Mahatma Jyotiba Phule

महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध – वाचा येथे Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपली भारत भूमी ही महान पुरुषांची आणि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीवर अशा महान पुरुषांचा जन्म झाला आहे ज्यांनी अनेक यातना सहन करून सामाजिक सुधारणा केल्या. अशा महान पुरुषांपैकी एक होते – महात्मा फुले.

महात्मा ज्योतिराव फुले हे एक आद्य समाज सुधारक होते. त्यांनी भारतीय समजत प्रचलित असलेल्या अनेक वाईट प्रथा दूर करण्यासाठी संघर्ष केला. अस्पृश्यता, महिला शिक्षण, विधवा विवाह आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण असे कार्य केले.

जन्म

JYOTIBA PHULE 1

महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ साली झाला. त्यांचे संपूर्ण नाव ‘ज्योतिराव गोविंदराव फुले’ असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव ‘गोविंदराव’ आणि आईचे नाव ‘चिमणाबाई’ असे होते. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील ‘कटगुण’ हे होते.

ज्योतिराव फुले यांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे ते फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर पुढे तेच नाव रूढ झाले. ज्योतिराव फुले हे नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

शिक्षण

JYOTIBA PHULE

महात्मा ज्योतिराव फुले यांना ब्राह्मणेत्तर समजला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्यानंतर गोविंदराव फुले यांनी सन १९३४ साली महात्मा फुले यांना मराठी शाळेत घातले. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर भाजी विक्रीचा धंदा केला.

सन १८४२ साली माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी ‘स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये’ प्रवेश घेतला. ते अतिशय हुशार आणि बुद्धी तल्लख असल्यामुळे त्यांनी ५ ते ६ वर्षातच आपला अभ्यासक्रम पूर्ण केला.

विवाह

महात्मा ज्योतिबा

महात्मा ज्योतिराव फुले हे १३ वर्षाचे असताना त्यांचा विवाह हा नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई हिच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे वय ८ वर्ष होते.

शैक्षणिक कार्य

शैक्षणिक कार्य

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्व लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यातील काही ओळी प्रसिद्ध आहेत.

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा ज्योर्तिंराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. सन १८४८ साली पुण्यातील बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.

त्या शाळेमध्ये शिक्षिकेची जबाबदारी ही सावित्रीबाई फुले यांच्यावर टाकली. तसेच त्यांनी सन १८५२ साली पुण्याच्या वेताळ पेठेत अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरु केली. त्यांच्या या कार्याला समाजातील सर्व लोकांकडून विरोध होत असे.

महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन शिक्षण कार्य करण्यास प्रवृत्त केले. स्वतंत्रपणे स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय होते.

साहित्य आणि लेखन

शैक्षणिक कार्य 1

महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर, १८७३ साली ‘सत्यशोधक समाजाची स्थापना’ केली.

तसेच त्यांनी समाजाचे मुखपत्र म्हणून १ जानेवारी, 1877 “साली” ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले.

त्यांनी इ. स १८७३ ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला.

महात्मा फुलेंचा ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा अप्रकाशित ग्रंथ आहे.

इ. स १८६९ साली त्यांनी ‘ब्राह्मणांचे कसब’ हा “लेखसंग्रह” लिहिला.

सन १८८३ साली ‘शेतकऱ्यांचा असूड’ हा लेखसंग्रह लिहिला.

सन 1873 साली अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा केला.

निष्कर्ष:

महात्मा ज्योतिराव फुले हे एक मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक सुद्धा होते. महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण जीवन समाज कार्य करण्यासाठी अर्पण केले. तसेच स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी समर्पित केले.

भेदभाव नसलेली समतावादी, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे ज्योतिबा फुले यांचे नाव अविस्मरणीय आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे समाजाचे मजबूत रक्षक म्हणून त्यांची आठवण कायम राहील.

Leave a Comment