जल प्रदूषण वर निबंध – वाचा येथे Jal Pradushan Marathi Essay

प्रस्तावना:

ज्या प्रमाणे मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज भासते. त्याचप्रमाणे त्याला आपले जीवन जगण्यासाठी पाण्याची गरज भासते.

हवा, अन्न. पाणी या तीन गोष्टी मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. मानव अन्नाशिवाय काही दिवस राहू शकतो. पण मानव पाण्याशिवाय जास्त दिवस नाही जगू शकत. पाणी हे मानवाच्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जसे पाणी मानवाच्या जीवनात गरजेचे आहे.

त्याच प्रमाणे सर्व सजीवांना सुद्धा आपले जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. परंतु आज मानव पाण्याचा गैरवापर करत आहे.

पाणी प्रदूषण –

नद्या, तलाव, समुद्र, विहीर, कालवे, सरोवर हे सगळे पाण्याचे स्त्रोत आहेत. जेव्हा हे सगळे पाण्याचे स्त्रोत दुषित होतात तेव्हा जल प्रदूषणाची समस्या निर्माण होते. पाणी प्रदूषित झाल्याने अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात.

पाण्याचे प्रकार

आपल्या धरतीवर दोन प्रकारचे पाणी मिळते. एक म्हणजे गोड व स्वच्छ आणि दुसरे म्हणजे खारट पाणी. परंतु मानव स्वच्छ पाण्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनात करतो.

मानव जेवण बनवण्यासाठी, कपडे किंवा भांडी धुण्यासाठी, साफ – सफाई करण्यासाठी इ कामांसाठी उपयोग करतो. तसेच खारट पाण्याच्या उपयोग जास्त प्रमाणात केला जात नाही.

पाण्याचे प्रमाण

पृथ्वीवर एकूण १ व १.५०% पाणी पिण्यायोग्य आहे. या धरतीवर ९८% पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरूपात आढळते. जमिनीवर कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.

परंतु या पाण्याचा उपयोग मानव अतिप्रमाणात करत आहे. तो पाण्याची किंमत आणि महत्त्व विसरून गेला आहे. म्हणून पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.

पाणी मानवाचे जीवन

पाणी हे माणसाचे जीवन आहे. या पाण्याशिवाय मानव एक क्षण सुद्धा राहू शकत नाही आणि जगू शकत नाही. पण आज मानव मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण करत आहे.

पाणी प्रदूषण ही आज जागतिक स्तरावरील प्रमुख समस्या बनली आहे. या जगात दुषित पाण्यामुळे अनेक आजार पसरत आहेत आणि त्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे.

पाणी प्रदूषणाची कारणे

आज विभिन्न कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. जसे कि,

देशात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे विविध साधने विकसित झालीत. त्यामुळे मानवाचे जीवनात सुधार होऊ लागता. मानव सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागला.

त्याने विविध उद्योग आणि कारखान्यांची निर्मिती केली. परंतु त्यामध्ये वापर्याल्या जाणाऱ्या अन्य वस्तू आणि दुषित पाणी हे मानव नदी – नाल्यांमध्ये सोडू लागला. त्यामुळे पाणी प्रदूषण होऊ लागले.

तसेच काही लोक पाण्याच्या स्त्रोतांमध्ये कचरा फेकू लागले आणि रासायनिक खते, कीटक नाशके पाण्यात मिसळल्याने पाणी दुषित होऊ लागले. त्याच बरोबर ग्रामीण भागातील लोक नदी – नाले यामध्ये जनावरे, कपडे, भांडी धुतल्याने पाण्याचे प्रदूषण होऊ लागले.

पाणी प्रदूषणाचे परिणाम

पाणी दुषित झाल्यामुळे अन्य प्रकारचे आजार पसरू लागले. जसे कि, कावीळ, विविध प्रकारचे ताप, मलेरिया, सर्दी, खोकला यासारख्या रोगांची लागण होऊ लागली.

दुषित रसायनयुक्त पाणी पिल्याने त्याचा परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागला. तसेच नदी पात्रात जास्त प्रमाणात कचरा साठल्यामुळे पूर येण्याची शक्यता निर्माण होते.

पाणी प्रदूषण रोखण्याचे उपाय

> मानवाने कारखान्यातून आणि उद्योगातून निघणारे रासायनिक पदार्थ पाण्यात सोडू नये.

> शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर कमी करावा.

> सणांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करून पाणी प्रदूषणाची समस्या टाळावी.

> तसेच स्वच्छ पाण्यात दुषित प्रदूषके मिसळल्यापासून थांबवणे गरजेचे आहे.

निष्कर्ष:

आम्हा सर्वाना मिळून पाण्याचे प्रदूषण होण्यास थांबवले पाहिजे. तासेच्च या धरतीवर स्वच्छ पाणी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असून त्याचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे.

जर सतत प्रदूषण होत गेले तर मानवी जीवनास धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पाण्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

Updated: नवम्बर 11, 2019 — 12:29 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *