वेळचे महत्त्व वर निबंध – Essay on The Importance of Time in Marathi Language
By hindiscreen
प्रस्तावना
आपल्या जीवनात सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ आहे. कोणत्याही व्यक्तीला वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. त्याने त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. वेळ ही पैशापेक्ष्या जास्त किमतीची आहे.
जर आपण पैसे खर्च केले तर परत कमावून मिळवू शकतो. परंतु एकदा गेलेलं वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. वेळ ही कधी कोणासाठी थांबत नाही. म्हणून आपल्याला अमूल्य वेळेचा उपयोग करून घेतला पाहिजे.
हिऱ्यापेक्षा मौल्यवान
वेळ पैश्यापेक्षा आणि हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे. कारण जर एकदा वेळ निघून गेली तर परत येत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसा असेल आणि ती व्यक्ती जगातील कोणतीही वस्तू विकत घेऊ शकते.
पण ती व्यक्ती वेळ कधीही विकत घेऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्ती वेळेची किमत नाही समजू शकला तर त्याला वेळेचे महत्त्व कधीच वाटणार नाही. जर आपण वेळ वाया घालवत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही.
वेळेचा उपयोग
प्रत्येक व्यक्तीला वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे. आपली सर्व कामे वेळेत केली पाहिजेत. त्याच बरोबर स्वतःला शिस्त लावून घेणे आवश्यक आहे.
शाळेत किंवा ऑफिसला जाताना. घरातील सर्व कामे वेळेत केली पाहिजेत. तसेच वेळेवर उठणे, झोपणे, वेळेत आहार घेणे आणि ठरलेली कामे वेळेत करणे गरजेचे आहे. म्हणून संत कबीर यांनी म्हटले आहे कि –
“कल करे सो आज कर, आज करे सो अब”
याचा अर्थ असा होतो कि, आजची कामे उद्यावर न ढकलता उलट उद्याची कामे जर आजच करून आणि आजची कामे ह्या क्षणाला पार पाडली पाहिजेत. जर सर्व कामे वेळे आधीच पूर्ण केलीत तर आपण तणाव मुक्त राहतो.
वेळेचे महत्त्व
आपल्या जीवनात वेळेचे खूप महत्त्व आहे. जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये वेळेचा सदुपयोग करतो तो नेहमी यशस्वी होतो. त्याला सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात.
त्याच बरोबर जो मनुष्य आपल्या जीवनात वेळेचा दुरुपयोग करतो. त्याचे जीवन निरर्थक होते. त्याला जीवनात अपयश प्राप्त होते आणि दु:ख आणि गरिबी शिवाय काही मिळत नाही.
आळस मनुष्याचा शत्रू
आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. हा जीवनाला लगनाला एक किडा आहे. जर तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लागला तर त्याचे जीवन नष्ट करून टाकतो.
मग त्या व्यक्तीला वेळ निघून गेल्यावर वेळेचे महत्व समजते. त्याला असा वाटत कि आपण आपला वेळ का फुकट घालवला. आपल्याला सर्व कामे ही वेळेत केली पाहिजे होती.
सुखांची मिळकत
जी व्यक्ती वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग करून आपल्या जीवनात यशस्वी होते तीच व्यक्ती आपले शेवट पर्यंतचे शिखर गाठू शकते. कारण तीच व्यक्ती आपली सर्व कामे वेळेत करून आपल्या बरोबर देशाचा, गावाचा आणि कुटुंबाचा विकास करते.
त्याच बरोबर वेळेचा उपयोग करणारी व्यक्तीच त्याचे महत्व समजून धनवान, ताकदवान आणि बुद्धिमान होऊ शकते.
महानपुरुष
आज आपल्या देशामध्ये अनेक महान नेता, संत, शास्त्रज्ञ होऊन गेलेत. त्यांनी वेळेचा उपयोग करून आपल्या देशासाठी महान कार्य केले.
वेळ कधीही गरीब – श्रीमंत, लहान – थोर, उच्च – नीच असा भेदभाव करत नाही. वेळ ही पक्षपाती प्रमाणे सर्वांनाच संधी देतो आणि पुढे जात राहतो.
निष्कर्ष
या जगात वेळेपेक्षा कोणतीही मौल्यवान गोष्ट नाही. म्हणून प्रत्येकाने वेळेचे महत्त्व समजून त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे.
त्याच बरोबर आपल्याकडे असलेल्या वेळेला सांभाळून वापरले पाहिजे. जर वेळेचा सदुपयोग केला तर आपल्याला जीवनात यश नक्की मिळू शकेल.
For any other query regarding the Essay on the Importance of Time in Marathi Language, you can ask us by leaving your comment below.