प्रस्तावना:
आपला भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये अनेक सण हे साजरे केले जातात. जसे की रक्षाबंधन, दिवाळी, दसरा, महाशिवरात्री, ईद, होळी, ख्रिसमस इ अनेक सण हे मोठया उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात.
भारत देशामध्ये साजरे केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणाचे आपले विशेष महत्त्व असते. त्या सर्वांप्रमाणेच गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मच प्रमुख आणि महत्वाचा सण आहे. हा सण गणपतीचा ‘जन्म दिवस’ म्हणून साजरा अकेला जातो. भारत देशात राहणारे विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे हा सण गुण्या गोविंदाने साजरा करतात.
गणेश चतुर्थी केव्हा साजरी केली जाते –
गणेश चतुर्थी हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. तसेच हिंदू कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा सण ११ दिवसांचा सण आहे. गणेश चतुर्थी हा सण ११ दिवस चालणार एक प्रदीर्घ सण आहे.
गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते –
गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदू धर्माचा एक सर्वात आणि महत्वाचा सण आहे.
काही लोक हे गणेश चतुर्थी या सणाच्या एक किंवा दोन महिन्यापूर्वीच गणपतीच्या मूर्ती बनवायला सुरुवात करतात. या मूर्ती चिकन मातीच्या किंवा प्लास्टर पॅरिसच्या असतात. या संचय काही दिवस आधी मूर्ती या रंगानी रंगवल्या जातात.
तसेच काही लोक हे आपल्या दुकानात गणपतीच्या मूर्ती विकण्यास ठेवतात. इतर सणांप्रमाणे हा सण १ दिवसातच संपत नाही तर ११ दिवस चालतो.
गणेश पूजन
गणेश चतुर्थी या सणाच्या आदल्या दिवशी घराची सजावट केली जाते. गणपतीच्या मूर्तीची स्थपणा करण्यासाठी काही लोक हे मखर तयार करतात आणि त्यामध्ये गणपतीची मूर्ती स्थापन करतात.
हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची पूजा व आरती केली जाते.
गणपतीची दहा दिवस पूजा करताना दुर्वा गवत, गूळ, नारळ, लाल फुले, चंदन, कापूर, अगरबत्ती इ सर्व अर्पण करण्याचा विधी आहे. गणपतीचे आवडते पकवान – मोदक हे आहे. गणपतीला पहिल्या दिवशी २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
गणपतीची जन्मकथा
एके दिवशी पार्वती मातेस स्नान करायला जायचे होते. परंतु बाहेर कोणीच पहारेकरी नसल्यामुळे तिने एक मातीची मूर्ती तयार करून त्यामध्ये प्राण घालून ती जिवंत केली आणि त्याला पहारेकरी म्हणून नेमून आतमध्ये कोणी न येण्यास सांगितले.
त्यानंतर पार्वती माता स्नान करण्यास निघून गेली. परंतु काही वेळाने तिथे भगवान शंकर आले आणि ते आतमध्ये जाऊ लागले. त्यामुळे पहारेकरी त्यांना रोखू लागला. म्हणून भगवान शंकरांना राग आला आणि त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.
काही वेळाने माता पार्वती स्नान करून बाहेर आली आणि पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा भगवान शंकरानी आपल्या गण नावाच्या बाहेर जो कोणी प्राणी भेटेल त्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला.
गण बाहेर पडताच त्याला एक हत्ती दिसला आणि तो त्याचे मस्तक कापून घेऊन आला. भगवान शंकरांनी ते डोके पुतळ्याला लावले आणि जिवंत केले. हा पार्वती मातेचा मानस पुत्र गजानन होय. हा दिवस चतुर्थीचा होता. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी असे म्हटले जाते.
गणपती विसर्जन
गणेश चतुर्थीचा ११ दिवस हा अनंत चतुर्थीचा असतो. या अनंत चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. जेव्हा आपण गणपतीचे विसर्जन करायला जातो तेव्हा सर्व दुःख आपल्या पदरात घेऊन जातो.
गणपती विसर्जनाची तयारी ही मोठ्या उत्साहात केली जाते. काही लोक हे ढोलाआणि तशयनच्या गजरात नाचत – गात जातात. तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या असा जयघोष करत जातात.
निष्कर्ष:
गणेश चतुर्थी हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा सण आहे. गणेश चतुर्थी या सणाच्या आगमनाने प्रत्येक व्यक्ती आणि लहान मुले ही खूप आनंदित होतात. तसेच हा सण भारत देशाच्या अनेक भागात साजरा केला जातो.
भगवान गणेश हिंदू धर्माच्या लोकांचे आराध्य दैवत आहेत. कोणतेही कार्य सुरु करायच्या याआधी सर्वात प्रथम गणपतीची पूजा केली जाते. त्याच बरोबर गणेश चतुर्थी हा सण सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य निर्माण करतो.