कबड्डी मराठी निबंध – वाचा येथे Kabaddi Essay in Marathi

प्रस्तावना:

आपल्या भारत देशात अनेक खेळ हे खेळले जातात. जसे की खो – खो, कबड्डी, हॉकी, टेनिस, चेस, फुटबॉल इत्यादि  अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.

काही खेळ हे देशामध्ये सर्वात प्रसिद्ध आहेत. त्याच प्रमाने कबड्डी हा एक मराठी मातीतला खेळ आहे. कब्बडी हा खेळ भारत देशाबरोबर भारताच्या उपखंडात सुद्धा खेळाला जातो.

कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातील आहे. परंतु हा खेळ आंतर राष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा एक सांघिक मैदानी खेळ आहे.

कबड्डी खेळाची विविध नावे

महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात कबड्डी या खेळाला हुतूतू या नावाने ओळखले जाते. तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू येथे चाडू – गडू या नावाने ओळखला जातो.

तसेच केरळमध्ये वंदिकली, बंगालमध्ये दो – दो आणि पंजाबमध्ये झबर गगने या नावाने ओळखला जातो. आज संपूर्ण जगात हबड्डी या खेळाचा प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे.

लोकप्रिय खेळ

कबड्डी हा जितका भारत देशामध्ये लोकप्रिय आहे तेवढाच हा खेळ भारत देशाच्या शेजारील नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशातही सर्वात लोकप्रिय आहे.

कबड्डी हा खेळ बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. तसेच मागील तीन आशियायी खेळात कबड्डी या खेळाला सामील करून घेतल्याने जपान आणि कोरिया या देशातही कबड्डी या खेळाची लोकप्रियता वाढली आहे.

कबड्डी खेळाची रचना

कबड्डी हा खेळ दोन संघांद्वारे खेळला जातो. प्रत्येक संघात ७ – ७ खेळाडू असतात. कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी एक मैदानाची आवश्यकता असते.

या मैदानाच्या मध्यभागी एक रेषा आखली जाते. या मैदानाला दोन भागात विभागले जाते. प्रत्येक मैदानाच्या दोन्ही बाजूना एक मीटर अंतरावर एक रेषा असते तिला लॉबी असे म्हटले जाते. प्रत्येक कोर्टात टच लाईन आणि बोनस लाईन असते.

कबड्डी खेळाचे नियम

कबड्डी या खेळात प्रत्येक संघात १२ किंवा ११ खेळाडू असतात. परंतु त्यातील ७ खेळाडू हे मैदानात उतरतात आणि बाकीचे खेळाडू राखीव म्हणून ठेवले जातात.

या खेळामध्ये जर एक खेडूळा दुखापत झाली तर त्या जागी राखीव खेळाडूला घेतले जाते. कबड्डी या खेळामध्ये नाणेफेक जिंकणारी टीममधील एक खेळाडू  प्रथम कबड्डी – कबड्डी म्हणत दुसऱ्या संघाच्या कोर्टात जातो.

हा खेळ साधारणतः २० – २० मिनिटांच्या दोन भागात खेळला जातो. तसेच कोर्ट बदलण्यासाठी ५ मिनिटांचा ब्रेक दिला जातो. त्याच प्रमाणे टाय झाल्यास पाच मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळला जातो. अशा प्रकारे हा खेळ खेळत असताना शेवटी ज्या संघाचे गुण जास्त असतात त्या संघाला विजेता संघ असे घोषित केले जाते.

कबड्डी खेळाचे लाभ

कबड्डी हा एक असा खेळ आहे ज्याला इतर खेळांप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता नसते. तसेच या खेळाला विशेष जागेची गरज भासत नाही. परंतु कबड्डी हा खेळ एका लहान ठिकाणी सुद्धा खेळला जाऊ शकतो. कबड्डी या खेळामध्ये चपळता आणि ताकद यांची आवश्यकता असते.

कबड्डी हा खेळ खेळल्याने आपले शरीर सदृढ आणि निरोगी राहते.

त्याच बरोबर निर्णय क्षमतेत वाढ होते.

कबड्डी या खेळामुळे आपल्याला धैर्य आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी वाढते.

तसेच परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते आणि अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते.

निष्कर्ष:

कबड्डी हा खेळ स्वस्त, साधा आणि सुरक्षित खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी पैश्यांची गरज भासत नाही. तसेच हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला खेळ आहे.

कबड्डी हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ आहे. त्याच बरोबर हा एक मनोरंजनाचे साधन आहे.

Updated: दिसम्बर 16, 2019 — 9:40 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *