प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान पुरुषांचा आणि स्त्रियांचा देश म्हणून ओळखला जातो. कारण या महान पुरुषांनी आपल्या भारत देशासाठी अशी आदर्श कामे केली आहेत जी आजही भारतीयांच्या लक्षात आहेत.
अनेक महान पुरुषांनी आपलं तन – मन – धन हे भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आत्मसमर्पण केले आहे. त्या सर्वांपैकी महत्तम गांधी हे एक होते. महात्मा गांधी हे एक युगपुरुष होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले.
जन्म
अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.
संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांचे वडील हे पोरबंदर येथे दिवाण म्हणून काम करत असत.
शिक्षण
महात्मा गांधी यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे पूर्ण केले. महात्मा गांधी सन १८८८ साली कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे जाऊन त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली.
सन १८९१ मध्ये भारत देशात परत आल्यानंतर त्यांनी आपल्या वकिलीला सुरुवात केली. परंतु त्यांच्या जीवनात असे एक वळण आले कि, त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तेथे जाऊन ते वकिली करू लागले.
तेथे पाहताच ब्रिटिश लोक भारतीयांवर खूप अत्याचार आणि अन्याय करत असत. म्हणून ते योगायोगानेच भारतीय लोकांच्या अधिकारांच्या आंदोलनात ओढले गेले.
खेडा सत्याग्रह
सन १९१८ मध्ये गुजरातच्या खेडा गावात भीषण पूर आला होता. त्यामुळे खेडा गावात दुष्काळाची समस्या निर्माण झाली होती. एवढ्या गंभीर संकटांना तोंड देऊन सुद्धा ब्रिटिश सरकारने भारतीय लोकांना कोणत्याही प्रकारची सूट दिली नाही.
तसेच त्यांना मदत करण्यास सुद्धा तयार नव्हते. हे पाहताच गांधीजींनी अहिंसक असहकार चळवळ सुरु केली. ज्यामुळे शेवटी ब्रिटिश सरकारला लोकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. म्हणून ही चळवळ ‘खेडा सत्याग्रह’म्हणून ओळखली जाते.
मिठाचा सत्याग्रह (दांडी यात्रा)
यामुळे ब्रिटिश सरकारच्या मिठाच्या कायद्याचा अवमान केला गेला आणि लोकांनी स्थानिक पद्धतीने मीठ बनविणे आणि विक्री करण्यास सुरुवात केली.
भारत छोडो आंदोलन
महात्मा गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह यशश्वी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारचा पाया हादरला. आपल्या भारत देशातून ब्रिटिशाना घालविण्यासाठी ८ ऑगस्ट, १९४२ साली महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरु केले. हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता.
या चळवळीमुळे देशात अनेक नागरी अवज्ञानाच्या चळवळी सुरु होत्या.भारत छोडो आंदोलनाचा ब्रिटिश सरकारवर इतका प्रभाव पडला कि, त्यांना हा देश सोडावा लागला. महात्मा गांधी आणि अनेक भारतीयांच्या संघर्षामुळे भारत देशाला १५ आगस्ट, १९४७ साली आजादी मिळाली.
महात्मा ही उपाधी
महात्मा गांधीजींना त्यांच्या महान कार्यामुळे आणि महानतेबद्दल महात्मा असे म्हटले जाते. जे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यभर केले. महात्मा गांधी हे एक स्वतंत्रता सेनानी आणि अहिंसक कार्यकर्ते होते.
त्यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन आयुष्यभर अहिंसेचा अभ्यास केला.
निष्कर्ष:
महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व असणारे थोर पुरुष या भारत देशाला लाभले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भारत मातृभूमीसाठी अर्पण केले.
महात्मा गांधीजींनी दाखवून दिले की, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येते. त्यांची शिकावं ही संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरली.