प्रस्तावना:
आपल्या भारत देशामध्ये ऋतूंचे चक्र हे फिरतच असते. भारत देशात सहा ऋतू हे एका मागून एक येत असतात. त्या सर्व ऋतूंपैकी तीन ऋतू हे सर्वात महत्वाचे आहेत. जसे की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा.
हे तिन्ही ऋतू म्हणजेच निसर्गाची अजब जादूच म्हणावी लागेल. या भारत देशात येणारे सर्व ऋतू महत्वाचे आहेत. परंतु त्यापैकी हिवाळा हा ऋतू भारतातील सर्वात मोठा आणि थंड हवामानाचा ऋतू आहे.
या ऋतूमुळे संपूर्ण वातावरणामध्ये थंडपणा पसरतो. हिवाळ्याच्या महिन्यात पर्वतीय प्रदेश हा बर्फाच्छादित असतो आणि कधी – कधी तापमान हे खूप कमी असते.
हिवाळा ऋतू कधी सुरु होतो –
हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापासून सुरु होतो आणि मार्चच्या होळी दरम्यान संपतो. डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने हिवाळ्याचे सर्वात थंड महिने मानले जातात.
हिवाळा ऋतूचे महत्त्व
हिवाळा या ऋतूचे एक विशेष महत्त्व आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात गव्हासारखी पिके कमी तापमानात पेरली जातात. हिवाळयात मेथी, मटार, गाजर, वांगी, धणे, मुळा यांसारख्या हिरव्या भाज्या मिळतात. जेव्हा सकाळी सूर्यास्त होतो तेव्हा संपूर्ण वातावरणाचे एक नवीन रूप दिसते.
हिवाळा या ऋतूमध्ये आपण सकाळी जेव्हा चालतो तेव्हा आपल्या आरोग्यासाठी श्वास घेण्यासाठी चांगली शुद्ध हवा मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात आपण जात काम करु शकत नाही. परंतु हिवाळ्याच्या महिन्यात आपण बरेच तास काम करू शकतो.
त्याच बरोबर आपल्याला थकवा सुद्धा जाणवत नाही. हिवाळ्याचा हंगाम हा शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचा असतो. कारण हा हंगामात पिकांची लागवड केली जाते. तसेच हिवाळ्यात सकाळी – सकाळी हिमवर्षाव दव पडतो जणू हा काही मोत्यासारखा दिसतो.
निसर्गाचा “देखावा”
हिवाळ्यात डोंगराळ भाग हा खूप सुंदर दिसतो. कारण सर्व डोंगर आणि पर्वत हे बर्फाच्या चादरीने झाकलेले असतात. सर्व वस्तूंवर पडलेला बर्फ हा मोत्यासारखा दिसू लागतो. तसेच सकाळी धुके पडलेले असते.
हिवाळ्यात काही झाडांची पाने ही गळू लागतात. जमिनीवर पानांचा सडा पडलेला असतो. या काळात काही झाडांवर फुले येतात. तर काही झाडांवर फळे सुद्धा लागतात.
हिवाळ्यात सरोवरांमध्ये किंवा तलावांमध्ये कमळ हे फुल उमलते. तसेच रात्रीच्या वेळी चंद्राची चांदणे सुद्धा खूप आकर्षक दिसू लागते.
हिवाळा ऋतू चा आनंद
हिवाळ्यात सगळीकडे थंड वातावरण असते. या ऋतूमध्ये रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. थंडीला आवर घालण्यासाठी तसेच लोकांना उबदार ठेवण्यासाठी लोकरीचे कपडे घालावे लागतात.
सकाळी – सकाळी गरम – गरम चहा आणि कॉफी एक आनंददायी अनुभव प्रदान करते. हिवाळा या ऋतूचा प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेतो.
हिवाळा ऋतू चे वाईट “परिणाम”
हिवाळा हा ऋतू काही लोकांच्या जीवनात अडचणी आणि समस्या घेऊन येतो. तर काही लोकांसाठी आनंद घेऊन येतो. हिवाळा या ऋतूतील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे – गरीब लोक.
गरीब लोकांना राहण्यासाठी योग्य निवारा नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही वेळा ते थंडी पासून बचाव करण्यासाठी रात्रीच काम करतात आणि आगीच्या समोर बसतात. त्यांना अंगात घालायला उबदार कपडे सुद्धा नसतात.
तसेच या हंगामात बरेच पक्षी आणि प्राणी मरून जातात. प्रवास करताना सुद्धा खूप अडथळे निर्माण होतात. प्रवासामुळे लोक खूप अस्वस्थ होतात.
निष्कर्ष:
हिवाळा ऋतू हा एक हिम वर्षाव आणि फलदायी हंगाम आहे. या हंगामात आपल्याला काम करताना कोणताही त्रास सहन करावा लागत नाही. या ऋतूमध्ये संपूर्ण वातावरण सुंदर आणि आकर्षक दिसू लागते.