वृक्ष मराठी निबंध – येथे वाचा Essay on Trees in Marathi Language

प्रस्तावना:

संपूर्ण ब्रह्माण्डातील पृथ्वी हा एक एकमेव ग्रह आहे ज्यावर मानव वस्ती आहे. कारण या पृथ्वीवर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध वस्तू आणि संसाधने अस्तित्वात आहेत.

तसेच वृक्ष हे निसर्गाचा एक महत्वाचा हिस्सा आहेत. मानवाच्या जीवनात वृक्षांचे खूप महत्त्व आहे. वृक्ष हे मानवाच्या जीवनाचे आधार स्तंभ आहेत.

वृक्षांशिवाय मानव आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. वृक्ष हे आपल्याला जीवन देणारे आहेत आणि ते आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

वृक्षांपासून मिळणाऱ्या गोष्टी

mango tree वृक्षांपासून मानवाला फळे, फुले, भोजन आणि इंधन प्राप्त होत. या सर्वांचाउपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. तसेच वृक्षांपासून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच वृक्ष मानवाला ऑक्सिजन देतात आणि स्वतः कार्बन डाय ऑक्साइड सारखा हानिकारक गॅस शोषून घेतात.

वृक्षांचा उपयोग

Banyan Tree मानव वृक्षांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. ग्रामीण भागांमध्ये वृक्षांच्या लाकडाचा उपयोग हा इंधनच्या रूपाने केला जातो.

वृक्षांच्या लाकडापासून मानव दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो. तसेच वृक्षांपासून रबर, माचीस आणि उद्योगांसाठी लागणार कच्चा माळ तयार केला जातो.

वृक्षांची पूजा

Coconut Tree संपूर्ण जगामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्षांची पूजा केली जाते. विशेषतः भारत देशामध्ये वृक्षांना पवित्र समजले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. जसे कि तुळसी, पीपल आणि वड या वृक्षांना पूजिले जाते.

तसेच औषधी वनस्पतींमध्ये अनेक प्रकारची झाडे वापरली जातात. निंबू, तुळसी आणि आवळा यासारख्या वनसंपत्ती या मोठ्या प्रमाणात औषध म्हणून वापरल्या जातात.

पशु – पक्ष्यांचा निवास

Save Tree वृक्ष हे अन्य पशु – पक्ष्यांचा निवास आहे. कारण बहुतेक पक्षी हे वृक्षांवर आपले घरटा बांधून राहतात. ज्या प्रमाणे मानवाला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे निसर्गातील झाडे ही पशु – पक्ष्यांचे घर आहे.

वृक्षांचे फायदे

वृक्ष वातावरण सुंदर आणि स्वच्छ बनवतात.

Tree Plantation जिथे मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातात तिथे ध्वनी प्रदूषण फार कमी प्रमाणात होते. कारण वृक्षांच्या घनतेमुळे आवाज पसरत नाही.

तसेच वृक्षांच्या कोरड्या पानांपासून आपल्याला खत मिळते. ज्यामुळे जमीन सुपीक बनते आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे पीक येते.

टाच बरोबर वृक्ष आपल्याला उन्हाळ्यात सावली प्रदान करतात.

वृक्षांमुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये बदल होतो आणि त्यामुळे पृथ्वीचे संतुलन कायम राहते.

वृक्ष जास्त पाण्याचा प्रवाह थांबवून पूर रोखतात.

वृक्षांमुळे आपले वन्य जीव सुरक्षित आहेत.

वृक्षांमुळे अनेक ठिकाणी योग्य प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आपल्या पिकांना पाणी मिळते.

मानव आणि निसर्ग

neem tree निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते आहे. हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. वृक्ष आपल्याला शुद्ध हवा देतात. त्यामुळे हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते. म्हणून सर्व सजीव आपले जीवन सुखाने जगू शकतात. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे.

निसर्ग चक्र उलट फिरू लागले आहे. पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे.वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण जास्त प्रमाणात वाढले आहे.

वृक्षांची तोड

tree आज मनुष्य स्वार्थपायी आणि आपली सुख – सुविधा पुरी करण्यासाठी इतका आंधळा झाला आहे कि, तो वृक्षांचे महत्त्व विसरूनच गेला आहे. तो वृक्ष तोडताना आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे.

मानव आज सगळीकडची हिरवळ नष्ट करून सिमेंटची घरे उभी करत आहे. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन कमी होत चालला आहे. रस्त्यांवरची सावली देणारे वृक्ष नामशेष होत आहेत.

निष्कर्ष:

वृक्ष आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वृक्षांची रक्षा करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जो पर्यंत या पृथ्वीवर वृक्ष आहेत तोपर्यंत मानवी सभ्यता अस्तित्वात आहे. म्हणून आपण सर्वानी जास्तीत – जास्त झाडे लावून त्यांचे जतन केले पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *