प्रस्तावना:
आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचे फार महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले नाव कमविण्यासाठी तसेच यश मिळविण्यासाठी व सन्मान प्राप्त करण्यासाठी शिक्षण हे एक महत्तवपूर्ण साधन आहे.
जर मानव शिक्षण घेत नसेल तर त्याचे जीवन निरर्थक आहे. तसेच शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीचे जीवन हे प्राण्यांसारखे होते. शिक्षणामुळे मानवाच्या अंतर्गत शक्ती विकसित होतात.
शिक्षण हे कोणत्याही मोठ्या सामाजिक आणि कौटुंबिक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समस्या सोडविण्याची क्षमता प्रदान करते. शिक्षण हे आपल्या मनाला सकारात्मक भावनांकडे वळवते. तसेच सर्व मानसिक आणि नकारात्मक भावना दूर करते.
शिक्षण शब्दाची उत्पत्ती
शिक्षणाला इंग्रजीमध्ये Education म्हटले जाते. शिक्षण हा शब्द Educare या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो – शिक्षित करणे, प्रशिक्षण देणे आणि काहीतरी नवीन शिकणे हा आहे.
अशा प्रकारे शिक्षण हे कोणत्याही मानवासाठी खूप महत्वाचे आहे. आज आपण आपल्या मुलांना शिक्षण घेण्ययास्तही शाळेत पाठवतो. आजच्या आधुनिक काळात शिक्षणाला फार महत्त्व आहे.
आधुनिक काळात शिक्षण नर्सरी, केजी, प्राथमिक, कनिष्ठ, महाविद्यालयीन य भागात विभागले जात असे. प्रत्येक आई – वडिलांना असे वाटते की, आपली मुले शिकून हुशार व्हावीत. तसेच आजच्या युगात कोणालाच अशिक्षित राहायचे नाही. उच्च शिक्षण हे आजच्या काळात एक यशाची पायरी आहे.
शिक्षणाचे विविध स्तर
आज आपल्या भारत देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी अनेक शिक्षणाचे स्तर विकसित आहे. जसे की बालवाडी, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण तसेच विद्यापीठ शिक्षण इत्यादि.
बालवाडी
बालवाडी या शिक्षणाच्या स्तरामध्ये ३ ते ६ वयोगटातील मुलांना शिक्षण दिले जाते. यामध्ये मुलांना खेळ शिकवले जातात. तसेच मुलांना शाळा, वर्ग, शिक्षक, खेळणी, मुळाक्षरे इत्यादि सर्व गोष्टी शिकवल्या जातात. त्याच बरोबर मुलांना पेन्सिल हातात कशी धरायची हे शिकवले जाते.
प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षणामध्ये १ ते ५ पर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जाते. यामध्ये हिंदी मुलांना शिकण्यासाठी हिंदीत पुस्तके असतात आणि इंग्रजी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना इंग्रजी पुस्तके असतात.
आज सरकारने संपूर्ण देशामध्ये सरकारी प्राथमिक शाळा सुरु केल्या आहेत. यामध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. त्याच प्रमाणे देशात बहुतेक खाजगी शाळा देखील आहेत.
कनिष्ठ शिक्षण
शिक्षणाच्या या स्तरामध्ये मुलांना ६ ते ८ पर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जाते. आज प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात शाळा सुरु केल्या गेल्या आहेत. जिथे मोफत शिक्षण देण्याची सुविधा विकसित केली आहे.
सरकारे शाळांमध्ये कोणतीही फी आकारली जात नाही. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील दिली जाते. आज देशामध्ये अनेक कनिष्ठ शाळा आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण
आज भारत सरकारने अनेक राज्यात आणि जिल्ह्यात सरकारी आंतर महाविद्यालये सुरु केली आहेत. तसेच अनुदानित आणि खाजगी शाळा देखील आहेत. आज मुलांना शिक्षण घेण्यासाठी कुठेही दूर जावे लागत नाही.
विद्यापीठ शिक्षण
आज आधुनिक भारतामध्ये १७०० महाविद्यालये आणि ३४३ विद्यापीठे आहेत. आज देशामध्ये उच्च शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. आज परदेशी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी भारत एक लोकप्रिय स्थान बनले आहे.
ज्ञान वाढविण्याचा मार्ग
आज शिक्षणाबरोबर कौशल्य आणि ज्ञान वाढविण्यासाठी न्यूज पेपर वाचणे, टीव्ही वर शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, तसेच चांगल्या लेखकांची पुस्तके देखील वाचणे यांच्या द्वारे मिळणारे ज्ञान हे आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवते.
निष्कर्ष:
शिक्षण हे आपल्या जीवनाची आणि यशाची सर्वात पहिली पायरी आहे. शिक्षण हे आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने चांगले किंवा वाईट यातील फरक ओळखून आत्मविश्वास वाढविण्यास प्रेरित करते. आपण सर्व या देशाचे भविष्य आहोत म्हणून आपण सर्वानी चांगले शिक्षण घेऊन या देशाचा विकास केला पाहिजे.