प्रस्तावना:
भारत सारख्या पवित्र भूमीवर अनेक महान वीरांनी जन्म घेतला आहे. या भारत भूमीवर जन्मलेल्या वीरांची शौर्य गाथा ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानले जाते.
ज्यांनी मावळ्यांना आपल्या सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे राजा होते जे संपूर्ण आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढत राहिले.
त्यांनी गुलामासारखं जगण नाकारल आणि त्यांनी जन्म दिला प्रतीष्टीत अशा मराठा साम्राज्याला. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती संपूर्ण जगात आहे.
त्यांचा जन्म
महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही शिवाजींना शिवराय, शिवाजी महाराज, शिवाजीराजे, शिवबा, शिव, शिवा, शिवाजीराजा अशा अनेक नावांनी ओळखत असे.
शिवाजी महाराजांचे बालपण
काही वर्षांनी शिवाजीराजे यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपली घौडदौड पुन्हा सुरु केली आणि त्यांनी जावळीच्या दरी- खोऱ्यातील प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूरचा जहागीर होता त्याच्याकडून जिंकून घेतले.
या घटनेमुळे आदिलशहाचा राग अनावर झाला नाही. म्हणून त्याने शिवरायांना पराभूत करण्यासाठी शक्तिशाली सरदारांपैकी अफजलखान या शक्तिशाली सरदाराला धाडले. अफजल खानने शिवरायांना मारण्याचा डावपेच रचला.
अफजलखान आणि शिवरायांची भेट
अफजल खानाने शिवरायांना प्रतापगडावर भेटीसाठी बोलावले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानचा डाव ओळखून होते. अफजल खानाला हे माहित नव्हते कि, शिवाजी महाराज हे त्याच्या एक पाऊल पुढे आहेत.
त्यांनी खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गनिमी काव्याचा डाव रचला. जेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडावर अफजल खानला भेटायला गेले तेव्हा त्याने शिवरायांना आलिगन देण्यासाठी जवळ बोलावले. शिवरायांनी खानाला मिठी मारताच त्याने त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली.
पण अफजल खानचा तो डाव त्याच्यावरच उलट पडला. शिवरायांनी अंगात चिलखत घातल्यामुळे त्यांना काही झाले नाही. शिवरायांनी आपल्या चपळाईने वाघनखे बाहेर काढून खानाचा कोथळा बाहेर काढला आणि खान जमिनीवर कोसळला.
शिवरायांच्या मावळ्याला त्यांच्यावर हल्ला झाला हे समजताच त्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. या लढाईत खानाचे सर्व सैन्य मारले गेले. ह्याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले.
शिवराज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मराठा साम्राज्य दूरवर पसरवले. म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ जून, १९७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला आणि शिवरायांना ‘मराठ्यांचा राजा छत्रपती’ म्हणून गौरविण्यात आले.
हा राज्याभिषेक सोहळा पंडित गागा भट्टानी पार पाडला. तसेच या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना छत्रपती, कुलावतंस आणि हिंदू धर्मोद्धारक म्हणून घोषित करण्यात आले.
अष्टप्रधान मंडळ
शिवरायांची प्रशासकीय धोरणे ही अनुकूल आणि मानवी स्वरूपाची होती. त्यामध्ये चौथ आणि सरदेशमुखी अशा दोन कर पद्धतींची सुरुवात केली.
निष्कर्ष:
शिवाजी महाराज हे एक शूरवीर योद्धा होते. त्यांच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करांमध्ये डावपेच पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती.
म्हणून त्यांना एक महान योद्धा आणि जाणता राजा असे म्हटले जाते. ही भारत भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल ऋणी आहे.