प्रस्तावना:
बाग ही एक अशी जागा आहे जिचे सौंदर्य पाहून प्रत्येक व्यक्तीचे मन प्रसन्न होते. बाग ही हिरवळ आणि सुंदर फुलांचे स्थान आहे. बाग ही आपल्या घरासमोर, शाळेसमोर, किंवा शहराच्या ठिकाणी असतात. बाग हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.
ज्यामध्ये विविध रंगांची फुले, झाडे आणि वनस्पती देखील असतात. बागेमध्ये खूप सुंदर आणि रंगीबिरंगी फुले असतात. जी उमलल्यावर दिसायला खूप छान दिसतात.
बागेचे सौंदर्य
बहुतेक लोक हे बागेमध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जातात. तसेच बाग ही हिरव्या गवतानी भरलेली असते. काही लोकांना बागेमध्ये जाऊन खूप आनंद होतो. तसेच मुले देखील खूप खुश होतात.
बागेमध्ये निसर्गाचे सौंदर्य पाहून मन हलके होते. बागेमध्ये फुलांचा सुगंध हा सगळीकडे पसरलेला असतो. ज्यामुळे मन उत्साही बनते.
अनेक प्रकारची झाडे
तसेच सगळ्या झाडांवर त्यांच्या वेळेनुसार फळे आणि फुले लागतात. काही पक्षी हे बागेतील झाडांवर आपला घरटा बांधून राहतात. त्यामुळे पहाटे पक्ष्यांचा किलबिल – किलबिल आवाज ऐकायला येतो.
फुलांचे प्रकार
बागेमध्ये विविध रंगांची फुलांची रोपे असल्याने आणि त्यावर लागणाऱ्या फुलांमुळे बागेची सुंदरता आणखीनच वाढते.
बागेतील मौजमजा
लहान मुलांना खेळण्यासाठी बागेमध्ये अनेक प्रकारची खेळणी देखील असतात. त्यामुळे त्यांना खूप मजा येते. तसेच मुलांना शाळेत असताना बागेविषयी आणि फुलांविषयी शिकवले जाते.
त्यांना विविध प्रकारच्या फुलांविषयी ज्ञान दिले जाते. परंतु फुलांविषयी जे ज्ञान त्यांना पुस्तकातून मिळते ते बागेमध्ये जाऊन प्रत्यक्षात मिळते.
तसेच बगिच्याला पाहून लोकांचे मन प्रसन्न होते आणि वाईट विचार दूर होतात. तर काही लोक हे आपल्या घराच्या समोर बालकनी तयार करतात.
बागेची आवश्यकता
आजकाल माणसे विकासाच्या नावाखाली सिमेंटचे जंगल तयार करत आहे. पण छोटी बाग नाही. जर बगीचे नसतील तर मानव निसर्गाच्या सावलीचा आणि थंडपणाचा आनंद घेऊ शकत नाही.
म्हणून आपण निसर्गाचा आदर करण्यासाठी एक छोटी बाग तयार करायला हवी. कारण मुले बागेत काम करून आपला भावनिक विकास करतात. जर मुलांना बाग बघायला किंवा तिचा आनंद घ्यायला मिळाला नाही तर तेही सिमेंटच्या जंगलप्रमाणे कठोर बनतील.
निष्कर्ष:
प्राचीन काळी प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर एक बाग असायची. पण आता ती दिसत नाही. कारण आज मानव आपल्या सुख – सुविधा पुऱ्या करण्यासाठी झाडांची तोड करत आहे.
तसेच प्रत्येकाने बगीचे स्वच्छ आणि सुंदर ठेवले पाहिजे. म्हणून बगीच्यांचा तजेलदारपणा राखण्यास आणि सुरक्षित ठेवण्यात प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. बाग ही केवळ सौंदर्यच नाही तर मानव जातीला एक महत्वाचा धडा सुद्धा शिकवते.