holi

होळी सण मराठी निबंध – वाचा येथे Holi Marathi Essay

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

होळी हा संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्ध सण आहे. हा सण विविध धर्माचे आणि जातीचे लोक मोठ्या आनंदाने साजरे करतात.

होळी या सणाला ‘होळी पोर्णिमा’ असे सुद्धा म्हटले जाते. या सणाला रंगाचा उत्सव म्हणून ओळखले जाते. हा एक अतिशय पवित्र उत्सव आहे.

होळी केव्हा साजरी केली जाते –

holi होळी हा सण वसंत ऋतू मध्ये साजरा केला जातो. तसेच हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा सण भारतीय आणि नेपाळी लोकांचा महत्वाचा सण आहे.

होळी हा सण का साजरा करतात –

holi festival भारत देशामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणामागे एक कथा आहे. त्याच प्रमाणे होळी या सणामागे प्राचीन इतिहास आहे. फार वर्षांपूर्वी एक हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता. तो स्वत:ला खूप बलवान समजत असे.

होलिका ही त्याची बहिण होती आणि प्रल्हाद त्याचा पुत्र होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता. तो नेहमी भगवान विष्णूची पूजा करत असे. पण हे त्याच्या वडिलांना मान्य नाही होते. त्याचे वडील त्याला म्हणाले कि, तू माझी पूजा कर आणि मला तुझा ईश्वर समज.

परंतु प्रल्हादने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने त्याला आगीत जाळून मारण्याचा डाव रचला. एके दिवशी त्याच्या वडिलांनी होलीकाला सांगितले कि, तू प्रल्हादला घेऊन आगीमध्ये बस.

पण होलीकाला ईश्वराकडून वरदान मिळाले होते कि, आगीपासून तिला कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु या आगीमध्ये होलीका जाळून खाक झाली आणि प्रल्हादचा जीव वाचला. म्हणून या दिवसापासून होळी या सणाची सुरुवात झाली.

महाराष्ट्रामध्ये होळी हा सण

Holi 1 होळी हा एक महाराष्ट्रातील खूप मोठा सण आहे. कोकणात या सणाला ‘शिमगा’ असे म्हटले जाते. होळी या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटवलेल्या होळीभोवती बोंबा मारत प्रदक्षिणा घातल्या जातात. तसेच होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

होळी हा सण

होळी हा सण प्रामुख्याने २ दिवस साजरा केला जातो. जसे कि होलिका दहन आणि रंगपंचमी.

होलिका दहन

होली

होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. तसेच या दिवसाला छोटी होळी असे म्हटले जाते. या दिवशी लोक होलिका दहन करून पूजा करतात.

रंगपंचमी व धुळवड

होली त्यौहार की कथाहोळीच दुसरा दिवस हा रंगपंचमी व धुळवड म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान – थोर सगळी लोक एकमेकांना गुलाल व अबीर तसेच अन्य रंगांचे रंग लावून होळी हा सण साजरा करतात. त्याच बरोबर एकमेकांना शुभकामना सुद्धा देतात.

होळी सणाची शिकवण

होली त्यौहार का महत्वहोळी हा सण आपल्याला अशी शिकवण देतो कि, अंधाऱ्या रात्री टिकून राहायचे असते व पहाटेच्या सूर्य किरणांची वात पहायची असते. प्रत्येक रात्री नंतर दिवस हा उजाडतो. तसेच होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे.

म्हणून होळी या सणाचा संदेश आणि शिकवण आजही तितकीच संबंधित आहे. होळी सणाला धार्मिक रंग दिला आहे. म्हणून होळी हा सण कुठल्याही धर्माचा नही तर सर्व मानव जातीचा आहे.

निष्कर्ष:

होळी असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो. होळी या सणापासून अशी शिकवण मिळते कि, होलिका दहन बरोबर माणसाने आपल्या वाईट विचारांचे सुद्धा दहन केले पाहिजे. तसेच या सणा मागचा संदेश, शिकवण समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. होळी हा सण एक सुंदर आणि उत्साहाचा व आनंदाचा सण आहे.

होळी हा सण म्हणजेच वाईटावर विजयाचे प्रतीक होय. तसेच हा सण सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी व सामाजिक बांधिलकी वाढविण्यासाठी साजरा केला जातो.

Leave a Comment