प्रस्तावना:
मानवाचे जीवन हे नदीच्या प्रवाहासारखे आहे. ज्या प्रमाणे नदी उंच – सखल भूमीला ओलांडून पुढे जात राहते त्याच प्रमाणे मानवाचे जीवन सुख – दुःख झेलून पुढे जाते.
जीवनाचा मुख्य उद्देश हा निरंतर पुढे जाणे हा आहे. यातच आनंद असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात पुढे जाण्यास मदत करते ती म्हणजे – वेळ.
ज्या लोकांनी या वेळेसाचे महत्त्व समजून घेतले आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला आहे. तेच लोक प्रगतीची शिडी चढले आहेत. वेळेचा योग्य वापर करणे ही विकास आणि यशाची गुरुकिल्ली आहे.
वेळेचे महत्त्व
गेलेली वेळ ही पुन्हा कधीही परत येत नाही. कोणीही या काळाचा गुलाम नाही आणि वेळ ही कोणावर अवलंबून नसते. ज्या वेळेचे महत्त्व समजत नाही आणि वेळेचा योग्य वापर करत नाही ती व्यक्ती आपल्या जीवनात कधीच यशस्वी होत नाही.
म्हणून कोणतेही काम हे वेळेवर करणे खूप गरजेचे आहे. जर ते काम वेळेवर झाले नाही तर ते एक अभिशाप बनते. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात कोणती ना कोणती इच्छा ठेवतो. जसे कि त्याला धनवान, बलवान व्हायचे असते.
जेव्हा तो आपल्या मनात अशी इच्छा ठेवतो तेव्हा त्याला वेळेचे महत्त्व समजून घेणे फार महत्वाचे आहे. ज्या व्यक्तीला वेळेचा योग्य वापर करणे हे समजले आहे ती व्यक्ती प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहचली आहे.
सुखांची प्राप्ती किंवा मिळकत
त्याच बरोबर वेळेवर काम करणारी व्यक्ती ही स्वतःचेच भल करत नाही तर आपल्या बरोबर कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाची प्रगती करते. जो माणूस वेळेचा योग्य वापर करतो तोच श्रीमान, हुशार आणि शक्तिशाली बनतो.
आज जर आपण असं अनुभवल कि, आपल्या देशात कितीतरी महान व्यक्ती होऊन गेलेत कारण त्या सर्वानी वेळेचा योग्य उपयोग केला आणि त्याचे महत्त्व समजून घेतले.
कामामध्ये यश
परंतु जी व्यक्ती या वेळेचा दुरुपयोग करते तिचे जीवन निरर्थक बनून जाते. एखाद्या कामाचे यश हे त्या कामाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते.
चांगल्या प्रकारे उपयोग करणे हे यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून माणसाने वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करण्यासाठी जीवन जगले पाहिजे.
आळस एक किडा
आळस हा माणसाचा आणि काळाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळस हा एक किडा आहे. जर हा एखाद्याच्या जीवनामध्ये लागला तर तो त्याचे जीवन नष्ट करून टाकतो.
निष्कर्ष:
जर आपल्याला वेळेचे महत्त्व आणि त्याच योग्य वापर करणे समजले असेल तर यश आपल्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही.
म्हणून आपण सर्वानी उरलेल्या वेळेचा चांगल्या प्रकारे वापर करून आपल्या देशाचा विकास करणे किंवा आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गाने पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि, वेळ कधी वाया घालवू नये. कारण वेळ एकदाच संधी देतो परत – परत नाही.