प्रस्तावना:
भारत हा माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी प्रतिज्ञा आपण नेहमीच शाळेत असताना प्रार्थनेच्या वेळी घेतो.
म्ह्णून हा भारत देश विविधता आणि संस्कृतीवाला देश म्हणून ओळखला जातो. माझा भारत देश हा सर्वात प्राचीन आणि महान देश आहे. या भारत देशाला अनेक नावांनी ओळखले जाते.
माझा भारत देश हा प्राचीन आणि महान असूनही तो विश्व प्रसिद्ध आहे. माझ्या भारत देशाचा जनसंख्येच्या दृष्टीने जगात दुसरा क्रमांक लागतो. तसेच माझी भारत भूमी ही स्वर्गाहून सुंदर आणि प्रिय भूमी आहे.
देशाला स्वातंत्र्य
आमच्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
तसेच २६ जानेवारी, १९५० ला माझा भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले.
विविध जाती आणि धर्माचे लोक
माझ्या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी इत्यादी. धर्माचे लोक एकसाथ राहतात. म्हणून या देशाला धर्मनिरपेक्ष देश असे म्हटले जाते.
भारत देशाची विविध नावे
माझ्या भारत देशाला प्राचीन काळी आर्यव्रत या नावाने ओळखले जात असे. तसेच माझ्या भारत देशाने सोन्याच्या पक्षी (सुवर्ण पक्षी) या नावाने आपली ओळख निर्माण केली होती. माझ्या भारत देशाला भारत हे नाव महान राजा दुष्यंत यांचा मोठा मुलगा भरत याच्या नावावरून पडले.
म्हणून माझ्या भारत देशाला भारत या नावाने ओळखले जाते. तसेच या देशात राहणारे लोक भारत देशाला हिंदुस्थान, भारत, इंडिया या नावानी पुकारतात.
महान पुरुषांची भूमी
माझी भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी मानली जाते. कारण या भारत भूमीवर अनेक महान साधू – संतांनी, विद्वानांनी, ऋषी – मुनींनी, नेत्यांनी जन्म घेऊन माझ्या भारत देशाला अधिक महान बनवलं आहे.
कृषिप्रधान देश
माझा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील मुख्य व्यवसाय शेती आहे. कारण भारत देशातील बहुतेक लोक गावामध्ये राहतात. तिथे शेती हा व्यवसाय करून आपली जीविका चालवितात. म्हणून भारतीय शेतकऱ्यांना ‘जगाचा पोशिंदा’ हि संज्ञा देण्यात आली आहे.
भारतीय संस्कृती
माझा भारत देश हा आपल्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. माझ्या भारत देशाची संस्कृती ही सगळ्या देशांच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. म्हणून त्याठिकाणची संस्कृती आणि परंपरा ही जगप्रसिद्ध आहे.
परदेशातील लोक भारतीय संस्कृतीचा खूप आदर करतात. माझ्या भारत देशामध्ये फक्त देवी – देवतांचीच नव्हे तर झाडांची, प्राण्यांची सुद्धा पूजा केली जाते.
पर्यटन स्थळ
दरवर्षी देश – विदेशातील लोक येथे फिरायला येतात. तसेच भारत देशामध्ये साजरे होणारे सर्व सण पाहायला संपूर्ण जगातून हजारो पर्यटक येतात.
निष्कर्ष:
माझ्या या भारत देशाला थोर आणि पुण्यवान माणसे लाभली आहेत. आज जगाच्या नकाशामध्ये माझा भारत देश आपल्या परंपरा आणि संस्कृती मुळेच ओळखला जात नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात मागे नाही. आजही माझा भारत देश सर्व संकटांवर मात करून प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. म्हणून माझा भारत देश मला खूप खूप आवडतो आणि मला सर्वात जास्त प्रिय आहे.