संत तुकाराम मराठी निबंध – वाचा येथे Essay on Sant Tukaram in Marathi

प्रस्तावना:

महाराष्ट्र ही महान संतांची भूमी मनाली जाते. या भारत भूमीवर अनेक महान संतांचा जन्म झाला आहे.

त्या सर्व संतांपैकी संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील वारकरी कवी – संत होते. संत तुकाराम महाराज हे अखंड आणि भक्तिमय कवितांसाठी ओळखले जातात.

संत तुकाराम महाराजांनी भगवान विष्णूचे अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान विठोबा यांच्यावर कविता केल्या आहेत. संत तुकाराम हे तुकोबा, तुकोबाराय आणि तुकाराम महाराज या नावानी प्रसिद्ध होते.

जन्म

संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ. स १५९८ साली पुण्याजवळील देहू येथे झाला. संत तुकाराम महाराज यांचा जन्म वसंत पंचमी – माघ पंचमीला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव ‘बोल्होबा’ आणि आईचे नाव ‘कनकाई’ असे होते.

बोल्होबा आणि कनकाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या संत तुकाराम यांचे आडनाव अंबिले असे होते. पंढरपूरचा विठ्ठल हा त्याचे आराध्य दैवत होते. त्यांच्या घराण्यात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा होती. सावजी हा त्यांचा मोठा भाऊ आणि कान्होबा हा त्यांचा धाकटा भाऊ होता.

त्यांचा मोठा भाऊ हा विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी ही संत तुकारामांवर होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची मुलगी जिजाई यांच्याशी संत तुकाराम महाराजांचा विवाह झाला.

सांसारिक जीवन

संत तुकाराम यांना आपल्या सांसारिक जीवनात अनेक दुःखे सहन करावी लागलीत. ते १७ – १८ वर्षाचे असताना त्यांचे आई – वडील मरण पावले.

त्यांचा मोठा भाऊ हा विरक्त वृत्तीमुळे तीर्थयात्रेला निघून गेला. त्यांना भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला. संत तुकाराम महाराजांचा मोठा मुलगा दुष्काळात गेला, गुरे – ढोरे गेलीत आणि त्यांच्या घरी अठरा विश्व् दारिद्र्य आले.

अभंग मुख्य वैशिष्ट्य

संत तुकाराम महाराज यांनी आपले जीवन पूर्वीपासून ध्यान आणि चिंतन यामध्ये घालविल्याने अशा उन्मनी अवस्थेत त्यानी आपल्या रसाळ वाणीतून अभंग रचना केली.

अभंग हेच संत तुकारामांचे महाराजांचे मुख्य वैशिष्ट्य होते. संत तुकाराम महाराज याना भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण इत्यादींचा त्यांना व्यासंग होता. त्यांनी आपल्या जीवनटाऊन आणि अभांगातून शुद्ध परमार्थ धर्माच्या स्थापनेचे कार्य केले.

संत तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायाच्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शेवटी “पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” तसेच ‘जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.

अभंगांना लोकप्रियता

संत तुकाराम महाराज यांनी स्वतःचा संसार सुखी करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी आपल्या कीर्तनातून अभंगवाणी केली.

अभंग म्हटलं की तो संत तुकाराम महाराजांचा एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली होती. खेड्या – पाड्यात आजही त्यांचे अभंग हे गायिले जातात. संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा निर्माण केली.

त्यांनी समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते पटवून दिली. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभांगाबरोबर गवळणी सुद्धा रचल्या आहेत.

भागवत धर्माचा पाया

संत तुकाराम महाराजांनी भागवत धर्माचा पाया घातला. संत ज्ञानेश्वरांनी देवालय बांधले आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढविला.

संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामध्ये परतत्त्वाचा स्पर्श आहे आणि त्यातून त्यांच्या मंत्राचे पावित्र्य शब्दात बदलते. संत तुकाराम महाराज यांचे अभंग हे अक्षर वाङमय आहेत. त्यांच्या काव्यातील मधुरता आणि भाषेची सरलता ही अतुलनीय आहे.

निष्कर्ष:

संत तुकाराम महाराजांसारखे महान संत कवी या महाराष्ट्राला लाभले आहेत. त्यांनी आपल्या अभंगांमुळे मराठी साहित्यात महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.

संत तुकाराम महाराज यांचा देह फाल्गुन वैद्य व्दितीयेला वैकुंठ स्वर्गवासी झाला. म्हणून हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.

Updated: December 14, 2019 — 11:40 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *