महिला सबालिकरण वर निबंध – वाचा येथे Mahila Sablikaran Essay In Marathi

प्रस्तावना:

महिला सबालिकरण म्हणजे काय? याचा विचार सर्वांनाच असेल कारण आता पर्यन्त तरी महिला ही सबला नाही तर अबला नारी होती.

महिला सबलिकरन म्हणजे काय?

महिला सबालिकरण म्हणजे काय, तर याचा एकच अर्थ होतो तो म्हणजे की महिला ही सर्व भूमिका बजावत असते. आई, बहीण, पत्नी आणि या भूमिका बजावत असताना तीने स्वतचा कधी विचार नाही केला किवा आपणी नाही केला.

स्त्री ही कधी घरचा उंबरठा ओलांडून जाऊ शकत नाही. तिला घरच्या मर्याचा पळाव्या लागतील. ती जर शिकली तर घरची इज्जत जाईल. लोक गावं बाहेर काढून टाकतील. अश्या बोचट विचारानी आपला समाज हा महिलेला फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच समजत होता.

महिला अबला?

महिला ही कधीच अबला न्हावती. जर ती अबला असती तर ती आपली गृहस्थी आणि आपला परिवार सुधा कधीच सांभाळू शकली नसती.

तिला अबला बनविले कोणी? आपणच आणि आपलेच अवती भोवतीचे लोक. ज्या लोकांनी नेहमी स्त्री ही आपल्या घरची इज्जत असते तिने घराबाहेर जाता कामा नये असे नेहमी पुरुषप्रधान समाजाला वाटते. लैंगिक अत्याचार, हुंडाबळी हे प्रकारच तिला अबला बनवीत होते.

महिला सबला

महिलेला अबला आपल्या जुन्या चालीरीतनी बनविले. तिचा मान सन्मान आपल्या हातात होता. पण तिला चूल आणि मूल इथपर्यंत आपण ठेवले.

त्यातून सुधा ती बाहेर पडली. सावित्री बाई फुले, मदर टेरेसा, इंदिरा गांधी सारख्या सक्षम महिला आपल्या देशाला मिळाल्या.

स्त्री ल दुय्यम स्थान
आज आपण किती ही विचार केला तरी स्त्री ल नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. आपल्या घरातील महिला आपल्या पेक्षा वेतन जास्त घेते असे पुरुषाला दिसले की त्याच्या पुरुश्वतेला ठेस लागते.

समान दर्जा तिला मिळाला आहे का? मिळाला आहे पण कुठे तरी ती अजूनही मागेच आहे. तिला नेहमी तिची जागा कुठे आहे दाखवून दिले जाते.

महिलांसाठी नवीन कार्यक्रम

आपली मुलगी शिकली तर आपलाच आधार होईल हे आता काही जणांना समजले आहे. जर ज्योतिबा फुले यांनी जर आपल्या पत्नी सावित्री बाईंना शिक्षण दिले नसते तर त्या कधीच माहिलांची पहिली शाळा काढू शकल्या नसत्या.

आज महिलांसाठी खूप कार्यक्रम राबविले जातात. कारण शहरांमध्ये जारी महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत असली तरी ग्रामीण किवा आदिवासी समाजात अजूनही बालविवाह, असे प्रकार घडत आहेत. म्हणून आपल्या सरकारने सुधा त्या साठी खूप नवनवीन उपक्रम चालवीत आहेत.

महिला सशक्तीकरण

आज ची महिला ही खूप सशक्त झाली आहे. ती आज वैद्यांनीक, डॉक्टर, पायलाट बनली आहे. ती सुधा पुरुषांसोबत काम करत आहे.

ती आपले घर, पती, मुले नीट सांभाळून बाहेरच्या जगात सुद्धा ती आपली भूमिका खूप छान रित्या बजावत आहे.

स्त्री ही नवदुर्गा

देवीला जसे आपण मनोभावे पूजतो. तिची पुजा अर्चा करतो. तिला मान देतो. मग आपल्या घरातील आई, पत्नी, बहीण हिला का दुजा भाव देतो. का तिचा आपमान करतो. एका मूर्ति मध्ये आणि एका सजीव व्यक्ति मध्ये इतका दुजा भाव का?

महिला सबलिकरनाचे कार्यक्रम

आज असे खूप आदिवासी गाव आहेत जिथे आपली प्रगति झालेली नाही. म्हणून काही संस्थांनी ही कामे हाती घेतली आहेत. काही संस्था अश्या गावात जाऊन महिलाना शिलाई काम, भारत काम, टोपल्या बनविणे, महिला बचत गट असे कार्यक्रम राबवून महिलाना पुढे आणत आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागात सुधा महिला सक्षम बनल्या आहेत. स्वतः पैसे कमवून आपले घर खूप छान पणे सांभाळत आहेत.

या संस्थांमुळे कित्येक अशिक्षित महिलाना रोजगार मिळाला आहे. आणि तेच शिक्षण आपल्या पुढील पिढीला सुधा देत आहे.

सारांश:

स्त्री ही सबला आहे. ती सशक्त आहे.

Updated: मार्च 23, 2020 — 1:49 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *