प्रस्तावना:
आमची भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भारत भूमीवर अनेक महान नेत्यांचा जन्म झाला आहे. त्यापैकी एक म्हणजेच – लोकमान्य टिळक हे आहेत.
“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे” आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे व ब्रिटीश सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते. लोकमान्य टिळक हे एक समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक, संपादक, लेखक आणि वक्ते होते.
लोकमान्य टिळक यांचा जन्म
त्यांचे मुल नाव केशव असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि हे आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक यांना बाळ या नावाने ओळखले जात असे.
लोकमान्य टिळक हे लहान पणापासून हुशार विद्यार्थी होते. त्यांना गणित विषयामध्ये अत्यंत रुची होती. लोकमान्य टिळकांना लहान पणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती.
शिक्षण
याच कॉलेजमधून त्यांनी सन १८७७ साली बी. ए ची परीक्षा उत्तीर्ण केली. सन १८७९ मध्ये एल. एल. बी करत असताना त्यांची ओळख आगरकरांशी झाली.
त्यामुळे समान ध्येयाने प्रेरित झालेल्या दोन व्यक्तींनी आपल्या मातृ भूमीची ब्रिटीश सरकारच्या पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी लोक जागृती आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्याला सुरुवात केली.
केसरी व मराठा वृत्तपत्रे
आगरकर हे केसरीचे संपादक झाले तर लोकमान्य टिळक हे मराठा चे संपादक बनले. तसेच लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी २४ ऑक्टोबर, १८८४ साली ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटीची’ स्थापन केली.
त्याच बरोबर त्यांनी २ जानेवारी, १८८५ साली संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज सुरु केले. तसेच त्यांनी सर्व लोकांच्या मनामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिव जयंती हे दोन उत्सव सुरु केले.
जहालवाद व मवाळवाद
लोकमान्य टिळक यांनी राजकारणात जहाल मात्वादाचा पुरस्कार केला. त्यांचा ब्रिटीश सरकारवर अजिबात विश्वास नव्हता. हिंदू लोकांना अर्ज विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळणार नाहीत व सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.
म्हणून त्यांनी पुढे जाऊन जहालवाद आणि मवाळवाद असे दोन गट पडले. जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केले. तसेच हे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य झाले होते. परंतु मावळ गटाने जहाल गटाची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली.
२४ जून, १९०८ साली लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यांना सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. लोकमान्य टिळकांनी मंडळे तुरुंगात ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला.
होमरूल लीगची स्थापना
भारतीय लोकांना हक्क देण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ केली पाहिजे. अशा मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी १ मी, १९१६ साली त्यांनी मुंबई प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली. त्यापुढे सप्टेंबर १९१६ मध्ये अॅनी बेझंट यांनी ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली. टिळकांची होमरूल लीग आणि अॅनी बेझंट या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या.
निष्कर्ष:
लोकमान्य टिळक यांचे स्वराज्यप्राप्ती हेच मुख्य ध्येय होते. १ ऑगस्ट, १९२० साली भारतातील एका तेजस्वी सूर्याचा असत झाला. असे हे थोर व्यक्तिमत्व असणारे स्वतंत्रता सेनानी या महाराष्ट्राला लाभले.