प्रस्तावना:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जानवर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध संसाधने उपलब्ध आहेत. तसेच इतर कोणत्याही ग्रहांवर जीवन शक्य नाही. कारण ते नापीक वाळवंटाप्रमाणे आहेत आणि तिथे पाणी मिळत नाही.
पाण्याशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. कारण मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. पाणी हे जीवनातील सर्वात महत्वाचे अनमोल रत्न आहे.
पाणी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेटवस्तू आहे. मानव काही दिवस अन्ना शिवाय राहू शकतो. परंतु मानव आपले जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाण्याचा एक – एक थेंब महत्वाचा आहे. म्हणून म्हटले गेले आहे कि, पाणी हेच जीवन आहे.
पाण्याची बचत म्हणजे –
खार पाणी आणि गोड पाणी
पाण्याचा उपयोग
प्राणी आणि वनस्पतींना आवश्यक
लोकसंख्येचे प्रमाण
आज जसजशी लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्याच प्रमाणे पाण्याची गरज देखील वाढत आहे. त्याचा जल चक्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. जगातील सांडपाण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे.
निसर्गाने दिलेली मौल्यवान वस्तू
परंतु आज आधुनिक युगात मानवाच्या दुर्लक्षामुळे धरतीवर पाण्याची कमतरता भासू लागली आहे. तसेच काही क्षेत्रे हि दुष्काळग्रस्त आहेत आणि त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे.
पाण्याची बचत कशी करायची –
लोकांनी आपल्या बागांना आणि झाडांना गरज असल्यास पाणी देणे. पाईपने पाणी देण्यापेक्षा ते शिंपडणे अधिक चांगले होईल.
तसेच दुष्काळ प्रतिरोधक वनसंपत्ती लावणे हे पाणी वाचवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.
पाण्याची गळती थांबविण्यासाठी पाईप लाईन आणि नाळ हे योग्य प्रकारे जोडले आहेत कि नाही याची दक्षता देणे.
गाडी धुण्यासाठी पाईप ऐवजी बादलीचा वापर करावा.
आपण खुल्या नळाऐवजी एका भांड्यात पाणी घेऊन भाजी आणि फळे धुवावीत.
निष्कर्ष:
पाणी हे आपल्या जीवनाचा आधार आहे. पाण्याची बचत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच पावसाचे पाणी हे आपल्याला बंधारा बांधून किंवा टाकीत एकत्र साठवून ठेवले पाहिजे. कारण पाणी हे अमृत आहे आणि पाणी हेच जीवन आहे.
मराठीतील पाणी वाचवा निबंध संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली तुमची प्रतिक्रिया देऊन आम्हाला विचारू शकता.