गणेश उस्तव वर निबंध – वाचा येथे Ganesh Utsav Essay In Marathi For Kids

प्रस्तावना:

माझा आवडता सण गणेश उस्तव. माझाच काय हा सर्व लहान मुलांचा पण आवडता सण आहे. माझा घरी पण गणपती ची स्थापणा होते.

गणेश चतुर्थी ची मज्जा.

गणपती माधिल खारीमहान मुलांची मज्जा म्झंजे गणपती मध्ये येणारी सुट्टी. गणपती घरी येणार म्हणून एक महिना अगोदरच आपली जय्याद तयारी सुरु झालेली असते आणि हे सर्व पाहत लहान मुलेही त्याची मज्जा घेत आपल्याला मदत करायला तयारच असतात.

गणेशाच्या आगमनाची तयारी

याची तयारी एक महिना आधीच सुरु झालेली असते, त्यात लहान मुलांची वेगळीच मज्जा असते, गोड गोद्खायला मिळणार मोदक, लाडू, यातच त्यांची ख़ुशी आपल्याला दिसून येते. ढोल ताशे नाच, गाणी, बाप्पा ची आरती हे सर्व त्यांना करायला खूप आवडते.

याची सुरवात मखर बनविण्य पासून होते, कारण घरातील सर्व मोठी माणसे बाप्पा साठी काय आणि कसे डेकोरेशन बनवायचे याच्या विचारात असतात तेव्हा या मुलांची काही वेगळीच विचार सारणी असते, ते आपले नावनवीनकल्पना सुचवत बसतात. ऑगस्ट किवा सेप्टेम्बरमहिन्यात गणपती येतात, तेव्हापाऊसथोडा कमी झालेला असतो, हिरवे गार वातावरण असते, काही लोक आप आपल्या गावी जातात गणपती साठी.

गावाला गणपती आगमनाची तयारी खूप पारंपारिकपद्धतीने केली जाते, दिवाळी सारखा फराळ बनविला जातो, साधे डेकोरेशन केले जाते, काहींच्या घरात एका गणपतीचे विसर्जन मागील दारातून करून नवीन गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजातून केली जाते.

बाप्पाचे आगमन

गणपती काहीच्या घरी दिड दिवसाचे तर कोणी ५, ७ किंवा १० दिवसाचे बसवितात. या दहा दिवसचे जे वातावरण असते ते काही वेगळेच असते. आमच्या घरातील मुले तर शाळेने दिलेल्या सुट्टी बद्दल इतके खुश असतात कि विचारू नका.

हा एक महिना बापाची तयारी करता करता कधी गणेश चतुर्थीचा दिवस जवळ येतो हे समजतच नाही. हार फुले सुगंधित अत्तर पितळेची देवाची भांडी आणि ते सुंदर देकोरेशन याने घर अगदी स्वर्ग सारखे वाटते, त्याय्त लहान मुले आणखी नवनवीन काही तरी मौजमज्जा करण्यात दंग असतात. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया चा जयजयकार लावत घरात फिरत असतात.

टाळ घाटी वाजवत घर अगदी डोक्यावर घेतात. नवनवीन कपडे, घालून घरभर हुंदडत राहतात. कधी बाप्पा घरी येतो आणि आपण मोदकावर तव मारतो असे त्यांना झालेले असते.

बाप्पाचे आगमन

आणीशेवटी तो दिवस उजाडला जी मुले सकाळी शाळेत जाण्यासाठी घर डोक्यावर घेतात रडून तीच मुले आज बाप्पा येणार या खुशीत लाव्कारून उठून अंघोळ करून आईच्या मागे मागे फिरत काय काय गोड खायला मिळेल आणि बाप्पाचेआगमन कसे करायचे याच्या गोंधळात असतात. कधी आरतीचे तात हातात घेऊन मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया ओरडत घराबाहेर फिरत असतात. ढोल तशा वाजत वाजत आम्ही सर्व बाप्पाला आणायला निघतो, आमच्या पुढे मुले बाप्पाला आणायला.

बाप्पाला पाहताच त्यांचा जल्लोष बघण्यासारखा असतो, मोठमोठ्याने टाळ घंटी वाजवत बाप्पा मोरया बाप्पा मोरया करत आम्ही बाप्पाला घरी घेऊन येतो, घरातील महिला वर्ग धरतच बाप्पाची वाट बघत हातात आरतीचे ताट घेऊन उभ्या असतात. बाप्पाची आरती होते त्याचे अवक्षण होते आणि दारात नारळ फोडून त्याची द्तृष्ट काढून त्याला घरात आणले जाते, व मुलांच्या मदतीने जे मखर बाप्पाचे घर सुंदर रित्या बनिविले लेले असते त्यात त्यांना स्थानापन्न केले जाते.

बाप्पाचे गुणगान

आरतीची सुरवात होते टाळ मृदुंग च्या गजरात, लहान मुले मोठमोठ्याने आरती येत नसते पण जय देव जय देव बोलून आरतीची गम्मतच न्यारी करतात. आरती संपल्यावर मिळणारे तीर्थ आणि मोदक केळी, लाडू यांचा प्रसाद बाप्पासाठी जो ठेवलेला असतो त्यावर यांची नजर असते कधी बाप्पाची आरती संपते आणि आम्हाला प्रसाद मिळतो, या आशेत.  खरच हे १० दिवस त्यांचे खूप आनंदाचे क्षण असतात. हौस मौज मज्जा मस्ती आरती यात १० दिवस कधी संपतात हे समजतच नाही. असा आहे आमच्या लहान मुलांचा गणपती उत्सव.

 

शीर्षक:

गणपती बाप्पा मोरया

Updated: मार्च 17, 2020 — 10:47 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *