प्रस्तावना:
मानवाला आणि सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. कारण कोणताही प्राणी, पक्षी किंवा मानव पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.
मानव काही जीवन अन्नाशिवाय जगू शकतो. परंतु पाण्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. पाणी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अमूल्य संपदा आहे.
परंतु हे पाणी जेव्हा विष बनते तेव्हा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आज पानी प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे.
जर याची काळजी घेतली नाही आणि याला रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर या पृथ्वीवर राहणारे प्राणी, मानव, वनस्पती यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
पानी प्रदूषण म्हणजे काय –
पानी प्रदूषण म्हणजे जेव्हा पाण्यामध्ये दूषित किंवा हानिकारक पदार्थ मिसळले जातात तेव्हा पाणी दूषित होते त्याला ‘पानी प्रदूषण’ असे म्हटले जाते. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो. ज्यामुळे आपल्याला ना शुद्ध पाणी मिळते, ना शुद्ध वातावरण मिळते.
पानी प्रदूषण म्हणजे – मानवाला नदी नाले, तलाव, सरोवरे, विहिरी इ सर्व पाण्याचच्या स्रोतातून पाणी उपलब्ध होते. अशा या नैसर्गिक स्रोतांमध्ये दूषित पदार्थांचे मिश्रण होणे यालाच पानी प्रदूषण म्हटले जाते.
पाण्याचा उपयोग
आपल्या या पृथ्वीचा ७१% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. परंतु मानवाला पिण्यासाठी पाणी हे १% उपलब्ध आहे. या धरतीवर पाणी हे दोन प्रकारचे मिळते. एक गोड पाणी आणि दुसरे म्हणजे खारे पाणी.
मानव गोड पाण्याचा उपयोग हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. जसे की जेवण बनवणे, कपडे धुणे, भांडी धुणे तसेच साफ – साफ करण्यासाठी करतो. परंतु मानव या पाण्याचा दुरुपयोग करत आहे. तो पाण्याचे महत्त्व विसरून गेला आहे. तसेच तो नदी – नाल्यांमधील पाणी दूषित करत आहे. ज्यामुळे पानी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.
पानी प्रदूषणाची कारणे
पानी प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत – कारखाने आणि औद्योगिकीकरण.
मानव कारखान्यातील आणि अनेक उद्योगांमधून निघणारा दूषित कचरा आणि सांडपाणी नदी – नाल्यांमध्ये सोडतो.
त्यामुळे नदी – नाल्यांमधील पाणी हे प्रदूषित होते. नदी – नाल्यांमध्ये पाण्याच्या ऐवजी कचरा वाहताना दिसून येतो. तसेच काही लोक हे तलाव, नदी – नाले आणि समुद्र यामध्ये कचरा फेकतात.
त्यामुळे हा कचरा पाण्यामध्ये काही दिवस तसाच पडून राहतो आणि कुजतो. ज्यामुळे रोगराई पसरते आणि अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात.
तसेच गावातील काही लोक हे नदी – नाल्यांमध्ये जनावरे धुतात, कपडे आणि भांडी धुतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि पानी प्रदूषणाची समस्या निर्माण होते.
समुद्राच्या पाण्यात तेल गळती
समुद्रामध्ये जहाजांमधून मोठ्या प्रमाणात तेल गळती होते. जहाजांमधून होणाऱ्या तेल गळतीमुळे पाणी प्रदूषित होते.
तसेच समुद्रात राहणारे जीव हे मरून जातात. कधी – कधी समुद्राच्या पाण्यामध्ये जहाज बुडण्यामुळे समुद्राचे पाणी प्रदूषित होते.
पानी प्रदूषण रोखण्यास उपाय योजना
पानी प्रदूषण रोखण्यासाठी रासायनिक पदार्थ मिसळलेले पाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडू नये.
तसेच शेतीसाठी सेंद्रिय खातानाचा वापर कमी प्रमाणात करावा.
त्याच प्रमाणे नदी – नाल्यांमध्ये कुडा – कचरा फेकू नये.
उद्योगांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा दूषित कचरा आणि सांडपाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडू नये.
निष्कर्ष:
पानी हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे. तसेच पानी हेच जीवन आहे. कारण पानी हे मानवाच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे.
म्हणून प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. तसेच नदी – नाल्यांमध्ये कोणतेही दूषित पदार्थ टाकले नाही पाहिजेत. कारण या पानी प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवाच्या जीवनावर होऊ शकतो.
त्याच बरोबर सरकारने सिद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत. जर पानी प्रभूषण होण्यास प्रतिबंध केला जाईल तरच या समस्येपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते.