प्रस्तावना:
भारत हा सणांचा देश आहे. या देशामध्ये अनेक प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी होळी हा हिंदू धर्माचा एक महत्वाचा आणि प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
होळी या सणाला रंगांचा सण म्हणून ओळखले जाते. तसेच या सणाला होळी पूर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत साजरा केला जातो.
होळी सण केव्हा साजरा करतात –
होळी हा सण हिंदू कॅलेंडर नुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भारत देशाबरोबर नेपाली लोकांचा सुद्धा महत्वाचा सण आहे. होळी हा सण मुख्य म्हणजे दोन दिवस साजरा केला जातो.
होळी सणाची कथा
भारत देशामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणामागे पौराणिक, ऐतिहासिक किंवा धार्मिक कथा आहे. त्याच प्रमाणे होळी या सणामागे प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळापूर्वी एक हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता.
तो स्वत:ला खूप बलवान समाजात असे. होलिका ही त्याची बहिण आणि प्रल्हाद हा त्याचा मुलगा होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता. तो नेहमी भगवान विष्णूची पूजा करत असे. परंतु त्याच्या वडिलांचे असे म्हणणे होते कि, प्रल्हादाने माझी पूजा केली पाहिजे आणि मला आपला भगवान समजला पाहिजे.
हे म्हणणे प्रल्हादला मान्य नव्हते. म्हणून त्याच्या वडिलांनी आणि त्यांची बहिण होलिकाने त्याला आगीत जाळून मारण्याचा डाव रचला. एके दिवशी त्याच्या वडिलांनी होलिकाला सांगितले कि, तू प्रल्हादला घेऊन आगीमध्ये बस.
परंतु होलिकाला ईश्वराकडून वरदान मिळाले होते कि, ती आगीपासून जळू शकत नाही. पण या आगीमध्ये होलिका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद विष्णू भाकत असल्याने त्याचा जीव वाचला. त्यावासून होळी या सणाची सुरुवात झाली.
होळी २ दिवसांचा सण
होळी हा प्रामुख्याने २ दिवसांचा सण आहे. जसे कि होलिका दहन व धुळवड तथा रंगपंचमी.
होलिका दहन
त्याच प्रमाणे होळीला नारळ आणि नैवेद्य अर्पण करतात. महाराष्ट्रामध्ये होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत रूढ आहे.
धुळवड व रंगपंचमी
होळीचा दुसरा दिवस हा धुळवड किंवा रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान – थोर माणसे एकमेकांना गुलाल, अबीर व रंग लावून होळी हा सण साजरा करतात. त्याच बरोबर एकमेकांना होळीच्या शुभकामना देतात.
कृषी संस्कृतीत महत्त्व
होळी या सणाचे भारतीय शेतकरी वर्गात फार महत्त्व आहे. या सणाचे पौराणिक इतिहास पाहता कृष्ण – बलराम यांचे नाते स्पष्ट होते. होळी सणाच्या निमित्ताने या दोन्ही देवांची पूजा केली जाते आणि स्मरण केले जाते.
तसेच या दिवशी हाती आलेल्या पिकासाठी देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. जेव्हा होळी हा सण येतो त्यावेळी गव्हाचे पिक तयार होते. म्हणून नवीन पिक हे अग्नी देवतेला अर्पण कण्याची प्रथा आहे.
निष्कर्ष:
होळी हा असत्यावर सत्याचा विजय झाला होता म्हणून साजरा केला जातो. होळी या सणाची महान मुले आतुरतेने वाट बघत असतात. होळी या सणामुळे घराचे वातावरण अगदी आनंददायी आणि प्रसन्न होते.
या सणाबरोबर माणसाने आपल्या वाईट विचारांचे सुद्धा दहन केले पाहिजे. होळी या सणा मागाचा संदेश आणि शिकवण जाणून घेतली पाहिजे. तसेच होळी हा सण सर्वाना एकत्र आणण्याचे आणि सामाजिक बांधिलकी वाढवितो.