प्रस्तावना:
स्वच्छता म्हणजे आपले घर, परिसर आणि देश साफ करणे नव्हे तर त्याच बरोबर आपले शरीर, मन आणि हृदय सुद्धा स्वच्छ ठेवणे आहे.
ही आपल्या देशासाठी आणि जीवनासाठी खूप महत्वाची आहे. कारण आजकाळ अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात आणि या रोगांना मुख्यतः मानवाला सामोरे जावे लागते.
म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटले आहे की, जिथे स्वच्छता असते तिथे देवाचे वास्तव्य असते. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये शुद्धता आणि स्वच्छता या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
जीवनाचा अविभाज्य भाग
स्वच्छतेची सुरुवात ही प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीरा स्वच्छते पासून केली पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण स्वच्छतेविषयी जागरूक राहून कार्य केल्यास त्याची छाप इतरांच्या जीवनावर देखील पडते.
स्वच्छतेचे महत्त्व
स्वच्छता आपल्याला मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रकारे निरोगी ठेवते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतः स्वच्छता केली पाहिजे. तसेच आपल्या देशामध्ये इतर ठिकाणांपेक्षा मंदिरांमध्ये जास्त प्रमाणात घाण आढळून येते.
कारण लाखो भाविक हे धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी त्या ठिकाणी पोहोचतात. परंतु ते स्वच्छतेचे महत्त्व जाणून सुद्धा तेथे मोठ्या प्रमाणात घाण पसरवतात. म्हणून स्वच्छता ही निरोगी मन, शरीर आणि आत्मा यांसाठी खूप महत्वाची आहे.
आचरणात स्वच्छता
आचरणाच्या शुद्धतेमध्ये स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. कारण शुद्ध वागण्याने माणसाचा चेहरा चमकदार होतो आणि त्या व्यक्तीकडे सर्व लोक हे आदराने पाहतात. त्या व्यक्तीचा आदर करतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वच्छता ठेवते ती व्यक्ती नेहमी आनंदी दिसून येते.
जर आपण आपल्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवली तर कोणतीही रोगराई पसरत नाही. साफ – सफाई केल्याने व्यक्तीला आनंद मिळू शकतो. तसेच त्याचे मन सुद्धा प्रसन्न राहते.
स्वच्छता ही मानवाला अनेक रोगांपासून वाचवण्याचे कार्य करते. आजकाल काही लोक हे स्वच्छतेला फार कमी महत्त्व देतात. ते आजूबाजूला कचरा असलेल्या ठिकाणी राहतात. स्वच्छता ही देखील कपड्यांशी आणि अन्नाशी संबंधित असते.
तसेच प्रत्येक व्यक्तीने स्वयंपाकघरातील वस्तू आणि खाद्य पदार्थांची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारातून आणलेली फळे आणि भाज्या धुऊन वापरल्या पाहिजेत. पिण्याचे पाणी हे स्वच्छ भांड्यात झाकून ठेवले पाहिजे.
स्वच्छतेचे प्रकार
स्वच्छता ही दोन प्रकारची असते – एक म्हणजे शारीरिक स्वच्छता आणि दुसरी म्हणजे अंतर्गत स्वच्छता.
शारीरिक स्वच्छता ही आपल्याला बाहेरून स्वच्छ ठेवते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. परंतु अंतर्गत स्वच्छता ही आपल्याला मानसिक शांतता देते. अंतर्गत स्वच्छता ही आपले वाईट आणि नकारात्मक विचारांची अनुपस्थिती दर्शविते.
म्हणून आपल्याला आपल्या घराबरोबर सभोवतालचे वातावरण देखील स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून आपण स्वच्छ आणि निरोगी वातावरणात जगू शकतो.
स्वच्छता अभियान
आज भारत सरकारने संपूर्ण देश आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. देशामध्ये सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले आहे.
याची सुरुवात आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर, २०१४ साली महात्मा गांधी जयंती केली आहे. त्यांनी भारत देशाची प्रतिमा बदलण्यासाठी देशातील सर्व लोकांना एकत्र करून म्हणजेच जन आंदोलन करून या अभियानाची सुरुवात केली.
निष्कर्ष:
प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. तसेच प्रत्येकाने जास्तीत – जास्त झाडे लावून वातावरण शुद्ध ठेवले पाहिजे. जर आपला देश स्वच्छ राहील तर देशातील जनता देखील निरोगी राहील.