प्रस्तावना:
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे फार महत्त्व असते. कारण एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ज्ञान देऊन, त्यांची काळजी घेऊन आणि त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक मजबूत आकार देतो.
तसेच विद्यार्थ्याला शिक्षण देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते. म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये आई – वडिलांनंतर केवळ शिक्षकच महत्वाची भूमिका निभावतात.
उदा:
शिक्षक हे एका कुंभारासारखेच असतात. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या भांड्यांना घडविताना एका हाताने हाताळतो आणि दुसऱ्या हाताने त्यांना आकार देतो.
त्याच प्रमाणे शिक्षक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन एक चांगला व्यक्ती म्हणून घडवतात. तसेच शिक्षकांशिवाय एका चांगल्या समाजाची कल्पना करता येणार नाही.
ज्ञानाचा प्रकाश
शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करतात आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. मुले शिक्षकांकडे श्रद्धेच्या भावाने जातात. कारण ते ज्ञानाच्या सागरात डुबकी मारू शकतील.
‘श्रद्धावन लाभते ज्ञानम’ असे म्हटले जाते ज्याचा अर्थ होतो श्रद्धेला ज्ञान प्राप्त होते. जर विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा असेल तरच शिक्षक त्याला सर्व ज्ञान देतात.
शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. कारण ते एक मार्गदर्शकाची भूमिका निभावून योग्य मार्गदर्शन करतात. एका व्यक्तीला धोक्यापासून वाचविण्याची आणि चांगल्या मार्गाकडे नेण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्ये असते. तसेच शिक्षकांकडे आपल्या देशाबद्दल प्रेम आणि देशभक्ती निर्माण करण्याची शक्ती असते.
समाजाचा निर्माता
शिक्षक समाज घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. शिक्षकांचे दायित्व हे खूप मोठे असते. कारण शिक्षकच प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला योग्य दिशा दाखवतात.
मुल ही देशाचे भविष्य असतात. जर ही मुले शिकलेली आणि सुशिक्षित असतील तरच देशाचे नाव उज्ज्वल होऊ शकते. तसेच आपण जर सुसंस्कृत असलो तर देश सुद्धा सभ्य बनेल.
शिक्षकांचे कार्य
एक चांगला शिक्षक होण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. तसेच आई आणि वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावा.
तसेच चांगला शिक्षक बनण्यासाठी आपल्या मनात ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर त्यांच्याकडून आपण जगण्याची कला देखील शिकतो.
आपल्या व्यक्तिमत्त्वात त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर इत्यादि। गोष्टींचा प्रभाव पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी शिक्षकांबद्दल आदर असला पाहिजे.
शिक्षकाचे महत्त्व
आपल्या पुराणामध्ये देवापेक्षाही गुरूला म्हणजेच शिक्षकाला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. कारण असे मानले जाते की, ज्यावेळी या धरतीवर मानवाचा जन्म झाला तेव्हा त्याने देवाला ओळखले नाही.
तोच गुरु आहे ज्याने मनुश्याला देवाची जाणीव करून दिली. म्हणून सर्वात प्रथम गुरुची आणि त्यानंतर भगवंताची पूजा केली जाते. त्याच बरोबर हिंदू धर्मामध्ये शिक्षकाला देवापेक्षा वरचढ मानले जाते.
शिक्षक दिवस
शिक्षक आपल्याला एक चांगला नागरिक म्हणून घडवतो. त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे आणि कार्यामुळे त्यांचा आदर आणि सम्मान करण्यासाठी दरवर्षी भारत देशात ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो.
हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच विद्यार्थी शिक्षकांना पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड देतात. तसेच हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिवस आहे. त्याच बरोबर यादिवशी अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते.
निष्कर्ष:
आपले विद्यार्थी जीवनात पुढे जावे अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते. तसेच शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांचा विकास शक्य नाही.
शिक्षक ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्याला समाजात राहण्यासाठी योग्य बनवते आणि विचार करण्याची व समजण्याची क्षमता विकसित करतो. अशा शिक्षकांचा प्रत्येक व्यक्तीने आदर आणि सम्मान केला पाहिजे.