शेतकरी मराठी निबंध -येथे वाचा Essay on Shetkari in Marathi

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. हा गावा – गावांचा देश आहे. या भारत देशातील बहुतेक लोक खेड्यात राहतात. तसेच शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.

म्हणून शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा असतो. जर या शेतकऱ्याने आपल्या शेतात काही उगवलं नाही तर आपण सर्वाना आपले जीवन जगणे खूप कठीण होईल.

शेतकरी म्हणजे काय –

शेतकरी म्हणजे शेती करणारी व्यक्ती असते. शेतकरी बांधव हे दिवसरात्र शेतात काम करत असतात. म्हणून आपल्या ओठांवर ‘मेरे देश कि धरती सोना उगले, उगले हिरे – मोती मेरे देश कि धरती’ अशा ओळी येतात. म्हणून जर हा शेतकरी सुखी असेल तर आपण सुखी राहू शकतो.

शेतीचा विकास

शेती हा व्यवसाय फार पुरातन काळापासून चालत आलेला आहे. शेतीचा उगम हा आदिमानवाच्या विचारातून झाला आहे.

भारत देशातील ग्रामीण भागातील लक्ष हे जास्तीत – जास्त शेती हा व्यवसाय करतात. भारत देशात प्राचीन काळापासून सखोल भागात शेती केली जाते.

शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी

शेतकऱयाला शेती करण्यासाठी मुख्यतः तीन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे सुपीक जमीन त्यानंतर पाणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्यबळ.

जर शती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी असेल तरच शेतकरी शेती करू शकतात. शेतकऱ्याला शेती करताना येणार खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे लागतो. त्यानंतर तो शेवटी आपला उत्पादित केलेला शेतमाल बाजार पेठेत नेऊन विकतो.

शेतकऱ्यांसाठी शेती हिच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदार निर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो. तसेच जगातील अनेक उद्योग करणारे लोक हे काळात – नकळत शेतीवर अवलंबून असतात.

शेतकऱ्यांचे मित्र

काही शेतकरी हे बैल, म्हशी यांच्या साहाय्याने शेती करतात. तर काही शेतकरी हे शेतीच्या यंत्राच्या साहाय्याने शेती करतात. गाय, म्हैस, बैल, रेडा, गांडूळ, साप, कोंबड्या, मधमाश्या, शेळ्या आणि फुलपाखरू हे सर्व शेतकऱ्यांचे मित्र मित्र असतात.

काही पक्षी हे शेतातली धान्य खातात. तर काही पक्षी हे शेतीला नुकसान करणाऱ्या कीटक आणि किड्याना खातात. पक्षी पिकाची काढणी झाल्यानंतर जमिनीवर पडलेले दाणे टिपतात.

शेतकऱ्यांवर येणारी संकटे

शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जसे की, बेसुमार पाऊस, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ, बाजार पेठेतील बाजार भावात होणारी घसरण, तसेच शेतीसाठी सरकारडून किंवा बँकांमधून घेतलेले कर्ज त्याची परतफेड, अशा अचानक निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

तसेच हवामानात होणाऱ्या अचानक बदलांमुळे शेतीचे फार नुकसान होते. शेतकरी हा हजारो रुपये खर्च करून शेतमाल गोळा करतो तसेच त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी त्याच्या पदरात किंवा कष्टाला फळ मिळतच असे नाही.

जय जवान, जय किसान नारा

म्हणून आपल्या देशातील शेतकऱ्यांना जय जवान, जय किसान असे गौरवितो. कारण आपण शेतकऱ्यांच्या जीवनाचा कधीच विचार करत नाही.

आपल्या देशासाठी आणि मातृभूमीसाठी अन्न धान्य पिकवणारा तसेच धरतीला सुजलाम – सुफलाम बनवणारा शेतकरी हा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि देशातील लोकांना अन्न धान्य पुरविण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबत असतो.

निष्कर्ष:

शेतकरी हा खरोखरच या जगाचा पोशिंदा आहे. तसेच शेतकऱ्याप्रमाणेच आपल्या मातृभूमीला सुजलाम – सुफलाम बनविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावले पाहिजे.

कारण त्यापासून प्रदूषण रोखण्यास मदत होईल आणि जमिनीची धूप सुद्धा होणार नाही. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आणि सहकार्य केले पाहिजे.

Updated: November 27, 2019 — 11:46 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *