दहशतवाद मराठी निबंध – वाचा येथे Essay on Terrorism in Marathi

प्रस्तावना:

दहशतवाद ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे ही जागतिक स्तरावरची सुद्धा समस्या आहे ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सर्व देशांवर परिणाम होत आहे.

अनेक देश दहशतवादाचा सामना करत आहेत. दहशतवाद हा एक हिंसाचाराचा प्रकार आहे जो बेकायदेशीर आहे. याचा उपयोग लोकांना घाबरविण्यासाठी केला जातो.

आपल्या भारत देशात सर्व धर्माच्या लोकांमध्ये विविधतेमध्ये एकताची भावना दिसून येते. परंतु काही लोक हे असे असतात की, त्यांना देशाचे एकीकरण तोडायचे असते. ते आपला देश हा एकत्र राहताना पाहू शकत नाही.

दहशतवादाचा अर्थ –

दहशतवाद या शब्दाचा अर्थ असा होतो की, कोणत्याही विनाशकारी शक्तीमुळे समाजात किंवा देशात भीतीची परिस्थिती निर्माण करणे होय.

दहशतवादांचा मुख्य उद्देश –
दहशतवादी लोकांचा मुख्य उद्देश दहशत निर्माण करणे हा आहे. त्यांचे मुख्य उद्दिष्ट हे सरकार आणि देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे.

दहशतवाद लोकांचा देश, राज्य, धर्म किंवा जात नसते. दहशतवादी लोक हे मुले, महिला तसेच वृद्ध माणसे किंवा तरुण लोकांना ठार मारतात.

दहशतवादाचे प्रकार

दहशतवादाचे दोन प्रकार आहेत. जसे की राजकीय दहशतवाद आणि गुन्हेगारी दहशतवाद.

राजकीय दहशतवाद –

राजकीय दहशतवाद म्हणजे आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण करणे.

गुन्हेगारी दहशतवाद –

गुन्हेगारी दहशतवाद म्हणजे लोकांचे अपहरण करून त्यांच्याकडे पैश्यांची मागणी करणे.

दहशतवादाचे मुख्य कारण

आपल्या भारत देशात दहशत पसरण्याची अनेक कारणे आहेत. काही लोक हे धर्मावरून आणि जातीभेदावरून भांडणे करतात.

तसेच दारिद्र्य, बेरोजगारी, भूक आणि धार्मिक उन्माद ही दहशतवादाची मूळ कारणे आहेत. अनेक लोक हे धर्माच्या नावाखाली एकमेकांना ठार मारण्यासाठी मागे हटत नाहीत.

या सर्व कारणांमुळे देशातील ऐक्याची भावना ही धोक्यात आली आहे. काही परकीय शक्ती भारत देशाला कमजोर बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

दहशतवादाची समस्या

कोणत्याही देशामध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी हिंसक पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामुळे आपण देशाचा विकास करण्यासाठी कोणतेही कामे करण्यास असमर्थ आहेत.

जेव्हा आपला भारत देश हा विकास करू लागतो तेव्हा परकीय शक्ती भारताच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात. दहशतवादी लोक हे लालची लोकांना पैसे देऊन दंगल घडवून आणतात.

तसेच काही दहशतवादी लोक हे बसमधील प्रवाश्याना ठार मारतात, बँकेची लूट करतात तर काही सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब फेकून अनेक कृती करून दहशत निर्माण करतात.

दहशतवाद रोखण्याचे उपाय

दहशतवाद हा देशाला आणि समाजाला लागलेला एक सर्वात मोठा कलंक आहे. दहशतवाद हा कोणत्याही व्यक्तीसाठी लाभदायक नाही आहे.

दहशतवादामुळे सर्वात जास्त मनुष्य हानी होते. तसेच माहित नाही दहशतवादी लोक हे कितीतरी मुलांना अनाथ बनवतात आणि बऱ्याच स्त्रियांना अनाथ बनवतात.

म्हणून आपल्या देशातील दहशतवादाची समस्या दूर करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. तसेच या समस्येवर मात करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था मजबूत केली पाहिजे. त्याच बरोबर देशातील सर्व लोकांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दहशतवाद विरोधी दिवस

दहशतवादाचा सामना करण्यासाठी देशाला एकत्र मिळून कार्य करणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या देशात २१ मे ला ‘दहशतवाद विरोधी दिवस’ साजरा केला जातो. या समस्ये विरुद्ध लढण्यासाठी केवळ एकटा देश काही करू शकत नाही कारण ही जागतिक स्तरावरची समस्या आहे.

निष्कर्ष:

दहशतवाद हा आपल्या देशाला लागलेला एक कलंक आहे. देशातील सर्व लोकांनी यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

जेव्हा सरकार आणि देशातील जनता एकत्रितपणे मिळून प्रयत्न करतील तेव्हाच दहशतवाद दूर होऊ शकतो.

Updated: दिसम्बर 14, 2019 — 12:41 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *