प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान नेत्यांच्या या पुरुषांचा देश आहे. या भारत भूमीवर अनेक नेत्यांचा जन्म झाला आहे. ज्यांनी आपले संपूर्ण जीवन या भारत देशासाठी बलिदान केले आहे. त्यापैकी एक आहेत – महात्मा गांधीजी.
महात्मा गांधीजी हे एक भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ, समाज सुधारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते. म्हणूनच त्यांना ‘राष्ट्रपिता’ व ‘बापू’ या नावाने संबोधले जाते.
महात्मा गांधी यांचा जन्म
आपल्या अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करून आणि आंदोलनाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर,१८६९ साली गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते.
शिक्षण
महात्मा गांधीजीनी सन १८८८ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे जाऊन त्यांनी बॅरीस्टरची पदवी प्राप्त केली. महात्मा गांधीजीनी सन १८९१ मध्ये भारतात येऊन आपल्या वकिलीला सुरुवात केली.
परंतु त्यांच्या जीवनात एक असा दिवस आला कि, त्यांना दक्षिण आफ्रिकेला जावे लागले. तेथे जाऊन त्यांनी वकिली करू लागले. तिथेही जाऊन त्यांनी बघितलं तर भारतीय लोकांवर ब्रिटीश सरकार भरपूर अत्याचार करत होते.
तेव्हा महात्मा गांधीजीनी भारतीय लोकांना साथ दिली. त्यांनी सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात केली आणि भारतीय लोकांना त्यांचे अधिकार आणि हक़्क़ मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक आंदोलने चालवली.
सत्याग्रह आणि आंदोलने
महात्मा गांधीजी सन १९१४ मध्ये भारतात परतले. सन १९१५ पासून ते महात्मा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी सन १९१७ मध्ये चम्पारण येथे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. महात्मा गांधीजीनी सन १९२० पासून सन १९२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलनाला सुरुवात केली.
तसेच सन १९३० पासून सन १९३२ मध्ये दांडी येथे मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदे भंगाला सुरुवात केली. त्यांनी सन १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन इ. सर्व आंदोलनामध्ये महात्मा गांधीजींचे नेतृत्व आणि भूमिका बजावली.
त्यांनतर महात्मा गांधीजींना अटक झाली आणि त्यांना पुण्याच्या आगाखान पॅलेस मध्ये देवण्यात आले. त्यांना ६ मे, १९४४ ला सोडण्यात आले. त्यांनी अनेकदा उपोषण करीन ब्रिटीश सरकारला बंदिस्त केले. महात्मा गांधीजींच्या प्रयत्नांमुळे अखेर १५ ऑगस्ट, १९४७ को स्वातंत्र्य मिळाले.
गांधी जयंती
आमच्या भारत देशात दर वर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. या दिवशी शाळा, महाविद्यालय मध्ये गांधी जयंती साजरी करतात. त्याच बरोबर त्यांची जयंती जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी केली जाते.
महात्मा गांधीजींचा मृत्यू
३० जानेवारी, १९४८ ला जेव्हा महात्मा गांधीजी दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून लोकांबरोबर फिरत होते त्यावेळी नथुराम गोडसे याने गोळी मारून त्यांची हत्या केली. नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू आणि जहालमतवादी होता.
त्यानंतर त्याच्यावर खटला दाखल करून त्याला आणि त्याचा साठी नारायण आपटे याला दोषी ठरवण्यात आले. त्या दोघांना १५ नोव्हेंबर, १९४९ ला फाशीची शिक्षा देण्यात आली.
निष्कर्ष:
महात्मा गांधीजी हे के स्वतंत्रता सेनानी होते. ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणूनच शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजीच्या बाबतीत असे म्हटले आहे कि, असा कुणी एक महान व्यक्ती या धरतीवर निर्माण झाला होता. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अशा या महान व्यक्तीला या सुपुत्राला माझा शतशः प्रणाम.
मराठीवरील महात्मा गांधी निबंधासंबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.