वृक्ष मराठी निबंध – वाचा येथे Essay on Trees our Best Friend in Marathi

प्रस्तावना:

मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. तसेच या निसर्गातून मानवाला सर्वात महत्वाची मिळणारी वस्तू म्हणजे – वृक्ष. वृक्ष या पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहे.

या वृक्षांबद्दल काही कवींची आणि संतांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी” आणि “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असं आत्मीयतेने वर्णन केले आहे. या वृक्षांचं मानवाच्या जीवनात अत्यंत महत्व आहे. कारण या वृक्षांशिवाय मानव आपले जीवन जगू शकत नाही.

वृक्षापासून मिळणाऱ्या गोष्टी

या वृक्षांपासून मानवाला अनेक प्रकारच्या वस्तू प्राप्त होतात. जसे कि मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. या सर्वाचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो.

तसेच या निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते. त्याच बरोबर वृक्ष मानवाला आणि सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन प्रदान करतात. वृक्ष सर्व सजीव सृष्टीला हानिकारक असणाऱ्या कार्बन डाइआक्साइड करतात.

झाडांचा उपयोग

मानव आपल्या जीवनामध्ये झाडांचा उपयोग इंधनाच्या रूपाने करतो. तसेच काही ग्रामीण भागातील लोक झाडाच्या लाकडांचा उपयोग जेवण बनवण्यासाठी करतात. त्याच बरोबर मानव झाडाच्या लाकडांपासून लाकडी दरवाजे, खिडक्या आणि प्रकारची खेळणी तयार केली जातात.

मानव झाडांच्या लाकडापासून उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल सुद्धा तयार करतो. तसेच रबर, माचीस आणि विविध प्रकारची औषधे सुद्धा तयार केली जातात.वृक्ष हे आपल्यासाठी सर्व काही आहेत. तसेच वृक्ष जमिनीला सुपीक बनवण्याचे कार्य करतात.

वृक्ष हे आपल्याला सावली तर देताच परंतु त्याच बरोबर आपली मुळे जमिनीत घट्ट पकडून राहतात. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. तसेच पर्वतावर असलेल्या वृक्षांमुळे ढगांना अटकाव होऊन पाऊस पडतो. आणि समुद्र किनाऱ्या जवळील वृक्ष हे खाडीच्या भरतीच्या पाण्याला अटकाव करतात.

मानवाचे निसर्गाशी नाते

मानव आणि निसर्ग हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. मानवाचे जीवन हे  वायू, आकाश, पृथ्वी, या तत्वांवर अवलंबून आहे.

या निसर्गातून मानवाला सर्वकाही मिळते पण त्या बदल्यात निसर्ग मानवाकडून कधीच काही मागत नाही.

स्वार्थी मानव

आज या धरतीवर जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे आणि त्याच बरोबर मानवाच्या मूलभूत गरज सुद्धा वाढल्या आहेत. म्हणून मानव आपल्या सुख सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी वृक्षांची तोड करत आहे.

आज मानव आपल्या स्वार्थापायी इतका आंधळा झाला आहे कि, तो वृक्षांचे महत्त्व विसरून गेला आहे. मानव वृक्षांची तोड करताना आपल्या स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत आहे.

मानव हा एक असा प्राणी आहे जो गरज नसताना सुद्धा दुसऱ्या प्राण्याचा जीव घेत आहे. पण वृक्ष तर बिचारी मुकी आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर हवे आहे. त्यासाठी तो मोठ्या प्रमाणात जंगलांची तोड करत आहे.

हिंदू धर्मात वृक्षांचे महत्त्व

हिंदू धर्मामध्ये वृक्षांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. वृक्षांची पूजा केली जाते.जसे कि वड, पिंपळ अशा वृक्षांना पवित्र मानले जाते. तसेच काही वृक्षांचा उपयोग हा हिंदू धर्मामध्ये पूजा – पाठ मध्ये केला जातो.

निष्कर्ष:

वृक्ष आपल्या जीवनात सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका निभावतात. तसेच वृक्ष हे मानवाचे मित्र सुद्धा असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.

त्याच बरोबर झाडांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे जतन केले पाहिजे. आपण सर्वांनी मिळून झाडे लावून, झाडे जगवून आपल्या भारत भूमीला सुजलाम सुफलाम सश्य श्यामलाम बनवले पाहिजे.

आमचा सर्वात चांगला मित्र मराठीवरील वृक्षांवरील निबंध संबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Updated: नवम्बर 11, 2019 — 8:34 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *