प्रस्तावना:
आपल्या जीवनात सर्वात प्रथम आई – वडील आणि शिक्षक हेच आपले गुरु असतात. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि संस्कार देऊन घडवतात.
त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान ठेवणारी वस्तू म्हणजे – ग्रंथ. ग्रंथ हे आपल्या न कोणते ज्ञान हे देताच असतात.
आपण ज्ञान मिळवण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करतो. म्हणून आजच्या युगात मानव संगणकाद्वारे एका क्षणात ज्ञान मिळवतो. पण हे ज्ञान किंवा माहिती हि कोणत्या न कोणत्या ग्रंथातून वाचून संगणकाच्या अंतर्जालात टाकलेली असावी.
ग्रंथ एक खजिना
गुरुची महती
म्हणून असे म्हटले जाते कि, मनुष्य हा लहान पणापासून म्हातारी वयापर्यंत शिकतच असतो. परंतु ह्या काळात जे – जे त्याला विद्या देणारे भेटले हे त्याचे गुरूच होते.
गुरूकडून ज्ञान मिळवताना कोणतीही सेवा करावी लागत नाही. त्यात आम्हाला सर्व प्रकारचे ज्ञान हे उपलब्ध करून ठेवलेले असते.
ग्रंथ हेच गुरु
प्रकाशाशिवाय अंधार कसा जाणार ?
औषधाशिवाय रोग कसा हटणार ?
प्रेमाशिवाय कलह कसे मिटणार ?
आणि
ग्रंथाशिवाय ज्ञान कसे मिळणार ?
ग्रंथ हे आपले खरे गुरु असतात आणि आपल्या संपूर्ण आयुष्य भराची शिदोरी असतात. ग्रंथ म्हणजे एक ज्ञानरूपी पाऊसच आहे.
कारण जसे कि जमिनीवर पाऊस पडल्यावर जमिनीचे सोने होते आणि पीक उभे राहते. त्याच प्रमाणे ग्रंथरूपी पाऊस डोक्यावर पडल्यावर मेंदूची, बुद्धीची कार्यक्षमता वाढते.
हिंदू धर्मात ग्रंथांचे महत्व
ग्रंथ हे आपल्याला भरपूर ज्ञान देतात. परंतु त्याचा मोबदला आपल्याकडून कधीच मागत नाही. म्हणून हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त मोलाचे स्थान देवाला आणि आपल्या पवित्र भागवत गीतेला आहे.
भागवत गीता हा सर्वात मौल्यवान ग्रंथ आहे. त्याच प्रमाणे आयुर्वेदात सर्वात मोलाचा ग्रंथ चरक संहिता हा आहे. प्रत्येक धर्माचा कोणता न कोणता तरी धर्म ग्रंथ हा असतोच.
ग्रंथामधून ज्ञान
ग्रंथामधून आपण भूतकाळातल्या गोष्टी अनुभवू शकतो. ग्रंथाना काळ, वेळ, जाती आणि धर्म यांचे बंधन नाही. आपण कधीपण त्यामधून ज्ञान प्राप्त करू शकतो.
माणसाने आपल्या जीवनामध्ये काय करावे आणि काय करू नये हेच ग्रंथ सांगतात. त्याच बरोबर मुख्य म्हणजे ग्रंथांमध्ये लिहिलेले ज्ञान हे कोणत्याही काळात उपयोगी पडू शकते. उदा. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता त्यावेळी अर्जुनासाठी जितकी महत्वाची होती तितकीच आताच्या २१ व्या शतकात महत्वाची आहे.
ग्रंथातील ७ गुण
ज्या प्रकारे इंद्रधनुष्याच्या सात रंग आहेत. त्याच प्रमाणे ग्रंथात ७ महत्वपूर्ण गुण आहेत. ग्रंथ वाचल्याने लेखन कौशल्य, वक्तृत्व कला, आदर्श जीवन जगण्याची कला, आत्मविश्वास, ज्ञान आणि अनुभव इ. माहिती प्राप्त होते. ग्रंथातून आपल्याला सत्य समजते आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
निष्कर्ष:
असे हे ज्ञान देणारे ग्रंथ हेच आपले गुरु असतात. तसेच हेच ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीचे वारसदार सुद्धा आहेत. म्हणूनच ग्रंथ हेच गुरु असे म्हटले जाते.