प्रस्तावना:
भारत हा सणांचा देश आहे. या देशामध्ये विविध सण साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी होळी हा महाराष्ट्रातील हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे.
होळी हा सण भारत देशामध्ये मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. या सणाला कोकणी भागात शिमगा असे म्हटले जाते.
होळी हा सण असत्यावर सत्याचा विजय, वाईट घोष्टींवर चांगलेपणाचा विजय आणि वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. तसेच या सणाला रंगांचा सण असेही म्हटले जाते.
होळी हा सण केव्हा साजरा केला जातो
दरवर्षी भारत देशामध्ये होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भारत देशातील विविध धर्माचे आणि जातीचे, पंथाचे लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात. होळी या सणादिवशी लहान मुले आणि तरुणांमध्ये जास्त उत्सुकताची भावना निर्माण होते.
होळी हा सण का साजरा केला जातो-
आमच्या भारत देशामध्ये एकामागून एक सण हे येताच असतात आणि प्रत्येक सणामागे धार्मिक, ऐतिहासिक किंवा पौराणिक कथा असते. त्याचप्रमाणे होळी या सणाविषयी अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत.
भरपूर वर्षापूर्वी हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता. होलिका ही त्याची बहिण आणि प्रल्हाद त्याचा पुत्र होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता. प्रल्हाद दिवस – रात्र भगवान विष्णूची पूजा करायचा.
परंतु हे सर्व त्याच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यांना असे वाटायचे कि, प्रल्हाद मला आपला भगवान माने आणि माझी पूजा करे. परंतु प्रल्हादने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला जीवे मारण्याचा कट रचला.
त्यांनी आपल्या बहिणीला सांगितले कि, प्रल्हादला घेऊन आगीमध्ये बसायला. होलीकाला देवाकडून वरदान मिळाले होते कि, आगीपासून तिला कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु या आगीमध्ये होलिका जळून खाक झाली आणि भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादचे प्राण वाचले.
होळी हा सण
होळी हा २ दिवसांचा सण आहे. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. या दिवसाला छोटी होळी असेही म्हटले जाते.
तर दुसऱ्या दिवशी लहान – थोर माणसे रंगांनी खेळतात. सर्व लोक एकमेकांना गुलाल व अबीर लावून होळी हा सण साजरा करतात.
होळी कशी साजरी केली जाते –
होळी हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीचा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी जातात. या ठिकाणची होळी प्रसिद्ध आहे.
म्हणून येथील होळी हा सण पाहण्यासाठी लोक देश – विदेश मधून येतात. वज्र येथे होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात.
काही ठिकाणी होळी हा सण फुलांनी खेळला जातो. तसेच नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून होळी हा सण साजरा केला जातो.
पुरणपोळीचे महत्त्व
महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी आगीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविण्याची पुराणी प्रथा आहे. तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे आणि नवस बोलण्याची सुद्धा परंपरा आहे.
निष्कर्ष:
होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. होळीच्या दिवशी आत्यावर सत्याचा विजय झाला होता. म्हणून हा होळी हा सण साजरा केला जातो. त्याच बरोबर होलिका दहन सोबत मनुष्यच्या मनातील वाईट विचारांचेही दहन केले जाते.
आपण सर्वाना या सणामागची शिकवण आणि संदेश समजून घ्यायला हवा. तसेच अनेक कवींनी आपल्या गोड भाषेत होळी या सणाचे वर्णन केले आहे.