प्रस्तावना:
आमचा भारत देश महान पुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत भूमीवर अनेक महान महान पुरुषांनी जन्म घेतला आहे. त्या सर्वांपैकी आपल्या भारत देशाचा इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
शिवाजी महाराज हे एक शूर, बुद्धिमान आणि निर्भय शासक होते. ज्यांनी आपले संपूर्ण जीवन लोक हितासाठी अर्पण केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे नेता होते जे केवळ जनतेसाठी जगले. ज्यांनी गुलामासारख जगण नाकारलं आणि जन्म दिला एका प्रतिष्ठित मराठ साम्राज्याला.
शिवाजी महाराज यांचा जन्म
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फरवरी, १६३० साली शिवनेरी येथील रायगड किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांचे पूर्ण शिवाजी शहाजी भोसले असे होते.
परंतु काही वर्षांनी शहाजी राजे यांचा मृत्यु झाला आणि शिवाजी महाराज यांनी आपली घौडदौड एकत्र करून जावळीच्या दारीखोऱ्यातील प्रदेश जो विजापूरचा जहागीर (चंद्रराव मोरे) याकडून जिंकून घेतला. या घटनेमुळे आदिलशाहचा राग अनावर झाला. म्हणून त्याने शिवरायांना पराभूत करण्यासाठी आपला शक्तिशाली सरदार अफजलखान याला धाडले.
अफजलखानचे षड्यंत्र
या सर्वच बदला घेण्यासाठी अफजलखान ने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी षड्यंत्र रचले. त्याने शिवाजीना भेटीसाठी प्रतापगडावर बोलावले. पण अफजल खानला हे माहित नाही होते कि, शिवाजी महाराज त्याच्या पेक्षा हुशार आणि एक पाऊल पुढे आहेत.
त्यांनी अफजलखानचा डाव ओळखला आणि गनिमी काव्याचा डाव रचला. ज्यावेळी शिवाजी महाराज अफजलखानला भेटण्यासाठी प्रतापगडावर गेले तेव्हा खानाने शिवरायांना मिठी मारली आणि त्यांच्या पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केला.
परंतु हा अफजलखानचा डाव त्याच्यावरच उलटा पडला.शिवरायांनी आपल्या अंगात चिलखत घातले होते. म्हणून त्यांचा जीव वाचला आणि राजेंनी वाघनखे बाहेर काढून खानच्या पोटात घुसवली. खानाचा कोठला बाहेर आला आणि खान खाली कोसळला.
शिवरायांवर हल्ला झाला असे समजताच जंगलात लपलेल्या मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. याच गनिमी काव्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाई जिंकल्या. म्हणून याला ‘गनिमी कावा’ असेही म्हटले जाते.
शिवरायांचा राज्याभिषेक
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मराठा साम्राज्य दूरपर्यंत पसरवले. म्हणून ६ जून, १६७४ साली रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला गेला आणि या सोहळ्यात शिवाजी महाराजांना मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरविण्यात आले.
या सोहळ्यात ५००० हजार लोक हजार होते आणि पंडित गागा भट्टानी हा सोहळा परिपूर्णरित्या पार पडला. या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, हिंदी धर्मोद्धारक आणि क्षत्रिय कुलावतंस अशा नावानी गौरव करण्यात आला.
राजमुद्रा
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”
ज्याचा अर्थ असा होतो कि, ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि संपूर्ण विशत वंदनीय होतो. तसाच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
शिवजयंती
आमच्या भारत देशामध्ये १९ फरवरी या दिवशी शिव जयंती साजरी केली जाते. शिवजयंती स्कूल आणि कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी शिवरायांच्या फोटोला हार घातला जातो. तसेच या दिवशी ढोल – ताशा वाजवत मिरवणुका काढल्या जातात.
निष्कर्ष:
छत्रपती शिवाजी महाराज हे एक कुशल राज्यकर्ता होते. जे जनतेच्या हितासाठी लढत राहिले म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ या नावाने संबोधले जाते.
असे हे रयतेला लेक्रप्रमाणे मानणारे शिवाजी महाराज के केवळ महान युगपुरुष नाही होते तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान आणि आचरणाला महात्म्याप्रमाणे मानणारे वंदनीय थोर पुरुष होते.
मराठीतील शिवाजी महाराज निबंध संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली तुमची प्रतिक्रिया देऊन आम्हाला विचारू शकता.