होळी सण मराठी निबंध – येथे वाचा Holi Festival Essay in Marathi

प्रस्तावना:

भारत देशातील सर्व सणांपैकी होळी हा सण हिंदू धर्माचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा सण आहे. तसेच महाराष्ट्रातील होळी हा सण खूप मोठा आहे. होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

होळी या सणाला रंगांचा सण असे म्हटले जाते. त्याच बरोबर याला ‘होळी पूर्णिमा’असे सुद्धा म्हटले जाते. होळी हा सण भारत देशाबाबर उत्तर भारतात सुद्धा साजरा केला जातो.

होळी हा सण “केव्हा” साजरा केला जातो

संपूर्ण भारत देशात होळी हा सण हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. तसेच हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी होळी साजरी केली जाते.

होळी सण का साजरा केला जातो 

आपल्या भारत देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणामागे कोणती ना कोणती तरी धार्मिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक कथा असते. तसेच होळी हा सणामागे अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत.

होळी सणाची कथा 

काही वर्षांपूर्वी एक हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता. होलिका ही त्याची बहीण आणि प्रल्हाद हा त्याचा पुत्र होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता. तो नेहमी भगवान विष्णूची पूजा करत असे. परंतु हे त्याच्या वडिलांना मान्य नव्हते.

म्हणून त्यांनी प्रल्हादला सांगितले की, तू मला आपला देव मान आणि माझी पूजा कर. परंतु प्रल्हादने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. म्हणून त्यांनी आणि होलिकाने प्रल्हादला जाळून मारण्याचा कट रचला. एके दिवशी हिरण्य कश्यप यांनीआपली बहीण होलिका हिला प्रल्हाद घेऊन आगीत बसायला सांगितले.

होलिकाला ईश्वराकडून वरदान मिळाले होते की, ती आगीपासून जळू शकत नाही. परंतु या आगीत होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हादचा जीव वाचला. या दिवसापासून होळी या सणाची सुरुवात झाली.

होळी सणाची विविध नावे

होळी या सणाला होलिका दहन, होळी, शिमगा, “हुताशनी महोत्सव”, फाग,फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात या सणाला ‘शिमगा’ असे म्हटले जाते.

होळी दोन दिवसांचा सण

होळी हा प्रामुख्याने २ दिवसांचा सण आहे. होळीचा पहिला दिवस हा धुळवड म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात समिधा म्हणून काही लाकडे ही मंत्रोच्चारात जाळली जातात आणि जाळलेल्या होळीभोवती बोंबा मारत प्रदक्षिणा घातल्या जातात.

तसेच होळीला नारळ अर्पण करून तिला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. या दिवशी सर्व लोक एकमेकांना गुलाल किंवा अबीर लावून रंगाची उधळण करतात. सर्वानी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते.

प्रसिद्ध होली

होळी हा सण पाहण्यासाठी बरेच लोक हे वज्र, वृंदावन आणि गोकुळ अशा ठिकाणी जातात. वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलांना रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात.

तसेच बऱ्याच ठिकाणी होळी ही फुलांनी खेळली जाते. तसेच मध्य भारतात रंग पंचमीला विशेष महत्त्व आहे. इथे सर्व लोक एकत्र टोळीने प्रत्येकाच्या घरी जाऊन एकमेकांना गुलालाने रंगवतात.

त्याच प्रमाणे उत्तर भारतात होळी ही वेगळ्याच प्रकारे खेळली जाते. इथे सर्व लोक एकत्र निघून राजवाड्यात जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून, रंगीत पाण्याने होळी खेळली जाते.

निष्कर्ष:

होळी या सणांमधून आपल्याला हा संकेत मिळतो की, वाईटावर नेहमी चांगल्याचाच विजय होतो. म्हणून प्रत्येकाने होलिका दहनच्या दिवशी आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन केले पाहिजे.

तसेच आपण सर्वानी या सणामागची शिकवण आणि संदेश जाणून घेतला पाहिजे. होळी हा सण सर्व लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढवितो.

Updated: May 26, 2023 — 7:10 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *