प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. या देशात विविध सण साजरे केले जातात. जसे कि होळी, दिवाळी, दसरा, मकर संक्रांति, रक्षाबंधन इ. या सर्व सणांपैकी गुढी पाडवा हा एक भारतीय सण आहे.
या सगळ्या भारतीय सणांना आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक मानले जाते. या देशात सर्व जाती आणि धर्माचे लोक गुण्या – गोविंदाने साजरे करतात. हे सगळे सण विविध धर्माच्या आणि जातीच्या लोकांमध्ये एकोपा आणण्यास मदत करतात.
भारतातील प्रत्येक सणामागे धार्मिक महत्त्व, पावित्र्य आणि इतिहास आहे. त्याच प्रमाणे गुढी पाडवा या सणाचे हिंदू धर्मात भरपूर महत्त्व आहे.
गुढी पाडवा सण केव्हा साजरा केला जातो –
गुढी पाडवा हा सण हिंदू धर्माचा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. भारतामध्ये दरवर्षी हा सण हिंदू कॅलेन्डर प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो.
हा सण भारत देशाबरोबर अनेक प्रदेशात सुद्धा साजरा केला जातो. चैत्राची सुरुवात ही गुढी पाडव्याच्या दिवसाने होते. या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते.
काठी पूजन
महाराष्ट्रात गुढी पाडवा या सणा दिवशी घराच्या बाहेर एका स्वच्छ जागेवर बांबूची काठी उभारून तिच्या टोकाला साडी किंवा रेशमी वस्त्र बांधून परिधान करतात.
त्यावर तांब्याचा किंवा चांदीच्या कलशाने साखरेची गाठी, कडूनिंबाची डहाळी, आंब्याची पाने तसेच फुले एकत्र बांधून पाटावरती गुढी उभारली जाते. पाटाच्या भोवती रांगोळी काढली जाते. गुढीची पूजा केली जाते. त्याच बरोबर साखरेची वाटी सगळ्यांना वाटली जाते.
सर्व जणांचे तोंड गोड केले जाते. या दिवशी ब्रह्मदेवाला विविध रंगांची फुले वाहली जातात. तसेच घराचा मुख्य दरवाजा सुंदर फुलांनी व तोरणांनी सजवला जातो.
विशेष आहार
महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी कुटुंबात श्रीखंड आणि पुरी तसेच पुरण पोळीचा आहार असतो. तसेच कोकणी लोक कणगाची खीर, रताळे, खोबऱ्याचे दुध, गुळ आणि तांदळाच्या पिठापासून विविध प्रकारचे पदार्थ किंवा खीर व सांदण बनवतात.
गुढी पाडवा सणाचा इतिहास
गुढी पडावा हा सण हिंदू सणांपैकी एक आहे. गुढी पाडवा सण साजरा करण्या मागचा इतिहास असा आहे कि, गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्म देवाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती.
तसेच दुसऱ्या कथेनुसार भगवान श्रीराम या दिवशी १४ वर्षांचा वनवास भोगून आपल्या अयोध्या नगरीत वापस आले होते. भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून विजय प्राप्त केला होता.
त्या वेळी भगवान श्री राम अयोध्येत परत आल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामाचे स्वागत केले होते.
गुढी पाडवा सणाचा आणखी एक इतिहास आहे, तो म्हणजे शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकाना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले होते.
या पुत्ल्यांमध्ये प्राण निर्माण करून शकांचा पराभव केला होता. म्हणून शालिवाहन राजाच्या नावाने नवीन काल गणना ही शालिवाहन शक म्हणून ओळखली जाते.
गुढी पाडवा सणाचे सामाजिक महत्त्व
हिंदू धर्मामध्ये गुढी पाडवा या सणाला पवित्र आणि शुभ मानले जाते. यावेळी हातात घेतलेले कोणतेही काम यशस्वी होते असे मानले जाते.
या सणाच्या दिवशी लोक आपल्या संस्कृती प्रमाणे पोषाखामध्ये एकत्र जमा होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. यामुळे सामाजिक आपुलकी आणि बांधिलकी जोपासली जाते.
गुढी पाडव्याच्या दिवशी दान धर्म करणे व लोकांची मदत करणे शुभ मानले जाते.
निष्कर्ष:
गुढी पाडवा हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढी पाडवा हा सण भारत देशाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. गुढी पाडवा हा सण लहान – थोरांनी नटून – थटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढ्या उभारायचा, गोड – धोडाचा आणि पंचांग पूजेचा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून हा सणा आनंदाने साजरा केला पाहिजे.
For any other query regarding the Gudi Padwa Essay in Marathi, you can ask us by leaving your comment below.