प्रस्तावना:
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिवस हा एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. तसेच स्वातंत्र्य दिन हा भारत देशाचा सर्वात भाग्यशाली आणि महत्वाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस हा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस भारत देशाचा प्रत्येक नागरिक स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो.
स्वातंत्र्य दिवस का साजरा केला जातो –
आमचा भारत देश १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. या दिवसापासून भारत देशाने आपले स्वतःचे राज्य निर्माण केले. तसेच भारत देश जगाच्या नकाशात एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान
काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली तर काहींना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच लाखो राष्ट्र भक्तांना युद्धाच्या यज्ञ कुंडात प्राणांची आहुती द्यावी लागली. या सर्व लोकांच्या बलिदानामुळे भारत देश सोनियाचा दिवस पाहू लागला.
स्वतंत्र भारत
तसेच प्रजासत्ताक भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान बनले आणि राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती बनले. जण – गण – मन हे भारत देशाचे राष्ट्रगान आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे.
भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र
आमच्या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख,, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारसी इ. आमच्या भारत देशाने सर्वधर्म समभाव स्वीकारला आहे.
तसेच भारत देश एक लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जाऊ लागला. भारताची सहिष्णुता, अहिंसा आणि न्याय या तत्वांचे जगात स्वागत झाले.
देशामध्ये ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून आपल्या भारत या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
त्यानंतर परेड होते आणि देशाच्या पंतप्रधानांद्वारे भाषण दिले जाते. त्याच बरोबर लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी भारत सर्व ठिकाणी सार्वजनिक सुट्टी दिली जाते.
शाळा आणि महाविद्यालय
तसेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेतील मुलांची प्रभातफेरी काढली जाते. त्याच बरोबर लहान मुलांना झेंडे घेऊन नाचत – फिरताना खूप मजा वाटते.
निष्कर्ष:
भारत हा विविधत्वाला देश आहे. येथे लाखो लोक विविध धर्म, संस्कृती आणि परंपरेतील आहेत. आम्हा सर्वाना या स्वतंत्र भारताचे नागरिक असल्याचा अभिमान वाटतो. या दिवशी भारत सरकार के द्वारा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्रदान केले जातात.
आपण सर्व स्वतंत्र दिवस साजरा करत असताना लोकशाही देशाबद्दल आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे. तसेच भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाने देशाच्या तिरंग्याचा सम्मान केला पाहिजे.
For any other query regarding the Independence Day Essay in Marathi, you can ask us by leaving your comment below.