मी नेहमी पहिले आई बाबा ना आजी आजोबांचा आदर करताना. नेहमी त्यांनी आम्हाला सुद्धा एकत्र परिवार संकल्पना शिकविली आहे. कारण त्यांचे अनुभव आपल्या साठी खूप मोलाचे अस्तरात. त्यांचे अनुभव आपल्या खूप उपयोगी पडतात. कारण ते सुद्धा त्या परिस्थितीतून गेलेले असतात म्हणून.

परिवाराची सफलता  

आई बाबा नेहमी सांगतात ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी खूप कष्ट करून त्यांना वाढवले आहे. गावावरून जेव्हा ते मुंबई सारख्या शहरात आले होते तेव्हा त्यांच्याकडे फक्त त्यांच्या आई ने १०० रुपये देऊन त्यांना पाठवले होते.

त्या १०० रुपयात खाणार काय आणि राहणार कुठे असा प्रश्न होता पण त्यांनी खूप मेहनत केली. मिळेल ते काम हातात घेतले. आणि आज त्यांनी ३ माजली स्वतःचे घर बांधले आणि एवढा मोठा परिवार उभा केला.

जर त्यांनी इतकी मेहनत करून हा परिवार उभा केला तर आई बाबाना माहित आहे कि ते किती सांभाळावे लागणार आहे. आणि आई बाबा ते नेहमी प्रयत्न करतात. कि हा परिवार कधी तुटू नये.

सारांश:

परिवार हा छोटा असो किंवा मोठा असो परिवाराची गरज प्रत्येक माणसाला असते. कारण त्याच्या शिवाय त्या एकट्या व्यक्तीचे काही अस्तित्व नाही.

Updated: March 17, 2020 — 1:23 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *