If I Were a Prime Minister

जर मी पंतप्रधान झालो असतो तर मराठी निबंध – वाचा येथे If I Were a Prime Minister Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपला भारत देश हा एक सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. या देशातील जनता ही आपल्या देशाचा नेता म्हणून निवडण्यास मोकळे आहेत. भारत देशाची स्वतःची राज्यघटना आहे.

या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला तिचा अधिकार आणि हक्क हा देण्यात आला आहे. देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी ही सर्वात महत्वाची आणि सन्माननीय मानली जाते. कोणताही नागरिक जो या भारत देशाचा नागरिक आहे तो निवडणुकीत भाग घेऊन पंत्रप्रधान होऊ शकतो.

परंतु आपल्या राज्य घटनेत महत्वाच्या विषयांवर सर्वात जास्त चर्चा केली जाते, राष्ट्राचे सर्वोच्च नागरिक आणि सन्माननीय राष्ट्रपतींद्वारा परवानगी घेतली जाते. म्हणून भारत देशासाख्या महान असणाऱ्या लोकशाहीचे पंतप्रधान होणे ही खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे.

म्हणून पंतप्रधान होण्यासाठी दीर्घ आणि भरीव जीवन, अनुभव आणि राजकीय कामांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच पंतप्रधान होण्यासाठी हुशार, चतुर, कुशल असणे गरजेचे आहे.

पंतप्रधान झालो तर

pant pradhan

माझ्यासाठी देशाचे पंतप्रधान होणे हे एक स्वप्न साकार करण्यासारखे आहे. माझ्या जवळ पंतप्रधान होण्यासाठी क्षमता किंवा अनुभव नाही. पण मला असे वाटते की, जर मी पंतप्रधान झालो तर.

साक्षरता

साक्षरता के लिए उठाए गए कदम

जर मी या पंतप्रधान पदापर्यंत पोहचलो तर तो माझ्यासाठी एक योगायोग ठरेल. तसेच मी पंतप्रधान झालो तर अकुशल लोकांची क्षमता वाढवून त्यांना सक्षम बनवेन.

ते त्यांचे कौशल्य कसे वापरू शकतात हे समजावून सांगेन. ग्रामीण भागातील साक्षरतेसाठी त्या भागात साक्षर अभियान चालवेन. जेणेकरून तेथील लोक हे साक्षर होतील.

बेरोजगारीच्या संधी

बेरोजगारी की समस्या

आज आपल्या देशात भरपूर्ण लोक हे बेरोजगार आहेत. जर मी पंतप्रधान झालो तर बेरोजगार लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देईन. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळू शकेल.

कुपोषण

कुपोषण

आपल्या देशातील मुख्य समस्या म्हणजे – कुपोषण. भारत देशातील बऱ्याच भागामध्ये काही मुले ही कुपोषित आहेत. त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.

अशा भागामध्ये धान्य – धान्याचा प्रश्न सोडविणे खूप गरजेचे आहे. जर मी पंतप्रधान झालो तर त्यांच्यासाठी अनेक मोहीम सुरु करीन आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देईन.

मुलींसाठी योजना

लड़का – लड़की एक समान

आपल्या भारत देशातील काही भागांमध्ये मुलींची स्थिती किंवा अवस्था चांगली नाही. मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे जर मी पंतप्रधान झालो तर मुलींसाठी काही योजना सुरु करून त्या आत्मनिर्भर बनू शकतील. त्यांच्यासाठी मी आर्थिक मदत करीन आणि सर्वांना सांगेन की, जर या मुली असतील तरच आपल्या समाजाचा विकास शक्य आहे. कारण मुली देखील देशाच्या विकासाला समान प्रमाणात पाठिंबा देतात.

तसेच त्या पुरुषांपेक्षा अधिक मेहनती असतात आणि आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या या पार पाडतात. त्याच बरोबर मुलींचे रक्षण करण्यासाठी काही विशेष पावले उचलली असती.

गरिबीची समस्या

गरीबी

आपल्या देशामध्ये बहुतेक लोक हे गरीब आहेत. काही लोक हे आपल्या गरिबीमुळे औषधे विकत घेऊ शकत नाही तर काही उपचार करू शकत नाहीत.

जर मी पंतप्रधान झालो असतो तर अशा परिस्थितीत त्यांना कमी पैशात इलाज करून दिला असता किंवा त्यांना फ्री सुविधा दिली असती. तसेच मी मोफत तपासणी शिबिरे राबवली असती.

तंत्रज्ञानाची माहिती

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. या तंत्रज्ञानाच्या युगात देशातील सर्व लोकांना तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून लोकांना डिजिटल इंडिया समजेल आणि आपला देश कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही.

तसेच वस्तूंसाठी परदेशांवर अवलंबून राहणार नाही. म्हणून मी पंतप्रधान झालो असतो तर सर्वाना तंत्रज्ञानाची ओळख करून दिली असती. जेणेकरून देशातील लोक याचा लाभ घेऊ शकतील.

निष्कर्ष:

पंतप्रधान पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. जर मला खरोखरच पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी देशामध्ये असे अनेक बदल घडवून आणेन. ज्यामुळे आपला देश एक विकसनशील देश म्हणून ओळखला जाईल.

Leave a Comment