प्रस्तावना:
झाड हि आपली गरज आहे, आज काल सर्व नुसते नारे लावतात झाडे जगवा झाडे लावा. पण असे खरंच आहे का? शंभर पैकी ३० टक्के जनजागृती आहे झाडे लावण्यासाठी.
झाडे लावा झाडे जगवा
नुसते झाडे लावा झाडे जगवा अभियान चालवून काही फायदा आहे का. दिवस भर एक एक झाड लावून लोकांना आकर्षित कारायचे. पण ते झाड जगले कि मेले हे दुसऱ्या दिवशी कोणी पाहायला पण नाही जात.
आपण घरात छोटो छोटे रोपटे लावतो. काही दिवस पाणी देतो आणि कामाच्या नादात कधी कधी पाणी द्यायला पण विसरून जातो.
झाडे आणि निसर्ग
निसर्गाने दिलेली हि देणं आहे झाडे. जर झाड नसते तर आपण जगू शकलो नसतो. हे आपणास माहित आहे का. आज मोठ्या मोठ्या संस्था झाडे लावा झाडे जगवा या अभियानात आपले योगदान देत आहे. सरकारने सुद्धा झाडे तोडण्यास परवानगी देत नाही. पण तरी सुद्धा आपण आपले खिसे भरण्यासाठी झाडांना तोंडत आहोत.
झाडे जर आपण असेच तोडत राहिलो तर, त्यापासून आपल्याला ऑक्सिजन नाही मिळणार. आपल्या जर ऑक्सिजन नाही मिळाला तर जगणे अशक्य होईल. याची कल्पना आहे का?
हा निसर्गाला या झाडं मुळेच आहे. आणि तीच आपण नष्ट करत आहोत. जंगले तोडून आपण निसर्गाचे नुकसान करत आहोत. याच झाडांपासून आपल्याला उपयुक्त अश्या औषधी मिळतात.
निसर्गाचे नुकसान
आज मोठं मोठ्या इमारतींनी या जमिनीवर आपले वास्तव्य प्रस्थापीत केले आहे. लोक आपले खिसे भरत आहेत. झाडे जर असेच तोडत राहिलो तर पाऊस कसा पडेल. याच झाडाखाली आपला शेतकरी थोडी विश्रांती करतो.
उन्हात त्रास होतो म्हणून एखाद्या झाडाखाली आपण आसरा घेतो. जर अशीच झाडे तोडत राहिलो. तर विसावा कुठे घेणार.
झाडाचे फायदे
झाडापासून किती फायदे आहेत हे आपणास ठाऊकही नसेल. झाडाच्या साली पासून कागद बनतो. आपल्या घरातील वापरल्या जाणाऱ्या वस्तू कपाट, खुर्ची, टेबलं, स्वयंपाक घरात चमचे, बसण्याचा पाट, पेपर, अश्या खूप साऱ्या वस्तू फक्त झाड पासून बनतात. आणि जर झाडाचं नाही राहले तर या वस्तू कश्या आपल्याला मिळतील.
झाडांपासून कित्येस औषधी आपणास मिळत आहेत. फळ , भाज्या आपल्याला मिळत आहेत. जर हे आपण नष्ट करत राहिलो तर पशु पक्षी आपण कसे जगणार. कारण आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन ची गरज आहे. जी झाडाने आपल्याला मिळत आहे. झाडांमुळेच पाऊस पडतो.
आपली घरे सुद्धा लाकडा पासून बनवतो. पाण्यात जी नाव असते ती पण लाकडं पासून बनविली जाते. झाडाचा पाला गायी, म्हशी, जंगलातील जनावरे, घरात पाळली जाणारी बकरी यांचा खाद्य म्हणून उपयोग होतो. जर त्यांना हिरवा पाला नाही मिळाला खायला तर आपल्याला दूध नाही मिळणार.
प्रदूषण
आज या धकाधकीच्या जीवना मध्ये जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे. वाहनानीची वर्दळ वाढली आहे. प्रदूषण वाढले जात आहे. उन्हाळा, पावसाळा, थंडी सारखे ऋतू पण आता आपल्या निसर्गा प्रमाणे हवे तसे होत नाहीत.
कारण झाडे नष्ट होत चालली आहेत. त्यांची जागा इमारती, कारखाने यांनी घेतली आहे. ज्याने पर्यावणाचे नुकसान होत आहे. आणि नको नको तसले आजार पसरत आहे.
आपण गाव कडे पहिले तर हेच जीवन खूप वेगळे आहे.
खेडे गाव मध्ये प्रदूषण मिळणार नाही. लोकांचे स्वास्थ पण चांगले आहे. आणि निरोगी जीवन जगात आहोत. म्हणून वर्षातून एकदा आपण गावी जातो. पण हेच जीवन आपण शहरा मध्ये जगलो तर.
पर्यावरण वाचवा
एक प्रण करा आपल्या भागात आपल्या सोसायटी मध्ये आपण झाडे लावू, झाडे जागवू. कारण हेच निसर्गाला दिलेले आपले एक छोटे श्रेय असेल. याचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीलाच होणार आहे. याने कोणाचे नुकसान नाही तर फायदाच होणार आहे.
निष्कर्ष:
आपण निरोगी आणि प्रदूषण मुक्त राहणे आपल्या हातात आहे. म्हणून खरंच झाडे लावा झाडे जगवा.