प्रस्तावना:
भारत देश हा आपल्या संस्कृतीसाठी आणि विविधतेसाठी संपूर्ण जगात सर्वात प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून महिलांना समाजात आदर दिला जात असे. परंतु देशावरविदेशी आक्रमण होताच देशाची स्थिती चिंतादायक बनली.
त्यांना समाजात आदर किंवा सम्मान दिला जात नसे. भारत देशाला पुरुष प्रधान देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये सर्वात जास्त पुरुषांना स्थान दिले जाते. त्यांना सर्व अधिकार दिले जातात. परंतु महिलांना जास्त महतव दिले जात नाही.
लोकांची समजूत
काही लोक हे पुरुषांना सर्वकाही मानतात. त्यांना असे वाटते की, मुलगा हा आपल्या वंशाला पुढे नेणारा असतो.
तर काही लोक हे मुलीला परक्या घरच धन समजल जात. म्हणून ते मुलींना आईच्या गर्भामध्ये मारतात.
विविध प्रथा
प्राचीन काळी आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रथा रुढ होत्या. जसे की सती प्रथा, बाल विवाह, हुंडा प्रथा, कन्या भ्रूण हत्या इत्यादो. या सर्व प्रथांना महिलांना सामोरे जावे लागत असे. काही लोक हे आपल्या गरिबीमुळे महिलांची हत्या करत असत.
तर काही लोक हे मुलीच्या लग्नाला द्यावा लागणारा दहेज नसल्यामुळे मुलींची गर्भातच हत्या करत असत. या सर्व समस्यांना महिलांना सामोरे जावे लागत असे.
महिला सुरक्षाची आवश्यकता
आज आपल्या देशामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार तसेच त्यांची हत्या करणे हे सर्व प्रकार जास्त प्रमाणात दिसून येतात. तसेच त्यांना ब्लॅकमेल केले जाते. या सर्व कारणांमुळे महिला या असुरक्षित आहेत.
वर्तमान युगातील महिला
प्राचीन काळी महिलांना घराच्या बाहेर पडायला देत नसत. त्यांच्यावर घराची जबाबदारी टाकत असत. त्यांना शिक्षणासाठी सुद्धा बाहेर पाठवले जात नसे.
परंतु आज महिला चार भिंतींच्या बाहेर निघून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. तसेच पुरुषांच्या कंध्याला कंधा मिळवून काम करीत आहेत. आजची महिला आपल्या घराबरोबर ऑफिसची सुद्धा जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडत आहे.
महिलांच्या सुरक्षतेसाठी कायदे
आज महिलांच्या सुरक्षतेसाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. जसे की महिला संरक्षण कायदा, बाल विवाह प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा इत्यादि . अनेक कायदे लागू करण्यात आले आहेत.
हुंडा प्रतिबंध कायदा
सन १९६१ च्या कायद्याने हुंडा मागणे किंवा हुंडा घेणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. हा कायदा सर्वात जास्त प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये ३०४ (ख) आणि ४९८ (क) ही नवीन कलमे अंतर्भूत करण्यात आली.
महिला संरक्षण कायदा
कुटुंबामध्ये होणारे छळ यावर प्रतिबंधक कायदा हा महिलांना कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देतो.
यामध्ये नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ति देणे तसेच भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार देणे आणि कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्याची तरतूद ही केली जात आहे.
बाल विवाह प्रतिबंध कायदा
बाल विवाहावर प्रतिबंध करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम लागू करण्यात आला. लग्नाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे वय २१ वर्षापेक्षा कमी असल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा सर्व धर्माच्या लोकांना समान लागू करण्यात आला आहे.
निष्कर्ष:
आज महिलांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने महिला सबलीकरणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. तसेच समाजातील अन्य गुन्ह्यांपासून महिलांना वाचविण्यासाठी तसेच महिलांमधील असुरक्षितता कमी करण्याची आवश्यकता आहे.
म्हणून देशातील सर्व लोकांनी महिलांना पुरुषांप्रमाणेच अधिकार आणि हक्क दिले पाहिजेत.म्हणूनच सरकार आणि जनतेच्या मदतीने महिला समाज दडपणापासून वाचवू शकतो.