प्रस्तावना:
आपली भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी आहे. या भारत भूमीवर अनेक महान नेत्यांचा जन्म झाला आहे. जसे की लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, जवाहरलाल नेहरू इत्यादी अनेक महान नेत्यांनी जन्म घेऊन या भारत भूमीला अधिक पवित्र बनवले आहे.
त्या सर्व नेत्यांपैकी माझे आवडते नेता महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य या भारत देशाला आजादी मिळवून देण्यासाठी समर्पित केले.
त्यांच्या कार्यामुळे भारावून गेलेले देशवासी त्यांना बापू या नावाने संबोधित असत. म्हणून त्यांचे नाव हे संपूर्ण देशात मोठ्या आदराने घेतले जाते.
जन्म
आपल्या भारत देशाला अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी हे राजकोटच्या दिवाण होते आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांची आई ही एक धार्मिक महिला होती.
शिक्षण
महात्मा गांधीजीनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथून पूर्ण केले. त्यानंतर सन १८८८ साली कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी साली इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली.
सन १८९१ मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकीली करायला सुरुवात केली. महात्मा गांधीजींच्या आयुष्यात एकदा असे वळण आले की, त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तिथे जाऊन त्यांनी पाहिले तर ब्रिटिश लोक भारतीयांवर खूप अत्याचार करत होते.
सत्याग्रह धोरण
महात्मा गांधीजींनी जहालवादी धोरण बाजूला ठेऊन सत्याग्रह धोरणाचा अवलंब केला.
चंपारण्य सत्याग्रह
महात्मा गांधीजींनी भारत देशात सर्वप्रथम सत्याग्रह केला तो म्हणजे एप्रिल १९१७ साली बिहार मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला.
बिहार मधील जमीनदार हे म्हणजेच ब्रिटिश लोक हे गरीब शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने नीळ उत्पादन करून घेत असत. त्या बदल्यात त्यांना काहीही देत नसत. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम हालाखीची झाली होती.
तेव्हा महात्मा गांधीजीनी हे पाहताच त्या विरोधात लढा केला. त्यांनी १९१८ मध्ये कायदा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
खेड सत्याग्रह
त्यानंतर सन १९१८ साली जेव्हा गुजरातमधील खेडा गाव दुष्काळग्रस्त झाला होता. त्यावेळी महात्मा गांधीजींनी खेड्यातील शेतकऱ्यांसाठी दुसरा सत्याग्रह केला. या सत्याग्रहा दरम्यान महात्मा गांधीजींना सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली.
तसेच महात्मा गांधीजींनी १३ एप्रिल, १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांना मिळालेल्या कैसर – ए – हिंद पदवीचा त्याग केला. त्यांनी सन १९२० साली असहकार चळवळीचा जाहीरनामा जाहीर केला.
भारत छोडो आंदोलन
महात्मा गांधीजींनी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ८ ऑगस्ट, १९४२ साली भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला आणि ९ ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरु झाले.
आपल्या भारत देशाला ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळवून द्यायचे हेच त्यांचे ध्येय होते. गांधीजींची सर्व आंदोलने यशस्वी झाली. अखेर तो दिवस उजाडला होता आणि भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.
मृत्यू
महात्मा गांधीजींच्या एक हिंदू कार्यकर्त्यानेच ३० जानेवारी, १९४८ साली बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.
तो दिवस संपूर्ण भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी काळा दिवस होता. आपल्या संपूर्ण जगात शांततेचा आणि अहिंसेचा प्रचार करणारे शांतिदूत या संपूर्ण जगाला सोडून गेले होते.
निष्कर्ष
महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व असणारे थोर पुरुष या भारत देशाला लाभले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भारत मातृभूमीसाठी अर्पण केले.
महात्मा गांधीजींनी दाखवून दिले की, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येते. त्यांची शिकवण ही संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरली. म्हणून महात्मा गांधी हे माझे आवडते नेता आहेत.