स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध – वाचा येथे Essay on Swachh Bharat Abhiyan in Marathi

प्रस्तावना:

एकेकाळी भारत देशाला सोन्याचा किंवा सुवर्ण पक्षी या नावाने ओळखले जात होते. जो आपल्या वैभवाने आणि संस्कृतीने प्रख्यात झाला होता.

परंतु काळ बदलल्यामुळे आपल्या भारत देशावर बऱ्याच बाह्य शक्तींनी राज्य केले. त्यामुळे भारत देशाची स्थिती अधिकच बिघडली. तसेच आपल्या भारत देशात स्वच्छतेकडे लक्ष दिले जात असे. भारत देशात कुडा – कचरा हा मोठ्या प्रमाणात दिसून येत असे.

म्हणून भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरु केले. स्वच्छ भारत अभियान हे भारतातील स्वच्छतेच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात

आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर, २०१४ साली महात्मा गांधी जयंती निमित्त केली होती.

तसेच राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दाखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियानाला ‘स्वच्छता अभियान’ किंवा ‘स्वच्छ भारत मिशन’ या नावाने सुद्धा ओळखले जाते.

स्वच्छतेच्या प्रति भारत देशाची प्रतिमा बदलण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशाला एका मोहिमेसह जोडण्यासाठी जन आंदोलन करून याची सुरुवात केली.

स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश

 

स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे. ज्याच्या अंतर्गत संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्याचे ध्येय घेण्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की, भारत देशातील सर्व गावे आणि शहरे ही हागणदारी मुक्त करणे. तसेच भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे.

* स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश आहे देशातील प्रत्येक कोना – कोपरा हा स्वच्छ असावा.

संबंधित लेख:  होळी वर मराठी निबंध - वाचा येथे Holi Essay in Marathi

* लोकांना उघडयावर शौच करण्यास प्रतिबंध करणे.

* भारत देशातील प्रत्येक गावातील आणि शहरातील घरात शौचालयांची निर्मिती करणे.

* शहरातील आणि गावातील प्रत्येक रस्ता आणि गल्ली स्वच्छ करणे.

* तसेच प्रत्येक रस्त्यावर कमीत – कमी एक कचराकुंडी असणे आवश्यक आहे.

महात्मा गांधीजींचे स्वप्न

आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधीजी हे स्वातंत्र्या पूर्वी स्वच्छ राहत असत आणि त्यांनी सर्वाना स्वच्छतेचे शिक्षण दिले. महात्मा गांधी स्वतः ज्या आश्रमात राहत असत. त्याची दररोज पहाटे ४ वा. उठून साफ – सफाई करत असत.

महात्मा गांधीजींनी एकदा असे म्हटले होते की, स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाची आहे. स्वच्छता ही निरोगी आणि शांतिपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. तसेच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

म्हणून महात्मा गांधीजींनी देशातील सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले. म्हणून महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

स्वच्छ भारत अभियानाचा प्रयत्न

भारत सरकारचा स्वच्छ भारत अभियान सुरु करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही आहे. तर भारत सरकारने सन १९९९ मध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले होते.

ज्याचे नाव देशाचे माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘निर्मल भारत अभियान’ असे ठेवले. परंतु स्वच्छ भारत अभियानाला नरेंद्र मोदी यांच्या संजीवनीखाली चालना मिळाली.

स्वच्छ भारत अभियानाची आवश्यकता

आपल्या भारत देशात अशी कोणतीच जागा नाही जिथे कचरा दिसत नाही. प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक गल्ली, प्रत्येक परिसर आणि रस्त्यावर कचराच – कचरा असायचा. त्यामुळे अनेक प्रकारची रोगराई पसरायची त्यामुळे असंख्य लोक आजारी पडत असत.

संबंधित लेख:  शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध - वाचा येथे Shetkaryanche Manogat Essay in Marathi

यामुळे आपल्या भारत देशाचा आर्थिक विकास होत नसे. आपल्या भारत देशामध्ये काही ठिकाणी शौचालये नसल्यामुळे काही लोक हे उघड्यावर शौच करण्यास जातात.

त्यामुळे सर्व ठिकाणी घाण होते आणि नवीन आजार जन्माला येतात. या सर्वांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

निष्कर्ष:

आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की, जिथे स्वच्छता असते तिथे देव वास्तव्य करतात. म्हणून आपण सर्वानी आपल्या घराबरोबरच आपला देश सुद्धा साफ – सुथरा ठेवला पाहिजे. तसेच स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने उचललेले कौतुकास्पद पाऊल आहे.

Updated: December 14, 2019 — 12:00 pm

Leave a Reply

Your email address will not be published.