प्रस्तावना:
वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण अंग आहे. मानवाच्या जीवनात वृक्षांच महत्वाच स्थान आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या माणसाच्या तिन्ही गरजा पुरवणार निसर्गाच देण म्हणजेच – वृक्ष.
म्हणून काही संतांनी म्हटले आहे की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे वृक्षांबद्दल आणि निसर्गाबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.
मानव आणि निसर्ग
मानव आणि निसर्ग हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. माणसाचे जीवन हे वायू, अग्नी, आकाश, जल इत्यादि. तत्त्वांवर अवलंबून आहे.
मानवाला या निसर्गातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्वांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. वृक्ष मानवाला शुद्ध हवा देतात. तसेच माणसाला आणि सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सीजन प्राप्त करून देतात.
वृक्ष स्वत: कार्बन डाय ऑक्साइड हा वायू शोषून घेतात. त्याच बरोबर मानवाला वृक्षांपासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. उन्हाळ्यामध्ये वृक्षांच्या छायेखाली प्राणी व मानव हे आराम करू शकतात.
वृक्षाच्या लाकडाचे उपयोग
मानवाला वृक्षांपासून अन्य प्रकारचा लाभ होतो. मानव वृक्षाच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंधनाच्या स्वरूपाने करतो. तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.
त्याच बरोबर मानव उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल तयार करतो. वृक्षांपासून मानव माचीस, रबर, औषधे, गोंद इत्यादि. वस्तू तयार करतो.
पशु – पक्ष्यांचे निवास स्थान
धार्मिक महत्त्व
भारतीय हिंदू धर्मामध्ये काही वृक्षांना विशेष महत्त्व दिले जाते. वड, पिंपळ या वृक्षांची पूजा केली जाते. भारतीय हिंदू सणांमध्ये वृक्षांना महत्वाचे स्थान आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत आपले मानाचे स्थान मिळवून आहेत.
वृक्षांची तोड
प्रत्येक व्यक्तीला वाटते कि, स्वत:चे घर असावे. म्हणून मानव वृक्षांची तोड प्रचंड प्रमाणात करत आहे. स्वार्थापायी मानव आज आंधळा झाला आहे.
त्याला हे काळात नाही आहे कि, वृक्ष तोडताना आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. आज मानवाने हिरवळ नष्ट करून आज सिमेंटची घरे उभी केली आहेत.
प्रदूषणाची समस्या
त्यामुळे मानवाच्या शरीरावर वाईट परिणाम होत आहे. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. हवा ही दुषित होत चालली आहे. मानवाला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळत नाही आहे.
वृक्षारोपण आवश्यक
आपण सर्वांनी मिळून जर वैयक्तिक स्तरावर दरवर्षी एक जरी झाड लावलं तरी एका गावात एक जनागल तयार होईल.
निष्कर्ष:
वृक्ष हे माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यासाठी सर्वांनी मिळून जास्तीत जास्त वुक्ष लावून त्यांचे जतन केले पाहिजे.
तसेच झाडे लावा, झाडे जगवा हे धोरण सगळ्यांनी स्वीकारले पाहिजे आणि आपल्या भूमीला सुजलाम सुफलाम सश्य श्यामलाम बनवले पाहिजे. या भारत भूमीला तिचे जुने वैभव तिला परत मिळवून दिले पाहिजे.