प्रस्तावना:
आपल्या भारत देशावर इंग्रजांनी २०० वर्षे राज्य केले आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आपल्या घराचा त्याग करून या देशासाठी लढले व आपल्या प्राणांचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य केले.
अशाच महान स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते – महात्मा गांधी. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख स्वतंत्रता सेनानी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचले. म्हणून त्यांना ‘भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार’ म्हटले जाते.
महात्मा गांधीजींना भारत देशात ‘राष्ट्रपिता’ आणि ‘बापू’ या नावाने ओळखले जात असे. तसेच महात्मा गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ ही पदवी दिली. तसेच सन १९४४ सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले.
जन्म
आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे तसेच सत्य आणि अहिंसेच्या मार्गातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव ‘करमचंद गांधी’ आणि आईचे नाव ‘पुतळीबाई’ असे होते. महात्मा गांधीजींचे वडील हे राजकोटचे दिवाण होते.
महात्मा गांधीजींचे राहणीमान
महात्मा गांधीजींनी संपूर्ण आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या मार्गाचा स्वीकार केला. महात्मा गांधीजी स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती.
तसेच त्यांनी जन्मभर शाकाहाराचा अवलंब केला. त्यांनी अनेक धार्मिक कारणांसाठी विरोधनाचे साधन म्हणून दीर्घ उपवास केलेत.
शिक्षण
महात्मा गांधीजींनी आपले प्राथमिक शिक्षण राजकोट येथून पूर्ण केले. त्यानंतर सण १८८८ साली ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे जाऊन त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली.
सन १८९१ मध्ये ते भारतात परतले आणि आपल्या वकिलीला सुरुवात केली. परंतु एकदा त्यांच्या जीवनामध्ये असे वळण आले की, त्यांना दक्षिण आफ्रिकेला जावे लागले आणि तेथे जाऊन वकिली करू लागले.
परंतु तिथे पाहतात तर ब्रिटिश लोक भारतीयांवर खूप अत्याचार करत असत. म्हणून त्यांनी भारतीय लोकांची मदत केली आणि योगायोगाने ते भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले.
आंदोलने व सत्याग्रह
महात्मा गांधीजींनी सन १९१७ मध्ये चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी १९२० – १९२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन केले.
सन १९३०- १९३२ च्या दरम्यान त्यांनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला आणि सविनय कायदेभंग आंदोलन केले. तसेच महात्मा गांधीजींनी सन १९४२ साली भारत छोडो आंदोलन केले.
त्यांची ही सर्व आंदोलने यशस्वी झाली आणि त्यांच्या या संघर्षामुळे भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.
सर्व भारतीयांसाठी आपल्या आयुष्यच होम करणाऱ्या महात्मा गांधीजींना त्यांच्याच एका हिंदू कार्यकर्त्याने ३० जानेवारी, १९४८ साली गोळी मारून त्यांची हत्या केली.
गांधी जयंती
आपल्या भारत देशात २ ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्म दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. नवी दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधीजींच्या समाधी समोर गांधी जयंती साजरी केली जाते.
राजघाट येथील त्यांच्या समाधीला पुष्पहार घालून फुलांनी सजावट केली जाते. तसेच सकाळी धार्मिक प्रार्थना देखील केली जाते.
संपूर्ण देशभरात गांधी जयंती ही राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महात्मा गांधीजींच्या जीवनावर किंवा कृतीवर आधारित नाटक, कविता, गाणे, भाषण, निबंध स्पर्धा इ. उपक्रम साजरे केले जातात.
निष्कर्ष:
महत्तम गांधीजी हे एक महान व्यक्तिमत्व होते. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत मातृभूमीसाठी बलिदान केले. त्यांनी दाखवून दिले की सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देखील देशाला स्वातंत्र्य मिळू शकते.
त्यांची शिकवण ही देशातील लोकांना प्रेरणादायी ठरते. महात्मा गांधीजी आज आपल्या मध्ये नाहीत. परंतु आपण सर्वांनी महात्मा गांधीजींचे बलिदान हे केव्हाच विसरू नये.