जल प्रदूषण मराठी निबंध – वाचा येथे Jal Pradushan Essay in Marathi Language

प्रस्तावना:

पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मानवाची वस्ती अस्तित्वात आहे. कारण मानवाला आपले जीवन जगण्यासाठी अनेक संसाधने उपलब्ध आहेत.

तसेच मानवाचे जीवन हे मुख्यतः अन्न, हवा आणि पाणी या तीन गोष्टींवर अवलंबून आहे. या तीन गोष्टींपैकी पाणी हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

कारण मानव पाण्याशिवाय आपल्या जीवनाचाही कल्पनाच करु शकत नाही. मानव काही दिवस अन्नाशिवाय जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही.

मानवाला पाणी हे अन्य पाण्याच्या  स्रोतांमुळे मिळत आहे परंतु मानव आज या पाण्याचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळे जल प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.

जल प्रदूषण म्हणजे काय –

water pollution

जल प्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. जल प्रदूषण म्हणजे जलाशयांचे साठे उदा. नदी – नाले, तलाव, समुद्र, कालवे, सरोवरे, विहिरी इ सर्व स्रोत्यांचे पाणी दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय.

तसेच जल प्रदूषणामुळे पाण्यामध्ये हानिकारक दूषित घटक मिसळले जातात. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्ता पातळीत परिवर्तन होऊन ते पाणी वापरण्यास अयोग्य असते.

या जल प्रदूषणामुळे सजीवांच्या जीवनावर दुष्परिणाम होतो तसेच शुद्ध पाणी हे अशुद्ध बनते. मानवाच्या कृतीमुळे आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल घडून येतात. म्हणून त्या पाण्याला ‘प्रदुषित जल’ असे म्हटले जाते.

जल प्रदूषणाची कारणे

रासायनिक खते

रासायनिक पदार्थ

शेतकरी हे शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे म्हणून शेतजमिनीत रासायनिक खतांचा वापर करतात. तसेच पिकांवरील अन्य किटक नाशके मारण्यासाठी औषधांची फवारणी केली जाते.

त्यामुळे जोराचा पाऊस पडल्यास रासायनिक खते ही जलप्रवाहातून नद्यांना परिणामी समुद्राला मिळतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेलेली रासायनिक खते नदी – नाल्यांमध्ये मिसळतात आणि पाण्याचे प्रदूषण होते.

तसेच जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या रूपामध्ये पाझरून भूजल साठ्यात मिसळली जातात आणि भिजलं पातळी देखील प्रदूषित होते.

कारखान्यातील कचरा व सांडपाणी

ईंधन प्रदुषण का कारण

आपल्या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यापासून मानव अन्य प्रकारची कामे ही यंत्राच्या साहाय्याने करू लागला. तसेच मानवाने अनेक उद्योगधंदे आणि कारखाने स्थापित केले.

मानव त्या उद्योगांमधून आणि कारखान्यातून निघणारा दूषित कचरा आणि सांडपाणी नदी – नाल्यांमध्ये सोडू लागला, त्यामुळे पाणी प्रदूषित होऊ लागले आणि विविध प्रकारची रोगराई पसरू लागली.

तसेच काही लोक हे आपल्या घरातील कचरा हा नदी, समुद्र, तलाव यामध्ये फेकू लागला. त्यामुळे नदी नाल्यांमध्ये पाण्याच्या जागी दूषित कचरा वाहताना दिसू लागला.

त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील लोक हे नदी – नाल्यांमध्ये जनावरे, भांडी आणि कपडे धुतात. त्यामुळे पाण्यात घाण जमा होऊ लागली आणि पाणी दूषित होऊ लागले.

जल प्रदूषणाचे परिणाम

polushan

जल प्रदूषणामुळे पाणी दूषित होऊन पाण्यातील जीव – जंतू मरू लागले आणि  पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे अन्य प्रकारचे रोग हे निर्माण होऊ लागले. जसे की कावीळ, विविध प्रकारचे ताप, मलेरिया या सारख्या रोगांची लागण होऊ लागली.

या सर्वाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवाच्या आणि सजीवांच्या जीवनावर होऊ लागला. नदी – नाल्यांमध्ये जास्त प्रमाणात कचरा साठल्यामुळे पूर येण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ लागली.

जल प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना

Plastic Pollution

मानवाने रासायनिक पदार्थ मिसळलेले पाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडू नये.

तसेच शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर कमी करावा.

सणांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करून जल प्रदूषण होण्यास टाळावे.

मानवाने दूषित कचरा आणि सांडपाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडू नये.

त्याच प्रमाणे खनिज तेलांचा वापर कमी प्रमाणात करावा.

निष्कर्ष:

पाणी हे प्रत्येक सजीवांसाठी आणि मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वानी पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि पाणी प्रदूषण होण्यास रोखले पाहिजे. जल हेच जीवन आहे म्हणजेच पाणी हा संपूर्ण जीवनाचा आधार आहे. जो केवळ मानवचाच नाही तर प्राणी, पक्षी आणि वनस्पती इ जीवनाचा स्रोत आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *