गणेश चतुर्थी वर मराठी – वाचा येथे Ganesh Chaturthi Essay in Marathi

प्रस्तावना:

आपल्या हिंदू धर्मात अनेक सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी गणेश चतुर्थी हा हिंदू धर्माचा एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे.

गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः हा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा करतात. तसेच गणेश चतुर्थी हा एक सार्वजनिक उत्सव देखील आहे.

भारतीय समाजामध्ये एकी निर्माण करण्यास लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थी या सणाला सार्वजनिक स्वरूप दिले.

गाणेच चतुर्थी केव्हा साजरी केली जाते –

हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. हा दहा दिवसांचा सण मोठ्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये येतो. भगवान गणेशाला ज्ञान आणि समृद्धीचा देव म्हटले जाते.

गणपतीची जन्मकथा

एकदा माता पार्वती यांना स्नान करायला जायचे असताना बाहेर कोणीच नसल्याने तिने एक मातीची मूर्ती करून तिला जिवंत केली. तसेच त्याला पहारेकरी म्हणून नेमून आतमध्ये कोणी न येण्यास आज्ञा दिली आणि माता पार्वती स्नान करण्यासाठी निघून गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. त्यामुळे पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकरानी संतप्त होऊन पहारेकऱ्याचे शिरच उडवले. त्यानंतर पार्वती माता स्नान करून आल्यावर पाहतात तर पहारेकऱ्याला मारलेले पाहून ती अतिशय संतापली.

म्हणून भगवान शंकरानी गण नावाच्या शिष्याला आज्ञा दिली की बाहेर जो कोणी प्राणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिला आणि त्याने हत्तीचे मस्तक कापून घेऊन आला. ते मस्तक भगवान शंकरानी त्या पुतळ्याला लावले आणि जिवंत केले.

म्हणून हा पार्वती मातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. म्हणून भगवान शंकरानी गणाचा ईश म्हणजेच परमेश्वर म्हणून त्याचे नाव गणेश असे ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता म्हणून या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.

गणेशोत्सवाची तयारी

गणपतीची मूर्ती बनवणारे लोक हे तीन किंवा चार महिने अगोदर गणपतीच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात. इतर सणांप्रमाणे गणेश चतुर्थी हा सण एका दिवसातच संपत नाही तर हा सण १० दिवस साजरा केला जातो.

गणपतीच्या मूर्ती या चिकणमातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी बाजारात गणपतीच्या सुंदर मूर्ती या विकण्यास ठेवल्या जातात. या सणाच्या आगमनापूर्वी बाजारात एक अनोखे सौंदर्य दिसून येते.

गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी हिंदू लोक आपल्या घराची फास – साफ करतात. तसेच घर रंगीन केले जाते आणि विशेष प्रकारे घराची सजावट केली जाते.

भगवान गणेशजींची पूजा

हिंदू लोकांच्या घरी भगवान गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीचे पूजन केले जाते. तसेच अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

भाद्रपद महिन्यामध्ये पावसाचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. त्यामुळे विविध वनस्पती देखील उगवलेल्या असतात. म्हणून गणेशाला सोळा पत्री अर्पण करण्याची प्रथा आहे.

गणपतीला दुर्वा फार आवडतात. म्हणून १० दिवस गणपतीला दुर्वांचा हार घातला जातो. तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.

निष्कर्ष:

गणेश चतुर्थी हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा सण आहे. या सणाच्या आगमनाने प्रत्येक व्यक्ती आनंदित होतो. तसेच कोणत्याही शुभ कार्यात सर्वात प्रथम गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी हा सण सांस्कृतिक सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यास महत्तवपूर्ण आहे.

Updated: December 14, 2019 — 1:43 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *